Ciigma Gastroenterology Care

Ciigma Gastroenterology Care This is super speciality hospital with all facilities

28/08/2024

*भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती*

*जशी प्राप्त झाली तशी*

१) भगवान श्रीकृष्णांचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला
२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व
३) महिना: श्रावण
४) दिवस: अष्टमी
५) नक्षत्र: रोहिणी
६) दिवस: बुधवार
७) वेळ: १२:०० रात्री
८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य.
९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व
१०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.
११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.
११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.
१२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)
१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.

*कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.*
मथुरेत कृष्ण, कन्हय्या
ओडिशामध्ये जगन्नाथ
महाराष्ट्रात श्रीकृष्ण,
राजस्थानमध्ये श्रीनाथ
गुजरातमध्ये द्वारकाधीश
गुजरातमध्ये रणचोछोड
कर्नाटकातील उडुपी, कृष्णा
केरळमधील गुरुवायुरप्पन

जन्म ठिकाण:- मथुरा
जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव
संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद
बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)
गुरु, शिक्षक:- ऋषी संदिपनी
जिवलग मित्र:- सुदामा

*धर्मपत्नी ८:-* रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)

*कृष्णाची मुले:-* एकूण ८०

*श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.*

*श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.*

*श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.*

*श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.*

*श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.*

*श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.*

*श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.*

*श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.*

*राधा:-* राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,' असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती.

*श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु*

*आवडती फुल:-* फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)

प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.

*शंख:-* शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.

*आयुधं:-* त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.

*बासरी:-* कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .

*मोरपंख:-* रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.

*शिक्षण:-* श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.

*कार्य:-* कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.

*गीता उपदेश:-* महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.

*श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण*

कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो-कर्तव्याच्या पालनासाठी. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. "कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं."
"मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते." गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. "अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही." सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.

*अवतार समाप्ती:-* महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला

यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।
अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।
परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे।।।।

*श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय।।। ...*

*🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩*

17/08/2024

प्रिय रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक,
कोलकाता येथे घडलेल्या अमानुष आणि घृणास्पद गुन्ह्याबद्दल आम्ही तुम्हाला अत्यंत दु:खाने कळवत आहोत, आमची लाडकी वैद्यकीय विद्यार्थिनी/बहीण/मुलगी मोमिता देबनाथ हिच्यावर निर्घृण बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.
न्यायाच्या मागणीसाठी निवासी डॉक्टर हॉस्पिटलच्या आवारात शांततेत आंदोलन करत असताना, पोलिसांच्या उपस्थितीत समाजकंटकांनी ज्या प्रकारे हल्ला केला, हॉस्पिटलची तोडफोड केली, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, सेमिनार रूमला आग लावली ती अत्यंत निषेधार्ह आहे. शांतताप्रिय रहिवासी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशात आणि वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे
या अत्याचाराच्या निषेधार्थ, IMA ने शनिवार, 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6:00 ते दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी 6:00 वाजेपर्यंत देशभरातील वैद्यकीय सेवांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
रुग्णांना होत असलेल्या गैरसोईबद्दल दिलगीर आहोत

जय जय महाराष्ट्र माझा |गर्जा महाराष्ट्र माझा ||
01/05/2024

जय जय महाराष्ट्र माझा |
गर्जा महाराष्ट्र माझा ||

जरूर ऐका आणि अभिप्राय कळवा
18/04/2024

जरूर ऐका आणि अभिप्राय कळवा

*गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिनशके१९४६(०९.०४.२०२४)आज गुढीपाडवा . गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐत...
09/04/2024

*गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन
शके१९४६
(०९.०४.२०२४)

आज गुढीपाडवा . गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक महत्त्व :-
येणाऱ्या वर्षापर्यंत कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५१२४ वर्ष पूर्ण होत असून आणखी ४ लाख २५ हजार ८३७ वर्षे शिल्लक राहतील.

"चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे हनी |
शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||"

महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. "द्वादशमासै: संवत्सर:" असे वेदात आहे. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस
`चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक कारणे आहेत.

नैसर्गिक :-
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक :-
या दिवशी
अ. श्रीरामांनी वालीचा वध केला तो हाच दिवस.
आ. सत्ययुगाचा प्रारंभ झाला तो हाच दिवस.
इ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
ई. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
उ. इंद्राने वृत्रासूरावर विजय मिळवला तोच हा दिवस.
ऊ. श्री विष्णूने मत्स्यावतार घेतला तोच हा दिवस ( स्मृती कौस्तुभ ग्रंथात याचा उल्लेख आहे.)

सृष्टीची निर्मिती :-
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

महत्त्वाचा व वर्षारंभी दिन असून सुद्धा या दिवशी कडुनिंबाचे सेवन करणे सुचविले आहे. वसंत ऋतूमध्ये कफ प्रकोप झालेला असतो. हा कफ प्रकोप पूर्णांशाने नाहीसा व्हावा या दृष्टीनेच कडू रसाचे सेवन करणे आवश्यक ठरते. कडू रस हा उत्तम कफनाशक आहे. वसंताच्या अखेरच्या 15 दिवसात तीव्र उन्हाळा भासू लागत असतोच व त्यामुळे अनेक प्रकारचे रक्तविकार संभवतात. हे रक्त विकार टाळण्यासाठीही कडूनिंबाचा चांगला उपयोग होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी यासाठीच कडुनिंबाची कोवळी पाने जिरे, धने व सैंधव घालून त्याची चटणी करून खाण्यासाठी वापरली जाते.
गुढीपाडव्याला या प्रकारे जे कडू रसाचे सेवन करावयाचे ते केवळ एक दिवसासाठी नव्हे तर काही दिवस नियमितपणे याचे सेवन करावे लागते. या दिवशी जो कडुनिंब खावयाचा तो अल्प प्रमाणात असावा अधिक मात्रेत नाही.
असे हे नवीन वर्ष आपणास सुखाचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
जय श्रीराम🙏🏻🙏🏻🙏🏻

शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
19/02/2024

शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏

Happy 75th Republic day💐75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
26/01/2024

Happy 75th Republic day💐
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

Removed an impacted pin in Small bowel of a 1.5 year old boy successfully yesterdayकाल दीड वर्षाच्या बाळाच्या छोट्या आतड...
11/01/2024

Removed an impacted pin in Small bowel of a 1.5 year old boy successfully yesterday
काल दीड वर्षाच्या बाळाच्या छोट्या आतड्यात अडकलेली सेफ्टी पिन यशस्वीपणे काढली

चंपाषष्ठी निमित्त हार्दिक शुभेच्छा
18/12/2023

चंपाषष्ठी निमित्त हार्दिक शुभेच्छा

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
15/10/2023

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

हे लंबोदर, सर्वांना चिरकाल टिकेल अशी उदर शांती मिळू दे आणि असेच पदार्थ खाण्याची बुद्धी दे🙏 गणरायाच्या आगमनाच्या खूप खूप ...
19/09/2023

हे लंबोदर, सर्वांना चिरकाल टिकेल अशी उदर शांती मिळू दे आणि असेच पदार्थ खाण्याची बुद्धी दे🙏
गणरायाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा

15/09/2023

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ciigma Gastroenterology Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ciigma Gastroenterology Care:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category