04/10/2025
🌿 ऋतू बदल आणि त्यातील आरोग्य रक्षणाचा – आयुर्वेदाचा मार्ग 🌿
Commentary by Vd. Vinay Sevlikar, Ayurved Physician
📰 स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याप्रमाणे, अलीकडच्या ऋतुबदलामुळे शहरात सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, दमा व अॅलर्जिक तक्रारी झपाट्याने वाढल्या आहेत.
👉 यामागचे मुख्य कारण म्हणजे ऋतुसंधी कालावधी – हा आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी वर्णन केलेला आहे.
📊 आरोग्य आकडेवारी (Health Data)
भारत सरकार (MoHFW, 2023) अहवालानुसार – प्रत्येक वर्षी भारतात कोट्यावधींची Acute Respiratory Infection (ARI) ची नोंद केली जाते.
WHO (2022) डेटा – जगभरात दरवर्षी ५-१०% प्रौढ आणि २०-३०% मुले सर्दी-खोकल्याने आजारी पडतात.
ICMR 2021 सर्वेक्षणानुसार – ऋतुबदलाच्या काळात म्हणजे ऋतु संधी काळात मुलांमध्ये श्वसनसंस्थेचे संसर्ग २ ते 4 पट जास्त होतात.
📖 आयुर्वेद दृष्टिकोन
> “ऋतुसंध्यां हि शरीरं विकारभाजनं भवति”
👉 म्हणजे ऋतुबदलाच्या काळात शरीर रोगांस अधिक बळी पडते.
संहितेमध्ये नस्य, गंडूश, कवल, वमन यांचा श्वसन व मुख आरोग्य रक्षणासाठी विशेष उल्लेख आहे.
🌿 आयुर्वेदिक उपाय
१. आहार
कोमट पाणी, हळद, मध
आवळा, संत्री, लिंबू, तुळस, ज्येष्ठमध
मसाले – सुंठ, दालचिनी, मिरी, लवंग
२. दिनचर्या
सकाळ-संध्याकाळ गुळण्या (गंडूष)
स्टीम (स्वेदन) – हळद, तुळस, ओवा टाकून वाफ घेणे
प्राणायाम, योगासन, ध्यान
🌿 पंचकर्माचे महत्त्व
1️⃣ नस्य (Nasya) –
नाकावाटे औषधी तैल टाकल्याने श्वसनसंस्था स्वच्छ राहते, अॅलर्जी, कोरडेपणा, वारंवार होणारी सर्दी कमी होते.
2️⃣ गंडूष (Oil pulling ) –
औषधी तेल/काढ्याने गुळण्या केल्यास घसा खवखवणे, तोंड कोरडेपणा व तोंडातील संक्रमण कमी होते.
3️⃣ स्वेदन (Steam therapy) –
नाक-घसा-फुप्फुसांमधील साचलेला कफ सुटा होऊन श्वसन संस्थेतील निघायला लागतो.
4️⃣ वमन (Therapeutic emesis) –
ज्यांना वारंवार दमा, अॅलर्जी, जुनाट कफ होतो अशांसाठी वसंत ऋतूमध्ये वमन हा सर्वोत्तम ऋतुशुद्धी उपचार आहे.
🌟
👉 ऋतुबदलामुळे रोग वाढतात हे खरे, पण योग्य आयुर्वेदीय आहार-उपचार, दिनचर्या आणि पंचकर्म केल्यास आपण सहज आजार टाळू शकतो.
या काळात Herbal Tea (तुळस, आलं, दालचिनी, मिरी) घ्यावा. नस्य नस्य गंडूष नियमित करावे.
च्यवन प्राश व नियमित शरीरशुद्धी पंचकर्म,( Detox ) रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
पचनास जड आहार, दही, पिझ्झा, बर्गर, किंवा कफ प्रवृत्ती वाढवणारा आहार टाळावा, उकळलेले कोमट पाणी प्यावे.
शरीरास असणारी विशिष्ट एलर्जी ओळखावी आणि ती कटाक्षाने टाळावी
📍 Mangalmurti Health Care
🌱 Ayurveda | Panchakarma |