22/04/2022
'हेल्दी सोसायटी'च्या आरोग्य दिन विशेषांकाचे
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रकाशन
औरंगाबाद: औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या व अल्पावधीतच मराठी भाषेतील एकमेव लोकप्रिय आरोग्य विषयक 'हेल्दी सोसायटी' या मासिकाच्या आरोग्य दिन विशेषांकाचे प्रकाशन संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १८) एमजीएम विद्यापीठातील आचार्य विनोबा भावे सभागृहात झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विभागीय अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव निलेश राऊत, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय सपकाळ, प्राचार्य प्रतापराव बोराडे, उद्योजक सुनील किर्दक, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. रेखा शेळके, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, हेल्दी सोसायटीचे संपादक अभिजीत हिरप, निखिल भालेराव, ऋषिकेश डोणगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी 'हेल्दी सोसायटी' मासिक आणि टीमला पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या.