Aarogyam Homeopathic Clinic Aurangabad

Aarogyam Homeopathic Clinic Aurangabad Get Well Stay Healthy With Homeopathic Medicines..!!

22/03/2023

होमिओपॅथिक उपचार घेत असताना डॉक्टर रुग्णांना अनेक प्रश्न का विचारले जातात??

प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शि...
18/02/2023

प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्‍या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे.

अध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्‍या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात.

परंतु योगी व्यक्तींसाठी, हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले – अतिशय स्थिर. योग परंपरेत, शिव देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु, म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.

समजुती बाजूला ठेवून दिल्या तरीसुद्धा, योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्वाची मानली जातो याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणार्‍या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यन्त पोहोचलेले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षावधी मार्गांनी प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे.

प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे. योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. जेंव्हा मी “योग” असे म्हणतो, तेंव्हा मी कोणत्याही विशिष्ट पद्धतीविषयी बोलत नाही. अथांगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे, अस्तित्वातील एकत्व जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग. याचा अनुभव घेण्याची संधी महाशिवरात्रीची रात्र तुम्हाला उपलब्ध करून देते.

17/02/2023

Get Well Stay Healthy With Homeopathic medicines...!!
Get well stay Healthy With Homeopathic medicines...!!
भारत आणि होमिओपॅथी : होमिओपॅथीची ओळख भारताला पोर्तुगीजांनी करून दिली. भारतामध्ये आपले पाय घट्ट रोवण्याच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीजांनी ग्रामीण भागातील जनतेला, जी आजार झाल्यानंतर पूर्वापार चालत आलेली झाडपाल्याची औषधे खात होती, त्यांना चवीने गोड, हळुवार व सौम्य अशी होमिओपॅथिक औषधे देऊन त्यांची मनेजिंकून घेतली. त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीमार्फत भारतात शिरलेल्या ब्रिटिशांनी देखील येथील स्थानिक लोकांना होमिओपॅथिक औषधेदेऊन मदतीचा हात दिला. अशा प्रकारे भारतात पोर्तुगीजांबरोबर आलेली होमिओपॅथिक उपचारपद्धती हळूहळू संपूर्ण देशात पसरली.

होमिओपॅथीचे फायदे : (१) हे दुष्परिणामविरहीत शास्त्र आहे. त्यामुळे अगदी लहान अर्भकापासून ते वयोवृद्धांपर्यंत होमिओपॅथी सुरक्षित-पणे वैद्यकीय सेवा देऊ शकते. (२) होमिओपॅथीतील औषध-सिद्धीकरण हे गिनीपिग, बेडूक किंवा उंदीर इ. प्राण्यांवर न करता निरोगी मनुष्यावरकेले जाते. त्यामुळे औषधांच्या शारीरिक लक्षणांबरोबरच मानसिक लक्षणे सुद्धा मिळतात. (३) औषधे घेण्यास सुटसुटीत असतात. (४) काही संभाव्य शस्त्रक्रिया उदा., मुतखडा, मूळव्याध, पित्ताशयातील खडे निश्चित-पणे टाळल्या जातात. कारण शस्त्रक्रिया करूनही हे आजार वारंवारउद्भवतच राहतात. होमिओपॅथिक उपचाराने हे आजार तर बरे होतातच परंतु शरीराची आजार होण्यामागे जी प्रवृत्ती किंवा कल असतो, ती प्रवृत्तीसुद्धा कमी होते. (५) होमिओपॅथिक उपचारपद्धतीमध्ये रुग्णाच्या पूर्ण शरीराचाविचार केला जातो. त्यामुळेच मुख्य लक्षणांसमवेत बाकीची छोटी-मोठी लक्षणे सुद्धा कमी होतात. होमिओपॅथीमध्ये रुग्णाला पूर्णपणे व कायमचेबरे करण्याचा उद्देश असतो. ॲलोपॅथिक उपचारपद्धतीप्रमाणे प्रत्येक वेगळ्या तक्रारीसाठी निरनिराळ्या डॉक्टरांना भेट देण्याची गरज भासत नाही.होमिओपॅथी शरीरातील प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतेआणि शरीर निरोगी व निकोप ठेवते.

Homeopathy  # growing  # india # Get Well Stay Healthy With Homeopathic medicines..!! Aarogyam Homeopathic clinic, auran...
09/02/2023

Homeopathy # growing # india # Get Well Stay Healthy With Homeopathic medicines..!! Aarogyam Homeopathic clinic, aurangabad.

0 Likes, 0 Comments - Gajanan supekar () on Instagram: "Get Well Stay Healthy With Homeopathic medicines...!! homeopathy # growing fast ..!!"

25/01/2023
लहान मुलं आणि होमिओपॅथी...!! काही दिवसांपूर्वी 10 वर्ष वय असलेल्या  सार्थकचे वडील त्याला घेऊन क्लिनिक मध्ये आले. ते गृहस...
03/01/2023

लहान मुलं आणि होमिओपॅथी...!! काही दिवसांपूर्वी 10 वर्ष वय असलेल्या सार्थकचे वडील त्याला घेऊन क्लिनिक मध्ये आले. ते गृहस्थ व्यवसायाने स्वतः फार्मसिस्ट होते.ते सांगत होते - सार्थक ला मागील 8-9 महिन्यांपासून सारखी सर्दी होते आणि ह्या 3 महिन्यात श्र्वासाचा सू सू असा आवाज पण येतोय.सारखा आजारी पडतोय आणि पुन्हा पुन्हा प्रतिजैविकांचा वापर करावा लागतोय.आता तर वाफ पण देतोय आम्ही. पण आजारी पडतोच तो. असा संवाद झाल्यानंतर त्याची मानसिक, भावनिक , शारीरिक माहिती घेतली व प्राथमिक तपासणी केली आणि होमिओपॅथी ची औषधी देऊन उपचार सुरू केले.पुन्हा 15 दिवसानंतर फॉलो उप साठी आला तर फ्रेश वाटत होता आणि सर्दी बरीच कमी झालीय अस त्यानेच मला हसत हसत सांगितलं.निश्चितच मलाही बर वाटलं. महिन्या भरात वाफ घेणं कमी झालं आणि सर्दी होणं पण बऱ्यापैकी कमी झाल्याने शाळेतला त्याचा परफॉर्मन्स हळू हळू पूर्व पदावर आला. होमिओपॅथिक औषधी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उत्तमरीत्या कार्य करतात.ह्या औषधी लहान मुलं आवडीने खातात कारण त्या चवीने गोड असतात शिवाय कुठलाही दुष्परिणाम नसतोच.आई वडिलांच्या खिशाला परवडणारी ही उपचार पद्धती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच.तुम्हा आम्हा सगळ्यांमध्ये होमिओपॅथी वैद्यकीय शस्त्त्राबद्दल जागरूकता निर्माण व्हावी त्यासाठी हा प्रयत्न..!! Get Well Stay Healthy With Homeopathic medicines..!! डॉ. गजानन सुपेकर, आरोग्यम होमिओपॅथिक क्लिनिक, BSNL ऑफिस समोर,ऑफिक नंबर ८, यश टॉवर्स,शिवाजी हायस्कूल रोड, रोकडीया हनुमान कॉलनी,संभाजीनगर. 9561270960

Address

431001
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarogyam Homeopathic Clinic Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aarogyam Homeopathic Clinic Aurangabad:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category