Shri Mehervishwa Ayurved Panchakarm Clinic

Shri Mehervishwa Ayurved Panchakarm Clinic An Ayurved PANCHAKARM centre providing all facillities and treating all diseases through Ayurved

Permanently closed.
22/01/2021

#मानसिक_आजाराची_कारणे

#चांगल्या_गोष्टी_सोडणे आणि #वाईट_गोष्टी_न_सोडणे

रुग्ण तपासणी करताना एक डॉक्टर म्हणून अनेक प्रश्न विचारले जातात त्यात प्राधान्याने आहार कसा आहे,दिनचर्या कशी आहे,ताणतणाव ,पूर्वीचे आजार आणि इतरही.

"तुम्ही सकाळी पायी फिरता का "?(Walk घेता का ?)मी माझ्या रुग्णांना विचारतो तेव्हा पुष्कळदा उत्तर येते , "पूर्वी फिरायचो पण आता काही दिवसापासून बंद केले"
किंवा
व्यायाम करता का ? असे विचारता
तेव्हा तसेच उत्तर दिले जाते.
आपण करत आहोत त्याचे समर्थन करण्यासाठी
"मी किती व्यस्त असतो "किंवा "वेळच भेटत नाही "इ उत्तर दिले जाते.
मग असेच अनेक प्रश्न
वेळेवर जेवता का ?
हॉटेल चे जेवण किती असते?
योगासने,ध्यान,पूजा,रात्रीची झोप इ. ची उत्तरे साधारणतः तशीच आढळतात.

आणि वरील प्रश्नाच्या अगदी उलट
काही व्यसन आहे का?
जसे दारू (sorry drinks) घेता का ?
सिगारेट (smoke) करता का?
तंबाखू, गुटखा इ ची सवय आहे का ?
त्यावेळेस occasionly असे उत्तर येते.
ते बंद करा असे म्हणता.
डॉक्टर , सध्या शक्य नाही पण हळू हळू करेल.

म्हणजेच मनुष्य चांगल्या गोष्टी सोडतो पण काही चुकीच्या गोष्टी मात्र लवकर सोडत नाही.

ही गोष्ट केवळ व्यसन किंवा आहार,दिनचर्ये पूरती मर्यादित नाही तर मानसिक स्तरावर घडणाऱ्या गोष्टी अशाच असतात.

कोणी आपली स्तुती केली किंवा चांगले म्हणाले की लोक त्यास एक वेळेस विसरतील पण कुणी वाईट बोलले किंवा नाव ठेवले की ती गोष्ट मात्र ते कधीच विसरत नाहीत.

एखाद्याचे कौतुक करायचे तो विसरेल किंवा त्यास शब्द थोडके च असतील पण निंदा आणि त्याचे गाऱ्हाणे करताना मात्र शब्द अपुरे पडतात .

एखाद्याने केलेली मदत तो विसरेल पण मदतीस न आलेल्या लोकांची यादी मात्र तो लक्षात ठेवेल.

आपण केलेल्या चुकांना तो लगेच माफ करतो पण दुसऱ्यांच्या चुका मात्र सतत उगाळत राहतो.

माझं कस बरोबर आहे याचे समर्थन करताना दुसऱ्याचे चूक कसे यासाठी तो तर्क लावतो.

समजून घेणे यापेक्षा गैरसमज करून त्यांचे धागे विणत संशयाच्या भोवऱ्यात स्वतःच फसतो.

एखाद्याने आपणास कसे फसवले ?मग ते पैसा किंवा इतर बाबतीत असेल ,तर तो त्यास वारंवार आठवतो परंतु त्यास सध्या मदत करणारे १० लोक दिसत नाहीत.

आता वरील सर्व बाबीचा मानसिक आजाराशी कसा संबंध आहे ते पाहू.

एक पन्नाशी च्या आसपास असणारी महिला गुडघे दुखी व इतर आजारासाठी आली.तपासणी करताना वारंवार पूर्वी लग्नानंतर घरातील जावू,नणंद यांनी कसा त्रास दिला , मला किती काम करावे लागले आणि त्यामुळेच सर्व आजार झाले हे ती वारंवार सांगत होती.खर तर आज तो काळ जावून 15 एक वर्ष झाली व सगळे वेगळे राहतात पण तो आघात ती विसरत नाहीये आणि त्यामुळे त्रास काही बरे होत नाहीत.त्रास झाला होता हे खरे असेल ही पण ते च वारंवार लक्षात ठेवून व आठवून ती स्वत:ला त्रास करून घेत होती.उपचारासोबत या बाबींवर लक्ष देवून मार्गदर्शन करावे लागले.

एक तरुण मुलगी , वडील रागीट असल्याने त्या काळात मेडिकल ला जावू न देता कॉमर्स करायला लावले.आज ती एका चांगल्या बँकेत आहे पण त्याचा द्वेष मनात ठेवून तिने लग्नही केले नाही आज depression मध्ये आहे. चूक झाली ही असेल पण त्याचा त्रास स्वतः ला मनुष्याने किती काळ करून घ्यावा.

अशा अनेक घटना घडतात आणि त्याची परिणीती मानसिक विकारात होते

जसे
तरुणपणी झालेला प्रेमभंग.
मुलाने मनाच्या विरुद्ध केलेले आंतरजातीय लग्न.
मित्राने पैश्यासाठी व्यवसायात दिलेला धोका.
पती पत्नीचे भांडण व फारकत.
भावा भावांची इस्टेटी साठीचे तंटे व कोर्ट कचेरी.
सासू सूनाचे मनमुटाव.

