05/07/2023
डॉ लोहिया अक्युपंक्चर केंद्राच्या बुलढाणा शाखेचा
शुभारंभ
ॲक्युपंक्चर ही विना औषध उपचार करण्याची चिनी पद्धती असून तिचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, शिवाय केवळ लक्षणांचा तात्पुरता उपचार न करता रोगांचे मूळ कारण शोधून उपचार करता येतो त्यामुळे उपचाराचे परिणाम दीर्घकाळ वा कायमस्वरूपी टिकतात असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे अक्यू पंक्चर तज्ञ व इंडियन अकेदमी ऑफ अक्यूपंक्चर सायन्स चे चेयरमन डॉ पु.भ.लोहिया यांनी केले. डॉ लोहिया अक्युपंक्चर उपचार केंद्राच्या शाखा देशात दिल्ली, मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे कोल्हापूर, ठाणे इ अनेक ठिकाणी असून काल 4 जुलै रोजी बुलढाणा येथील शाखेचा शुभारंभ डॉ.लोहिया यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बुलढाणा मतदार संघातील माननीय आमदार श्री संजु भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र श्री कुनाल गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटनानंतर डॉ. लोहिया यांनी ॲक्युप्रेशर ने घरचेघरी स्वतःचा उपचार या विषयावर दिलेल्या व्याख्यानात रोग प्रतिकार शक्ती वाढविणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, चक्कर, उचकी, बेशुद्धीे, हार्ट अटॅक इ साठी प्रथमोपचार करण्यासाठी अक्युप्रेशर बिंदू प्रात्यकशित देवून समजावून सांगितले तसेच बुलढाणा, चिखली, मेहकर, शेगाव, खामगाव, धाड, अजिंठा इ. परिसरातून आलेल्या रुग्णांची तपासणी केली. मानदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मनक्यांचे विकार, स्लिप डिस्क, AVN, संधिवात, सायटिका, लकवा, पोटाचे विकार, पाळीचे विकार, मधुमेहाचे दुष्परिणाम, दमा, अर्धशिशी, आम्लपित्त इ विविध रोगांपासून पीडित रूग्णांनी मोठ्या संख्येने तपासणी आणि उपचाराचा लाभ घेतला. गुडघा, मनक्यांचे विकार, स्लीप डिस्क, avn इ चे ऑपरेशन टाळण्यासाठी ॲक्युपंक्चर उपयोगी आहे असे डॉ सारंग लोहिया यांनी सांगितले.
बुलढाणा येथे बस स्टॅन्ड च्या मागे राणा गेस्ट हाऊस शेजारी स्थित या उपचार केंद्रात 5 आणि 6 जुलै रोजी प्रख्यात अकयुपंकचर तज्ञ डॉ सारंग लोहिया नवीन रूग्णांनी तपासणी करतील तसेच Hr. रोहित लिपणे उपचार करतील.
उद्घाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी डॉ राखी लोहिया, शिवा गिरी, शंकर लीपणे, राम चाटे इ नी परिश्रम घेतले.
ॲक्युपंक्चर बद्दल अधिक माहितीसाठी 7768077776 पर संपर्क करा.