
16/09/2025
मुक्ताई केंद्र मध्ये दारू किंवा ड्रग सोडायला रुग्णमित्र दाखल होतात. बहुतेक वेळा त्या सर्वांनाच तंबाखू ,बिडी ,सिगरेट, गुटखा अशा प्रकारच्या तंबाखूयुक्त पदार्थांचं सुद्धा व्यसन असतं.मुक्ताई मध्ये त्यांना सर्वच व्यसन बंद करावं लागतं.
काही व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये फक्त दारू आणि ड्रग्ससाठी मदत करतात. ऍडमिट असलेल्या रुग्णांना व्यसनमुक्ती केंद्रातच कमी प्रमाणात तंबाखू किंवा सिगरेट दिली जाते. पण मुक्ताई मध्ये आम्ही असं करत नाही.
"माझं मुख्य व्यसन दारूचं आहे. तुम्ही मला छोटं व्यसन का बंद करायला सांगताय?" असा वाद आमचे रुग्णमित्र तंबाखूची तल्लफ आली तर घालत असतात. आम्हाला त्यांना सांगायला लागतं की सिगरेट -तंबाखू हे छोटं व्यसन नाही. ते अतिशय घातक व्यसन आहे. त्याच्यामुळे कॅन्सर आणि इतरही मोठे आजार होतात. आज मुक्ताई मित्र गणेश नांद्रे सहज भेट दिली आणि त्याच्या 3 वर्ष व्यसन मुक्ती चे अनुभव सांगितले.गणेश ज्या वेळी उपचार साठी ऍडमिट होता त्या वेळी त्यानी मला सांगितलं होत मी आयुष्यभर तंबाखू खाणार नाही. आज तो 3 वर्ष झाली व्यसन मुक्त आहे.. त्याची परवानगी घेऊन त्याच नाव व फोटो टाकल्या आहे 🙏🏻