इ अनेक घडणाऱ्या घटना आणि त्याचे मनावर होणारे परिणाम.खर तर बऱ्याच घटना डॉक्टरांच्या अधिकार क्षेत्रा बाहेरील आहेत. पण याचा परिणाम जेव्हा आरोग्यावर येतो तेव्हा भेट होते डॉक्टरांची.

यातून मार्ग काढण्यासाठी करावे लागते प्रबोधन
समजून घ्यावे लागते आपल्या दुःखाची कारणे आणि शोधावी लागते ती वाट.

जसे मागे पाहून पुढे जाता येत नाही तसे भूतकाळात रमुन भविष्य घडत नाही.

धैर्य,संयम,जीवन समजून घेणे,इतरांना माफ करणे , माफी मागणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

आपण जग बदलू शकत नाही पण
आपल्या अंतर्यामी जग सुंदर करू शकतो.

द्वेष,मत्सर,राग,लोभ,वेदना यांना विसरून मिळालेले किंवा उरलेले आयुष्य मनुष्य सुखी करू शकतो
मात्र गरज आहे
ती चांगल्या गोष्टी न सोडणे आणि
वाईट गोष्टी सोडून देणे याची.

जग सुंदर आहे वेदनेतही
आणि कुरुप आहे सुखातही
गरज आहे बदलाची
नव्याने जग पाहायची

@ डॉ.अमोल ना. देवरे
श्री मेहेरविश्व आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक
औरंगाबाद

 #दिवाळी_अभ्यंगस्नान_आणि_उटणे  #आरोग्य_आणि_सौंदर्य     @डॉ.अमोल ना. देवरे हिवाळा सुरू झाला की टीव्ही वर निरनिराळी मॉइश्च...
04/11/2020

#दिवाळी_अभ्यंगस्नान_आणि_उटणे
#आरोग्य_आणि_सौंदर्य @डॉ.अमोल ना. देवरे

हिवाळा सुरू झाला की टीव्ही वर निरनिराळी मॉइश्चरायझिंग क्रीम, लिप बाम यांची जाहिरात दिसू लागते . हिवाळ्यातील थंड हवेने त्वचा रुक्ष होवू लागते आणि पायाला भेगा पडणे , ओठ फाटने तसेच इतरही आजार सुरू होतात .पण आपल्या संस्कृती आणि सण यामधे आपल्या आरोग्याची काळजी घेतली आहे , गरज आहे ते आपण डोळस पणें त्याचा विचार करण्याची.

दिवाळी मध्ये याच साठी अभ्यंग स्नानाचे महत्व सांगितले आहे. पण अभ्यंग म्हणजे काय?अभ्यंग स्नान कसा करायचा?त्याचे फायदे काय आहेत? इत्यादीचा आपण विचार करू .

#अभ्यंगस्नान

अभ्यंङगमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा ‌|
दृष्टिप्रसादपुष्टयायु: स्वप्नसुत्वकदार्ढयकृत ||

आयुर्वेदात वर्णित निरनिराळी तैल कोष्ण करून शरीरावर हळुवार तैल जिरवून केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान.
•आयुर्वेदात अभ्यंग हा रोज करायला सांगितला आहे.
दैनंदिन कार्य करताना शरीराची झीज होत असते ही झीज भरून काढण्याचे कार्य अभ्यंग करते.

•अभ्यंग म्हतारपण नष्ट करते म्हणजे शरीराची झीज दूर करून येणारे म्हतारपण थांबवून तारुण्य टिकवून ठेवते.तसेच म्हतारपणाची लक्षणे त्वचा वर येणाऱ्या सुरकुत्या , केस पांढरे होणे, गुडघे दुखणे दूर करते.

• शरीरात निर्माण होणारा थकवा अभ्यंग दूर करतो विशेषतः जे लोक जास्त प्रवास करतात, up down रोज असते त्यांनी अभ्यंग जरूर करावा.

•अभ्यंग हे वातशामक आहे.शरीरात वात वाढल्याने पाठ कंबर मान दुखणे होते.सध्या cerevical spondylitis,lumbar spondylitis चे प्रमाण वाढले आहे.तसेच गुडघे दुखणे, संधी शुल, sciatica तसेच वाताचे इतर आजार ही अभ्यांगाने बरे होतात.

• झोप न लागणे , अपुरी झोप, मोबाईल इ ने डोळ्यावर परिणाम होतो व नजर मंदावते. यावर अभ्यंग केल्याने दृष्टी चांगली होते. डोळ्यांचे संरक्षण होते.

• पुष्टी.. तीळ तेलाच्या अभ्यंगाने कृश व्यक्ती चांगला बळकट बनतो तसेच स्थूल व्यक्ती ही मेद झटून त्याचे वजन कमी होते.लहान मुलांमध्येही तैल अभ्यंगाने मूल गुटगुटीत बनते.

• निद्रा..शरीरावर तैल अभ्यंगाने झोप छान लागते तसेच डोक्यावर अभ्यंग केल्याने मन शांत बनते.राग चिडचिड उद्वेग सुद्धा कमी होतो.

•त्वक दार्ढ्य .... अभ्यंगाने त्वचा सुकुमार बनते. त्वचे वरील सुरकुत्या बऱ्या होतात.तारुण्य टिकून राहते.सुंदर त्वचे साठी अभ्यंग जरूर करावा.

