11/01/2022
*Make Your Life Healthy & Happy* 😇💪👍by *HYC*
*Health Tips* 🍎🍓🥬🥕
*No.29*
*तिळगूळ खा, गोड गोड बोला.*
मकरसंक्रांत जवळ आली आहे. हा सण जानेवारी महिन्यात तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात ,जेव्हा सुर्य उत्तरायणात असतो आणि त्याचा मकर राशीत प्रवेश होतो, तेव्हा साजरा केला जातो.
या दिवशी दिल्या जाणाऱ्या तीळ- गुळाला आरोग्याच्या दृष्टीनेही तेवढेच महत्व आहे.
*तीळ*- थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तिळगूळ खाल्ले जातात.
तिळामध्ये calcium, magnesium, iron, phosphorus, selenium, vit.B आणि तंतुमय पदार्थ आढळतात.
त्याचबरोबर mono & polyunsaturated fats तिळामध्ये आहेत.
तसेच तीळ तेलातील sesamol & sesamin हे काही विशेष घटक उत्तम antioxidants आहेत.
तिळा मधिल oleic acid रक्तातील cholesterol कमी करायला मदत करते.
रोजच्या आहारात तिळाची चटणी, भाजीत शेंगदाण्याऐवजी तिळाचा कूट वापरल्यास लाभदायक ठरेल.
तिळाबरोबर *गूळ* खाण्याचे अनेक फायदे आहेत.-
गुळामध्ये भरपुर प्रमाणांत antioxidants असतात.
त्याचबरोबर यात iron, potassium, phosphorus, calcium, vit.B , vit.A या घटकांचे प्रमाण भरपुर असते.
रोजच्या आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर अधिक फायदेशीर ठरतो.
गुळामुळे पचन सुधारते, तसेच रक्तातील हानीकारक घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
असे हे पोषणमुल्ये असलेले तीळ आणि गूळ आरोग्यासाठी लाभदायकच आहेत.
त्यामुळे न विसरता
*तिळगूळ खा, गोड गोड बोला.*
Thank you
Dr.Harshada Shelar
Dr. Harshada’s Yoga centre & Homoeopathic Clinic