17/08/2022
श्रावण संपत आलाय तसा 'कडक ' उपवास करणाऱ्या काही जणांना काही त्रास होतांना दिसत आहेत .
(अशक्तपणा , पित्तवाढणे , चक्कर येणे ,तोल जाणे, मूळव्याधीच्या तक्रारी अशी लक्षणे दिसत आहेत.)
उरलेल्या काही दिवसांसाठी 'सामान्य ' पथ्य पाळणे हितकारक ठरेल .
१. उपाशीपोटी चहा घेऊ नये .
२. चहा घेतल्या नंतर साधारण ३० मिनिटाने फळ सोडून काहीतरी खावे .
३. साबुदाणा वर्ज्य करावा .
४. साबुदाणा खिचडी करायचीच असेल तर त्यात हिरव्या मिरचीचा व शेंगदाणेचा जास्त वापर करू नये .
५. तेलकट पदार्थ - चिवडा , वेफर्स , साबुदाणा वडा इत्यादी घेऊ नये .
६. शेंगदाणा चिक्की उपवासाला चालत असली तरी तब्येतीला चालते का पहावे .
७. फक्त बाऊलभर दही असे करू नये .
८. १०-१२ तास उपाशी राहू नये . ३ तासांनी खजूर , सुके अंजीर , मनुके थोडे खावेत .
९. राजगिरा लाडू , राजगिरा पीठ , उपवास भाजणी थालीपीठ , रताळे (खिस करायचा असेल तर तुपात करावा ) , उकडलेले /भाजलेले रताळे आणि दूध , इत्यादी..
असे तब्येतीला सोसेल पचेल आणि मानवेल इतक्या प्रमाणात घ्यावेत .
१० . फळांच्या बाबत डाळिंब उत्तम . ड्रॅगन फ्रुट किंवा एखादी किवी खाण्या पेक्षा वाटीभर डाळिंबाचे दाणे खाल्लेले उत्तम !
हे उपवासाचे 'डाएट ' नाही . उपवासाचा अतिरेक केल्याने शरीरावर काय तोटे होतात आणि धर्म -श्रद्धा यांना बाधा न येता आपण काय मार्ग काढू शकतो ते सुचविले आहे . उपवास इतकाही करू नये की हायपोग्लायसेमिया होऊन तुमच्या तब्येतीसाठी त्रासदायक होईल.
सुवर्णमध्य काढावा . त्यातच आरोग्य आहे .
*वैद्य किरण भोजराज, वैद्य श्रुती भोजराज*
एम ड़ी आयुर्वेद
😃*स्वस्थ रहा व्याधी मुक्त जगा* 😃
*मुक्ता आरोग्य मित्र*
एक पाउल व्याधी मुक्त रहाण्यासाठी .
*मुक्ता आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय*
फ्लॅट न. 1, आनंद अपार्टमेंट, मयुर्बन कॉलनी, गादियाविहर रोड, औरंगाबाद.
फोन - 7350561419
8421951589