हिवाळ्यात थंड हवेने रुक्षता वाढते त्याने ओठ फाटणे,पायाला भेगा पडणे,दात दुखी,कान दुखणे इ आजार होतात व वाढतात यावर अभ्यांगासह तेलाच्या गुळण्या , कानात तैल घालने, सांध्यांना तैल लावणे इ त्रास बरे होतात.

तैल अभ्यंगाने वरील सर्व फायदे तर होतातच पण इतर शरीरातील आजार देखील बरे होतात.

#उटणे

उद्वर्तनं कफहरं मेदस: प्रविलायनम् ।
स्थिरीकरणमड्गानां त्वकप्रसादकरं परम् ।।

अभ्यंग केल्यावर स्नान करताना साबण न वापरता उटणे लावून त्याने स्नान करावे.
उटण्याचे अनेक फायदे आहेत
शरीरातील दुर्गंधी याने दूर होते .
वाढलेला कफ व मेद याने झडतो.
Fatloss साठी उटणे उपयुक्त आहे.
पोटाचा घेर देखील उटणे घासून स्नान केल्याने कमी होतो.
शरीर लिबलिबीत झाले असेल.मेद लटकत असेल.पेशींचा आकार बदलला असेल अशा अवस्थेत उटणे छान काम करते.
त्वचेचा वर्ण याने सुधारतो.त्वचा नितळ व स्वच्छ बनते.
असे बहुगुणी उटणे केवळ दिवाळी तच नव्हे तर वर्षभर देखील वापरता येईल.

चला तर मग ही दिवाळी साजरी करू

आरोग्या सह.... सौंदर्य ही

#डॉ_अमोल_ना_देवरे
#श्री_मेहेरविश्व_आयुर्वेद_पंचकर्म_क्लिनिक
#औरंगाबाद

29/06/2020
उपयुक्त आयुर्वेदीय आहार कल्पना
28/06/2020

उपयुक्त आयुर्वेदीय आहार कल्पना

Some tips for healthy life
27/06/2020

Some tips for healthy life

18/06/2020

Please listen ,like and share my video on the topic of Ayurvedshield.
How to build a immune system
How to be healthy

14/06/2020


काही लोक immunity वाढण्यासाठी काय करु असे विचारत आहेत , त्यावेळी सांगावस वाटतंय.
हे तर अस झालय
उद्या परीक्षा आहे काय वाचु ?
उद्या लढाई आहे कोणता व्यायाम करु?
तहान लागली आहे कोठे खोदू?
एका दिवसात इम्मूनिटी वाढत नाही
त्यास सतत प्रयत्न करावे लागतात
खर तर आम्ही आयुर्वेद डॉक्टर सतत पथ्य
सांगतच असतो पण तेव्हा लोक चेष्टा करतात ,
जुनाट विचाराचे लोक तुम्हाला काय माहित ?
आम्ही IT वाले ऐटीत जगतो अस ही म्हणतात
असो मग आजच का पथ्य पाळ!यचे असे म्हणता
एक माझा तरुण patient म्हणाला
डॉक्टर , तुम्ही म्हणाल ते आता करतो
काय करणार
#मरता_क्या_न_करता अशी अवस्था सध्या आहे
तर खालील गोष्टी करा
1. व्यवस्थित दिनचर्या पाळा
2.सकाळी लवकर उठा ,
3.morning walk करा किंवा
व्यायाम करा
4.योगासने करा ,यासाठी वेळेचे नियोजन करा
5.शक्य झाल्यास नाश्ता ऐवजी 10 च्या आत जेवण करा , दुपारी नाश्ता करा रात्रीचे जेवण लवकर करा
6.दुपारी फळ खा
7.सुर्यास्ता पूर्वी जेवण हे सर्वोत्कृष्ट आहे (ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी)
8.सकाळी प्रार्थना करा , मानसिक आरोग्यासाठी
9.जे नाश्ता करु इच्छितात त्यांनी
भाताची पेज, मुगाचे कढ़ण, उपमा,शिरा, मटकी (मर्यादित),अंड़ी, चपाती, गव्हाची खीर , इडली, खावु शकता
वृद्ध व लहान मुले यात अंजीर, मनुका,राजगिरा लाडू, खोबरे लाडू,शेंगदाना लाडू खावु शकतील
10.मेदस्वी व्यक्ति , कफाचे आजार यानी सोडून बाकिचे लोकांनी तुपाचा वापर जेवणात करावा
11.दुपारच्या जेवणात सर्दी व त्वचाविकार व्यक्ति सोडून इतर लोक लिम्बु,ताक, कांदा, काकड़ी,बीट, यांचा वापर करावा.
12.रोज नाकात 2-2 थेंम्ब तिळ तैल घालावे.
13.आठवडयातुन एकदा तिळ तैलाची मसाज करावी.
14.रात्रीचे जेवण हल्के असावे .
भात टाळ!वा
15.coldrink,pizza, burger, तळलेले पदार्थ शक्यतो टाळणे.
16.धूम्रपान,मदिरासेवन,गुटखा,तम्बाखु सेवन करु नये .
17.रात्री जागरण टाळ|वे.
18.योग्य मात्रेत पाणी प्यावे शक्यतो कोमट पाणी.
19.आहारात लसुण,आद्रक,धने,कड़ीपत्ता,लवंग,मिरे
,हळद इ चा योग्य मात्रेत वापर करावा.
20.आयुर्वेदात रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यास
आवळ| ,गुळवेल, लसुन,शतावरी,ज्येष्ठमध, गोक्षुर ,त्रिफला इ चा वापर सांगितला आहे तो वैद्याच्या सल्याने घ्यावेत तसेच च्यवनप्राश,अगस्तिप्राश, ब्राह्मीप्राश इ रसायन धातु पुष्ट करुन रोग प्रतिकार शक्ति वाढ़वतात.
21.मन संयम करणे,रागावर नियंत्रण करणे, धैर्य राखणे याला आयुर्वेदात आचार रसायन म्हणतात याने आयुष्य वाढते , रोग प्रतिकार शक्ति सुद्धा.
22.आठवडयातुन एकदा उपवास करावा तोही कोमट पाणी, दूध,फळचा रस यासह .
23.मन शांत ठेवणे,योग्य आहार,योग्य विहार,व्यायाम,योग्य झोप उत्तम आरोग्यच देत नाही तर रोग प्रतिकार शक्ति सुद्धा वाढ़वते

