24/05/2022
प्रजास्थापनम्
प्रजां गर्भ स्थापयति दोषं निरस्य इति प्रजास्थापनम्।
दोषांचा नाश करुन गर्भ धारणा करण्यासाठी सहाय्य ज्यामुळे होते ते द्रव्य म्हणजे प्रजास्थापन द्रव्य होय.
आवळा,नागबला,शतावरी,इत्यादी मधुर रसयुक्त शीत व स्निग्ध गुण युक्त द्रव्य गर्भाचे पोषण करुन गर्भाला बल देतात, त्यामुळे प्रजास्थापन कर्म घडते.
ब्राह्मी,दुर्वा,पाटला,हरीतकी,इत्यादी द्रव्य कफ,मांस,मेद दृष्टी दुर करुन गर्भाशय शोधन करुन गर्भाशयाला बल देऊन गर्भपात टाळतात.
हा झाला मुळ आयुर्वेदानुसार काही गर्भस्थापक द्रव्यांचा विचार…
परंतु हल्लीच्या काळात स्त्रियांमध्ये हार्मोनल सायकल बाबत तक्रारी वाढताना दिसत आहेत, ज्याचा थेट परिणाम गर्भधारणेवर होताना दिसतो,लग्नाचे वाढते वय कामाचा ताण
शांत झोप न होणे
पाळीच्या दिवसात होणारी दगदग
पोषण आहाराची कमतरता
इत्यादी अनेक कारणे देता येतील
त्यासाठी हर्मोन्स चे संतुलन कायम राखणे त्यासाठी कोरफड, अशोक,अनंतमुळ अशा औषधींनी सिद्ध औषधी कल्प जसे आशोकारिष्ट, यांचा उपयोग करता येतो…
वैद्याच्या सल्ल्याने नियमीत काही औषधी कल्पही घेता येतात… तसेच योनीधावन,उत्तरबस्ती ह्या चिकित्सा उपक्रमांचाही उपयोग घेतला जातो.
या खेरीज नियमीत आहारात कोबी,फ्लावर, राजमा,मटार,छोले,सिमला मिरची,दुध,केळी,यांचा समावेश असावा तर फार तिखट, आंबट,खारट,आंबवलेले पदार्थ, वांगे,कच्चा टोमॅटो, तळलेले पदार्थ आहारातून कमी करावे तर फास्टफूड, एरिएटेड पेय,सतत हॉटेलचे जेवन पुर्णपणे टाळावे
आधुनिक मतानुसार
Vitamin B group
Vitamin C
Vitex (निरगुंडी वनस्पती)
Omega 3
हे गर्भधारणे साठी भरपुर सहाय्यभुत ठरणारे घटक आहेत…
गर्भधारणेतील यशापयश हा फार मोठा वीषय आहे कारण या यशापयशामध्ये अनेक गोष्टींचा अतंरभाव आहे… त्यामुळे योग्य अनुभवी वैद्याकडुन याचे निवारण करुन घ्यावे
एका गोष्टीचा अवर्जुण उल्लेख करावा लागेल ती म्हणजे केळीचे फुल , हो केळीचे फुल गर्भधारणे पासुन प्रसुती पर्यंत उपयोगी पडते हा आयुर्वेदाने सांगीतलेला उपाय अधुनिक चिकित्सकांनीही माण्य केलेला आहे, परंतु आजही याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही, परंतु केळीचे फुल अत्यंत उपयुक्त असल्याचे अता बऱ्याचशा वैद्यकीय नियतकालीकांमध्येही प्रसिद्ध झाले आहे….
आधीक माहीती साठी
डॉ.प्रफुल दत्तात्रय पिंपळे
📲9422693239