25/02/2026
मोतीबिंदू वेळेवर ऑपरेट नाही केला तर तो डोक्यात फुटून काचबंद होवू शकतो आणि ते ऑपरेशनचा मग खूप अवघड होवू शकते. अश्याच एका रुग्णाचा ऑपरेशन चा वीडियो मी cataractcoach.com ह्या पूर्ण जगातील सर्वात मोठ्या आणि प्रेस्टीजियस अश्या डॉक्टर उदय देवगण ह्यांच्या वेबसाइट ला दिला होता. ह्या वेबसाइट मधे ते जगात होणाऱ्या सर्वोत्तम आणि चॅलेंजिंग मोतीबिंदू ऑपरेशन चे समावेश करतात आणि त्याची समीक्षा करतात. हे वीडियो पूर्ण जगातील डोळ्याचे डॉक्टर मोतीबिंदू च्या ऑपरेशन बद्दल शिकण्यासाठी पाहतात. त्यात माझा वीडियो सेलेक्ट झाला आहे आणि सोबतच डॉ उदय देवगण ह्यांनी ह्या ऑपरेशन ची प्रशंसा पण केली आहे. असा मान मिळणे ही कोणत्याही नेत्रतज्ञासाठी अभिमानाची गोष्ट असते कारण त्याने केलेले ऑपरेशन हे जागतिक स्तरावर प्रशंसनीय झालेले असते