@डॉ. अमोल ना.देवरे
SHRI MEHERVISHWA AYURVEDA PANCHAKRMA CLINIC
Gurunath sankul
Office no. 13
Second floor
Above HDFC Bank
New Shreya nager
Calda corner
Aurangabad
9422858939

10/02/2020

#अतिव्यायाम_आरोग्यास_घातक.
@डॉ. अमोल ना. देवरे

परवा #सरिताबेन दवाखान्यात पतीसह आले होते ,
डॉक्टर ,माझ्या योग टीचर ने तुमच्याकडे पाठवले आहे , मला सूर्यनमस्कार करताना श्वास लागतो ,
घुर घुर असा आवाज येतोय आणि काही दिवसांपासून खुप थकवा ही जाणवतोय.
"तुम्ही किती सूर्यनमस्कार घालता" , मी विचारले
"सर ,रोज 12 घालते आणि सुटी च्या दिवशी 24 "
त्यांनी सांगितले
मी ,त्यांना पूर्ण तपासले , त्यांना मधून मधून जुलाब पण चालू होते, dehydration मुळे थकवा होता त्यात अति व्यायाम
आता ,सूर्यनमस्कार करु नका हे मी सांगणार आहे हे त्यांना एव्हाना कळले होते ,
"डॉक्टर ,व्यायामाने माझे 4 किलो वजन कमी झाले आणि मला बरे वाटते , व्यायाम चांगला असतो ना ?"
मी शांतपणे म्हणालो ," व्यायाम चांगला असतो अतिव्यायाम नाही , त्यात तुम्ही कोणता व्यायाम करता हे फार महत्वाचे आहे"
60 वर्षा नंतर सूर्य नमस्कार करु नये , त्यात शक्ति पेक्षा आधिक होत असेल तर ते ह्रदयासाठी घातक आहे .
तुम्हाला जुलाब होत असल्याने , शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होतेय . तुम्ही पायी चालणे , प्राणायाम व हल्के फुल्के योगासने करु शकता.
व्यायाम फक्त वजन कमी करण्यासाठी नसुन आरोग्यासाठी आहे ,तेव्हा वजनाचा विचार न करता फळे, गोड पदार्थ मधून मधून खाणे गरजेचे आहे , रात्री झोप ,योग्य आहार आवश्यक आहे आणि
हो , आजारी असता व्यायाम करु नका.

#दीपा एका कंपनीत काम करणारी , 27 वर्षाची महिला ,थोड़ी स्थूल त्यामुळे सहकारी लोकांच्या चेष्टेचा विषय ,मग काय ती पण जिद्दीला पेटलीच वजन कमी करायचे म्हणून.
रोज सकाळी 7 ला उठून बस पकड़ायची .डब्यात सूका आहार, दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून संध्या 6 वाजता ऑफिस मधून जिम गाठत असे .काही दिवसात तिला थकवा जाणवु लागला .तपासणीस जेव्हा ती आली तेव्हा खुप थकल्यासारखी जाणवत होती , चेहरा सुजलेला होता ,रक्त तपासणी केल्यावर HB 7 आढळले .आता मी तिला व्यायाम पूर्ण बंद करुन .पूर्ण आराम आणि खजूर,मनुका,apple,गुळ शेंगदाणे इ पौष्टिक पदार्थ खाण्यास सांगितले .
तिच्या चेहऱ्यावर लगेच प्रश्न चिन्ह , आता माझे वजन वाढ़णार .मी तिला समजावले , " तुला आरोग्य पाहिजे का वजन तुच ठरव"
व्यायाम करण्या साठी सुद्धा शरीर निरोगी हवे , स्त्रिया दिवसभर exertion करुन exercise करत असतील तर ते चुकीचेच

#देशमुख काका - वय वर्ष 70 , अगोदर मी किती फिट आहे ,मला कधीच आजार नाही झाला ,आजही मी सकाळ संध्याकाळ 1 -1 तास फिरतो ,माझ्या सोबत चे तरुण पळतात इतके मी जलद चालतो इ इ सगळे सांगून झाले , मग मी हळूच त्यांना माझ्या कड़े येण्याचे प्रयोजन विचारले.
"तसे ,काही नाही हो , बाकी एकदम मी फिट आहे पण काही दिवसांपासून गुड़घे दुखी सुरु झाली आहे. फार काही नाही हिला चांगला गुण मिळाला , तर म्हटले आपण पण दाखवून देवू".
मी काकांचे गुड़घे तपासले आणि सांगितले
काका ,तुमचे चालण्याचे प्रमाण कमी करा सकाळी फक्त 30 मिनीटच फिरा आणि तैल लावून चालायला जा. 15 दिवसात काकांचे गुड़घे बरे झाले
व्यायाम चांगला पण अति व्यायाम हानिकारक .

#किशोर, 23 वर्षाचा तरुण , नुकतेच दंगल चित्रपट पाहुन झाला मग काय you tube वर आमिर चा video पाहिला दूसरे दिवशी जिम जॉइन केली.
जिम मधे मोठयाणे गाणे ऐकुन जोर जोरात dumbel मारणे चालू असे. रात्री उशिरापर्यन्त जागरण
मित्रां सोबत ड्रिंक्स ( डॉक्टर मी occasionaly घेत असतो , नेहमीचे patients ची वाकये तो बोलला) रात्री 12 वाजता झोपुन सकाळी 6 ला जिमला जाणे, सकाळी बरेचदा acidity
किशोर माझ्या कड़े आला होता त्याच्या आदल्या रात्री रक्ताची उल्टी झाली होती आणि पोट दुखत होते.
मी पूर्ण आराम सांगून 3 दिवस फक्त दूध व फळे खायला दिली आणि व्यायाम पूर्ण बंद सांगितला.
व्यायाम हा अर्ध शक्ति करायचा असतो . अतिव्यायाम केल्याने ह्रदयावर ताण पड़तोय त्यात सध्या दिनचर्या चुकिची आढळते.उन्हाळयात व्यायाम कमी प्रमाणात करावा

#संजू भाऊ ना मानेचा त्रास ,cerevical spondylities असे निदान करुन आलेले , मी माने जवळ ची त्वचा पाहिली ती पातळ व सुजलेली, हाडांची झीज झालेली ,रोज सूर्य नमस्कार घालत आणि दिवसाला 6 कप चहा घेत , व्यायाम बंद व चहा कमी करून त्रास बरा झाला

#नीलिमा ताई स marathon मधे धावण्याची फार आवड़ .रोज 1 तास धावणे संध्या अर्धा तास swimming असे.
माझ्या कड़े आले तेव्हा पायांना vericose veins , मासिक स्त्रावात आधिक रक्त जाणे अशी तक्रार होती इथे पण अतिव्यायाम व त्यामुळे होणारे आजार काही दिवस व्यायाम कमी करून पंचकर्म केले.
त्रास पूर्ण बरा झाला आणि आता व्यायाम मर्यादित केला आहे
Marathon मधे ही ताई 10 km धावल्या पण दम लागू लागताच थांबा हा सल्ला त्यांनी पाळला.

बरेचदा व्यायाम करताना चक्कर येवून मृत्यु असे पेपर मधे आपण वाचतो , हे सगळे अति व्यायामाचे बळी होत
तेव्हा योग्य आहार , वय ,झोप , आजार ,दिनचर्या यांचे तारतम्य व मेळ घालून शक्ति नुसार व्यायाम करावा पण
#अतिव्यायाम हा घातक च

नोट: व्यायाम करु नये याच्या विरोधी आम्ही नसुन
योग्य व्यायाम करावा, कोणता व्यायाम करावा ,कधी करावा,किती करावा ,कसा करावा हे समजून केले तरच आरोग्य मिळते याची नोंद घ्यावी
@डॉ. अमोल ना.देवरे
श्री मेहेरविश्व आयुर्वेद पंचकर्म क्लीनिक

12/09/2019

ारलेली_माणसे

आयुष्य म्हणजे जय पराजय किवा यश अपयश नसुन प्राप्त परिस्थितीत दिलेला लढ़ा आहे.प्रत्येक श्वास ,प्रत्येक प्रयत्न तुमच्या जिवंतपणाची लक्षणे असतात.आशा आणि निराशा याच्या भोवती मनाने उभारलेले आणि नियती ने तेवढयाच क्रूरपणे बेचिराख केलिली स्वप्ने , त्याच तुकडयानिशी परत खेळ।यचा हा डाव असतो. हे ज्याला जमले त्याचे आयुष्य पार गेले उरलेले मधेच बुडाले.
एक पन्नाशी साठी च्या दरम्यान वयाची एक विधवा स्त्री , थोड़ीशी स्थूल मध्यम प्रकृति ची , हळूवार चालत ,4 वर्षा पूर्वी माझ्या क्लिनीक मधे आलेली. चेह-याकडे पाहताच पूर्वी च परिस्थिति ने होरपळलेली आणि लढ़ा देणारी ,ती आश्वासक चेह-याची वाटली होती आणि तेथून सुरुवात झाली आमच्या चिकित्सेच्या प्रवासाची.
आपण एकटे पडलो तरी काय आपल्याला जगायचे आहे , हाच दुर्दम्य विश्वास वेदनेत ही स्वतःलाच उभारी देतो .चारी बाजूने तोफे चा मारा चालू असताना न पडणा-या वा न ढासळना-या गड़ा सारखी ही माणसे असतात.
वयाच्या 35 शी त गर्भाशय काढ़लेले, 15 वर्षा पासून मधुमेह , उच्च रक्तदाब ,अम्लपित्त, अतिसार असलेल्या या मावशी जेव्हा दाखवायला आलेल्या होत्या तेव्हा संपूर्ण शरीरावर सुज होती ,चालताना दम लागायचा आणि इतर बरेच त्रास होते.इन्सुलीन चे 50 Unit सकाळ संध्या चालू होते. तपासणी केल्यावर हे सगळे kidney failure कड़े जात आहे असे लक्षात आले आणि उपचार सुरु केले , पथ्या पथ्य सांगितले
त्यांना उपचार करताना प्रत्येक वेळ मी स्वतःच नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. हळू हळू फरक पडायला सुरुवात झाली , सुज ओसरु लागली ,भुक लागू लागली,जुलाब थांबले , सांधे दुखी कमी झाली .
प्रत्येक वेळेस त्या एकटयाच येत , साधारणतः 5 km चा प्रवास , सोबत एक पिशवी आणि पाण्याची बाटली. सांगितलेल्या तपासणी करून आणत,शांत पणे वेटिंग मधे बसत , कितीही त्रास असला तरी कधी लवकर आत घ्या अस न सांगता , डोळे बंद करून पडून राहत.
डॉक्टर ,मला डायलेसिस करायची गरज पडणार नाही ना , त्यांनी एकदा विचारले
मी म्हणालो ," गरज पडली तर बघु , पण टाळण्याचा प्रयत्न करु "
तस नाही डॉक्टर , मी स्वतः उपचार करु शकते,पण माझ्या साठी मी इतरांना त्रास नाही देवु शकत.
, पुढे serum urea व creatinin कमी झाले व गेल्या 4 वर्षात तशी कधी वेळ आली नाही
कधी यूरिन इंफेक्शन होई ,कधी sugar levels वाढे,कधी BP एकदम low होई , कधी हीमोग्लोबिन 7 वर गेले , कधी चकरेचा त्रास,कधी मणक्याचा त्रास अस वाटे ," पुढच्या फॉलो अप ला आता काही या येणार नाहीत , पण त्या परत येत , अजुन एक नवी तक्रार घेवून , असे चढ़ उतार चालू राहत , एक त्रास बरा झाला की दूसरा ,पण त्या लढ़ा देत ,आशावाद कायम ठेवत माझ्या ज्ञानाला ,अनुभवाला ,शास्त्रा ला आव्हान देत प्रवास चालू असायचा.
एकदा मावशी त्यांच्या सारखाच एक मधुमेहाचा रुग्ण घेवून आले ," अहो डॉक्टर ,यांना Diabetes आहे ,औषधी काही घेत नाहीत , तपासा यांना.
मी सर्व तपासणी केली , पाहतो तर काय , साखर 600 पार गेलेली ,चक्कर ,थकवा, निद्रानाश आणि गेली 3 महीने औषधी घेतलेली नव्हती "
मी सांगितले," अहो ,अस करून कसे चालेल,औषधी घ्यावी लागतील,पथ्य पाळ!वे लागेल ,नाहीतर तुम्हाला Admit करून चिकित्सा करावी लागेल " मधेच बोलत मावशी म्हणाल्या होत्या ,'अग बाई , तुला मूल बाळ आहे ,घर आहे ,पेंशन आहे ,अस करु नकोस "
शेवटी ती स्त्री औषधी घेवून गेली
आमचे उपचार चालू च होते बरेचसे त्रास बरे होत होते , इंसुलिन चे यूनिट ही कमी होत होते मधेच परत एखादा त्रास उदभवायचा.
3 महीन्यानंतर मावशीने सांगितले ," डॉक्टर ,तुमच्याकड़े एक patient आणला होता ,आठवतो का ? अमुक अमुक , "हा हा आठवतो " हा त्याच काय ?
तो गेला काल , तुमची औषधी पण घेतली नाही तिने
माणसे एकदा मनाने खचली की तेव्हाच ती मरतात , आजार तर मग निमित्त ठरत .
दवाखाने फक्त औषधी देण्याची जागा न बनता माणस उभारण्याची केंद्र बनली पाहिजेत ,केवळ शरीराने च् नव्हे तर मनाने . कधी शब्दाचा आधार पुरेसा असतो बूड़णा-यासाठी मात्र ती शब्द आपल्या माणसाची हवेत. सतत पैश्यामागे पळनारी नवी पीढ़ी जुन्या साठी थांबेल का ? तुम्ही तुमचे भविष्य घडवत असताना तुमचा हा भूत काळ गमवु नका .
डॉक्टर ," तुमच्या कड़े पित्ताशयातील खड्या साठी औषध आहे का ? डॉक्टर म्हणत आहेत operation करा , तुम्ही काही करु शकाल का ? काल खुप पोट दुखले"
मी म्हणालो , प्रयत्न करु ,शक्यतो operation टाळू
मावशी ने माझ्यासाठी परत एक नवे टास्क आणले होते आणि मी परत तयारीला लागलो '"

मी जिंकलो नव्हतो
मावशी हार मानत नव्हत्या
Diabetes आम्हाला झुंजवत होता
मला मात्र माहीत होत

न हारलेली माणसे नेहमी जिंकलेली च असतात

@ डॉ. अमोल ना देवरे
श्री मेहेरविश्व आयुर्वेद पंचकर्म क्लिनीक

                                        @डॉ.अमोल देवरे मागे एकदा  अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यानी सांगितले ,"अ...
14/06/2019


@डॉ.अमोल देवरे
मागे एकदा अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यानी सांगितले ,"अमेरिकेतील मुलांसमोर सर्वात मोठा धोका आहे तो childhood obesity चा अर्थात लहान मुलातील स्थूल पणा आणि याचा परिणाम मुलांच्या शारीरिक ,मानसीक ,सामाजिक , बौद्धिक भावा वर होत आहे,
त्यांची भिती आता केवळ अमेरिके पुरते नसुन वैश्विक समस्या बनली आहे .विशेषतः 5 वर्षा पासून 15 वर्षा पर्यन्त ही समस्या आता आढळून येत आहे .

#लक्षणे -चालताना दम लागने , भरपूर घाम येणे,भरपूर भुक लागने,खुप तहान लागने,मलावष्टम्भ , पाय दुखने, झोप भरपूर येणे अथवा न येणे , आळस, हालचाली हळू वार होणे,चीड़ चीड़ पणा वाढणे किवा मुले एकदम शांत होणे,स्मरण शक्ति कमी होणे, मानसिकता बिघड़णे इथ पासून मधुमेह,उच्च रक्तदाब , हॉर्मोन्स चे असंतुलन, अस्थिक्षय इ लक्षणे व आजार मुलांमधे आढळून येत आहेत.
मुलांचे लाड करताना व सर्व सुख सोयी देताना पालक याकडे कानाडोळl करतात आणि अचानक काही त्रास झाल्यावर जागे होतात

#कारणे: याची कारणे सध्या आपल्या जीवन शैली शी निगडित आहेत , असे असले तरी ही समस्या केवळ उच्च व सम्पन्न आर्थिक स्थिति असलेल्या वर्गा पूरती मर्यादित नाही.
•मुलांमधे सर्वात महत्वाचा जो आहार आहे तो बदलत आहे ,
फास्टफूड, biscuits,खारी इ मैदा व त्याचे पदार्थ , तैलीय आहार , साखर युक्त पदार्थाचे वाढते प्रमाण , colddrinks,ज्यूस,चॉक्लेट,pastery,, केक व डबाबंद आहार वाढत आहेत , ब्रेड ,पाव तसेच इतर Fermented फूड्स , सॉस,जाम,जेली,चायनीज,अजीनोमोटो सारखे पदार्थ,मैगी,अधिक कैलोरीज़ चा आहार
Cold व freezed फ़ूड इ चा वापर वाढलेला दिसतो
त्या तुलनेने शारीरिक व्यायाम,कसरती, हालचाली कमी होत आहेत , Tv, मोबाइल इ वर कार्टून व वीडियो games मुळे मैदानी खेळ कमी होत आहेत
सतत बसुन राहील्याने चयापचय शक्ति मंद होत आहे परिणामी आहाराचे पचन व्यवस्थित होत नसल्याने पोटाचे आजार व स्थूलता वाढत आहे.
• दूसरा महत्वाचा घटक म्हणजे झोप
सकाळ ची शाळा आणि रात्री उशिरा झोप यामुळे आहाराचे पाचन व्यवस्थित होत नाही , परिणामी बऱ्याच मुलात पोट साफ न होने ही तक्रार जाणवते त्यातून पुढे व्यवस्थित भुक न लागने व पचनाच्या तक्रारी व परत स्थूलता असे चक्र चालू होते
* बरीच मुले जेवताना मोबाइल, TV ,कार्टून पाहत जेवतात परिणामी सर्व लक्ष ताटात न राहाता TV मधे असल्याने आपण किती खातोय हे मुलांना कळत नाही , जास्त आहार जातो व स्थूलता वाढते
* मैदानी खेळ व कसरती कमी झाल्याने स्थूलता वाढत आहे त्यासाठी वेळ देने गरजेचे आहे.
* मानसिक दबाव - वाढती स्पर्धा , भविष्याची चिंता,पालकाच्या अपेक्षा , सर्व क्षेत्रात परफेक्ट असावे अशी ईच्छा याखाली मुलांची कुचंबना होत आहे यामुळे शरीरात पाचक स्त्राव कमी होत आहेत परिणामी स्थूलता वाढत आहे
* Hormonal imbalance : 13 ते 16 या वयोगटात विशेषतः मुलीं मधे अंतः स्त्रावी ग्रन्थि चे असंतुलन झाल्याने मासिक पाळी च्या तक्रारी व Thyroid सारखे आजार वाढुन स्थूलता वाढत आहे
* अलिप्तता आणि सामाजिक दबाव
स्थूल मुलास इतर मुले व समाज चेष्टा व थट्टेचा विषय समजतात , वारंवार टोमने मारल्याने मुले दुखी होवून अलिप्त होतात , समाजात मिसळत नाहीत याने एक तर ते हिंसक बनतात किवा भीत्रे होतात

#प्रकृती: दिसण्यास जाड़ दिसनारी मुले जरूरी नाही की स्थूल च आहेत किवा ओबेसिटी आहे
जर आई वडील प्रकृतिने उत्तम बांध्याचि असतील मूल लहान पणा पासून तसेच दिसत असेल तर ही त्यांची मूळ प्रकृति समजावि जर त्यास् कोणताही त्रास नसेल तर आयुर्वेदानुसार यास कफ प्रकृति समजावि व अट्टाहासाने त्याचे वजन कमी करण्याच्या मागे लागू नये

#उपाय :
सर्व बाबी चा विचार करता पुढील उपाय योजावेत
1) आहार कोणता घेवु नये किवा कधीतरी मर्यादित घ्यावा याचे वर्णन वर केलेले आहे , तो टाळ|वा किवा मर्यादित असावा
2) ताजे गरम अन्न खावे , भाज्या, फळे, डाळी यांचा समावेश असावा
3) Tv व मोबाइल पाहत जेवू नये
4) दिवसातुन 2 तासा पेक्षा अधिक काळ TV पाहू नये
5) रोज एक तास मैदानी खेळ खेळ!वेत
6) स्विमिंग,क्रिकेट,दोरीवरच्या उडया,badminton इ खेळ खेलावेत
7)मुलांचे फाजिल लाड करु नयेत व अति दबाव ही त्यांच्या वर टाकू नये
8)रात्री ची झोप पूर्ण होवु द्यावी त्यासाठी लवकर झोपावे
9) जेवायला मागल्या शिवाय मागे लागून जास्तिचा आहार देवु नये
10)दूध व फळे पौष्टिक आहेत म्हणून अधिक मात्रेत देवु नये , अंडी , मांसाहार प्रमाणात असावा
11)काही तक्रार दिसल्यास व स्थूलते साठी आयुर्वेद उपचार व पंचकर्म करावे , आहार मार्गदर्शन घ्यावे

वरील सर्व उपचार व काळजी घेतल्यास childhood ओबेसिटी चा त्रास आपण वाचवु शकतो व चपळ,हुशार ,आनंदी भावी पीढ़ी आपण निर्माण करु शकतो

श्री मेहेरविश्व आयुर्वेद पंचकर्म क्लिनीक
औरंगाबाद
14/06/2019

22/12/2018

#सहज मिळणारी आयुर्वेद औषधी आरोग्यासाठी घातक

अहो, आयुर्वेद औषधीचे काहीही sideeffects नसतात
तुम्ही ना हे औषध वापरून पहा ,
मी रोज कारल्याचा,दुधी चा रस घेते अमुक अमुक मैगज़ीन मधे वाचले आहे
अहो , तुमच्यासाठी हे तैल मागवु का,बघा चांगले results आहेत म्हणे
पोट साफ होत नाही , हे अमुक अमूक चूर्ण घ्या बघा
कसे ,सकाळी पोट साफ , चकाचक
मी कालच online पाहिले आहे , माझा हा आजार आहे आणि त्याला अश्वगंधा घ्या म्हणून सांगितले आहे , मी आणणार आहे
डॉक्टर , आम्ही अमुक अमुक चा च्यवनप्राश घेतो चांगले असते ना
मित्रा, ते शिलाजीत मागवले आहे एक हिमालयातील कंपनी आहे तुला मागवु का ,फक्त 10000 रु ओरिजनल

आजच्या माहितीच्या युगात रोज अशा प्रकारे स्वतःच्या मनाने लोक औषधी घेतात आणि त्रास झाला,फसले गेले की लोक आमच्याकड़े येतात आणि अहो ,आयुर्वेद औषधीला तर side effects नसतात मग ,का बर मला त्रास झाला ,असे विचारतात

हो, जर योग्य आयुर्वेद डॉक्टरांकडे जावून , योग्य तपासणी करून , निदानांति औषधी घेतली तर दुष्परिणाम होत नाहीत
पण स्वतःच्या मनाने , स्वतःच निदान करून जर online मागवले तर भयानक दुष्परिणाम होतात प्रसंगी जीव पण गमवावा लागू शकतो

एवढच काय वर्तमान पत्र ,जाहिरात,TV वरील मुलाखती यातील सल्ले किवा आहार जरी चुकीचा झाला तर त्रास होतो
Homeminister भावजी चा किस्सा माहित आहे ना
कडू दुधी मुळे कशी विषबाधा झाली , तसेच पुण्यात एका IT engineer चा मृत्यु झाला होता
तरी बरे ,नुकताच उच्च न्यायालयाने online medicines वर stay आणला

लोकहो , कोणतेही औषध,आहार,दिनचर्या,व्यायाम,योगासने,मध,गोमूत्र,गरमपानी,वेट लॉस थेरेपी, उपवास,एखादा अमुक अमुक पैटर्न तज्ञ आयुर्वेद वैद्याच्या सलल्याने च् चालू करा , स्वतःच्या मनाने करु नका

अहो, एक रुग्ण तपासण्यासाठी वैद्यास
त्याची नाड़ी, मल,मूत्र, जिव्हा,आकृति,अग्नि,निद्रा,भुक,तहान स्पर्श ,प्रत्यक्ष उदर तपासणी ,त्याचा इतिहास ,आहार पद्धति त्यात अपथ्य काय होत आहे ,त्याची मानसिक स्थिती पूर्वीच्या तपासन्या , 10 प्रश्न विचारावे लागतात
मग ,कुठे निदान होते
त्यानंतर शेवटी औषध असा क्रम असतो
तेव्हा कुठे उपशय मिळतो

आता ,कुणी इतकी तपासणी न करताच औषधी सांगत असेल तर नक्कीच तो अन्तर्यामी असावा

त्यामुळे सध्या च्या माहिती च्या युगात
चुकीच्या माहितीच्या आधारे काहीही
औषधी घेवून जिवाशी खेळू नका

श्री मेहेरविश्व आयुर्वेद पंचकर्म क्लिनीक
@डॉ.अमोल ना. देवरे
औरंगाबाद

तुमचे हित कशात आहे , अहित कशात आहे सुखकर काय आणि दुःख कर काय आहे हितकर आयुष्य कसे असते आणिअहितकर आयुष्य कसे असते या बद्द...
30/10/2018

तुमचे हित कशात आहे , अहित कशात आहे
सुखकर काय आणि दुःख कर काय आहे
हितकर आयुष्य कसे असते आणि
अहितकर आयुष्य कसे असते
या बद्दल सखोल माहिती देणारे , याचे मान ज्यात आहे ते शास्त्र म्हणजे #आयुर्वेद

श्री मेहेरविश्व आयुर्वेद पंचकर्म क्लिनीक
औरंगाबाद

Address

Aurangabad
431001

Telephone

+919422858939

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Mehervishwa Ayurved Panchakarm Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Mehervishwa Ayurved Panchakarm Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram