Bidkin DMIC, AURIC City, Chhatrapati Sambhaji Nagar

Bidkin DMIC, AURIC City, Chhatrapati Sambhaji Nagar Unofficial Page


Bidkin is a significant node within the Delhi-Mumbai Industrial Corridor (DMIC).

It's part of the broader Shendra-Bidkin Industrial Area (SBIA), a major industrial hub located in Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra.

उद्या दि. ०८ जानेवारी ते ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र एडवांटेज एक्सपो शेंद्रा करमाड डीएमआयडी येथे पार पडणार आहे.राज्याचे ...
07/01/2026

उद्या दि. ०८ जानेवारी ते ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र एडवांटेज एक्सपो शेंद्रा करमाड डीएमआयडी येथे पार पडणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार असून ४ दिवस हा एक्सपो चालेल, देशातील प्रमुख कंपन्यांचे स्टॉल यामध्ये असून युवकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी हा एक्सपो म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे.

मराठवाडा तसेच बिडकीन डीएमआयसी मधे नव्याने सुरू होत असलेल्या कंपन्या व शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट दुसऱ्या देशात निर्यात ...
07/01/2026

मराठवाडा तसेच बिडकीन डीएमआयसी मधे नव्याने सुरू होत असलेल्या कंपन्या व शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट दुसऱ्या देशात निर्यात करण्यासाठी जालना ड्रायपोर्ट महत्वाची भूमिका बजावेल व यावर्षात हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल.

दिव्य मराठी ८-०१-२०२६
07/01/2026

दिव्य मराठी ८-०१-२०२६

“मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (मसिआ)” आयोजित बहुप्रतिक्षित ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो च...
05/01/2026

“मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (मसिआ)” आयोजित बहुप्रतिक्षित ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो ची तयारी अंतिम टप्प्यात

“८ ते ११ जानेवारी रोजी शेंद्रा डीएमआयसी, ऑरिक सिटी मधे आयोजित केलेला हा एक्सपो केवळ उद्योग प्रदर्शनच नव्हे, तर नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी हा एक्स्पो हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.”

प्रदर्शनाच्या ठिकाणी ठिकठिकाणी ‘क्यूआर कोड’ लावले जाणार आहेत. इच्छुकांनी हा कोड स्कॅन करून आपला बायोडाटा अपलोड केल्यास, तो थेट संबंधित उद्योगांकडे वर्ग केला जाईल. यामुळे कुशल मनुष्यबळ आणि उद्योजक यांच्यात दुवा साधला जाणार आहे.

"यंदाच्या प्रदर्शनाने भव्यतेचे सर्व विक्रम मोडले आहेत. २९ एकरच्या विस्तीर्ण जागेत ३ महाकाय डोम आणि पॅगोडा उभारण्यात आले आहेत. २०२३ मध्ये ६५० स्टॉल्स होते. मात्र यंदा ही संख्या १५२८ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ऑटोमोबाइल, आयटी, कृषी, स्टार्टअप्स आणि एनर्जी क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे."

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिग्गज नेते, उद्योगपती
या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे, तसेच जास्तीत जनतेने या एक्सपो मधे सहभाग घ्यावा असे आवाहन MASSIA तर्फे करण्यात आलेले आहे.

नव्या वर्षात ८ हजार एकर भूसंपादन, २ नव्या एमआयडीसींमुळे वाढणार गुंतवणुकीचा ओघ, कार्यालयीन हालचालींना वेग येणार असून प्रत...
03/01/2026

नव्या वर्षात ८ हजार एकर भूसंपादन, २ नव्या एमआयडीसींमुळे वाढणार गुंतवणुकीचा ओघ, कार्यालयीन हालचालींना वेग येणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

औद्योगिक क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या शिरपेचात या वर्षी मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शहरातील 'ऑरिक बिडकीन मध्ये आलेल्या मोठ्या उद्योग प्रकल्पांनंतर आता याच भागात 'ऑरिक टप्पा ३ साठी ८ हजार एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचे नियोजन आहे.

याशिवाय शहरालगत आरापूर, सटाणा ही २ नवी औद्योगिक क्षेत्रे (एमआयडीसी) उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे नव्या वर्षातही दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि लाखो हातांना काम मिळण्याची खात्री आहे.

गेल्या वर्षांत ऑरिक सिटी आणि शेंद्रा-बिडकीन पट्ट्यामुळे शहराचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले. मात्र, वाढती मागणी आणि नवीन उद्योगांचा ओघ पाहता, सध्याची औद्योगिक क्षेत्रे अपुरी पडू लागली. हीच गरज ओळखून सरकारने याच भागाचा विस्तार करण्याचे ठरवले असून आणखी ८ हजार एकरांचे संपादन करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याशिवाय शहरातील औद्योगिक गरज ओळखता वाळूजशेजारील आरापूर, शेंद्रा एमआयडीसीजवळ सटाणा या २ ठिकाणी एमआयडीसी घोषित केली आहे. २०२६मध्ये बिडकीनमधील भूसंपादन आणि दोन्ही एमआयडीसींच्या उभारणीसाठी सरकारने पावले उचलण्यासही सुरुवात केले आहे. त्यामुळे उद्योगांच्या जागेचा प्रश्न सुटणार आहे.

-दिव्य मराठी ०३-०१-२०२६

02/01/2026
बिडकीन औद्योगिक वसाहतीत वाहन निर्मिती उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे मिळणार १० हजार जणांना रोजगाराच्या संधीटोयोटापाठोपाठ २१ ...
27/12/2025

बिडकीन औद्योगिक वसाहतीत वाहन निर्मिती उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे मिळणार १० हजार जणांना रोजगाराच्या संधी
टोयोटापाठोपाठ २१ ऑटो व्हेंडर कंपन्याची ९४०० कोटींची गुंतवणूक.

बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये टोयोटा, एथर, जेएसडब्ल्यू या वाहन निर्मिती उद्योगांनी गुंतवणूक केल्यानंतर हायब्रीड व ईव्ही उद्योगांशी संलग्नित असलेल्या २१ मोठ्या उद्योगांनी भूखंड घेतले.

टोयोटानंतर ९४०० कोटींची गुंतवणूक व्हेंडर कंपन्यांनी केली आहे, या कंपन्यांच्या माध्यमातून थेट १० हजार १९० जणांना रोजगार मिळणार आहे. बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये वाहन निर्मिती उद्योग सुटे भाग, बॅटरी निर्मिती उद्योगांनी केलेल्या या गुंतवणुकीमुळे येत्या काही वर्षांत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असून, यासंदर्भात गुंतवणूक केलेल्या कंपन्यांनी घोषणाही केली आहे.

बिडकीनमध्ये २२ ते २५ उद्योग सध्या जागा नसल्यामुळे वेटिंगवर आहे, पुढील ८००० एकर जमीन अधिग्रहण केल्यावर बिडकीन डीएमआयसी मधे उद्योगिक जमीन उपलब्धत होऊन अधिक कंपन्याची गुंतवणूक वाढणार आहे.

Credit- दिव्य मराठी

A South Korean electric four-wheeler company is set to invest ₹15,000 crore in Bidkin DMIC, Chhatrapati Sambhajinagar, T...
26/12/2025

A South Korean electric four-wheeler company is set to invest ₹15,000 crore in Bidkin DMIC, Chhatrapati Sambhajinagar, This will boost the region's EV manufacturing capabilities.

Wait n watch

नासिक कुंभमेळ्याची जय्यत तयारी .नासिक ला 66 किलोमीटर  परिक्रमा मार्गाची निविदा प्रसिद्ध . 3200 कोटींचा खर्चाची तरतुद . ए...
20/12/2025

नासिक कुंभमेळ्याची जय्यत तयारी .नासिक ला 66 किलोमीटर परिक्रमा मार्गाची निविदा प्रसिद्ध . 3200 कोटींचा खर्चाची तरतुद . एकुण सात टप्यात बांधकाम होणार .अगामी कुंभ मेळ्याच्या पार्श्वभुमीवर विविध सुव्यवस्था विकास कामांना गती .नासिक चा चेहरा- मोहरा बदलणार. नासिक चा रूपडं पालटणार ...!!

Grab the opportunity
19/12/2025

Grab the opportunity

15/12/2025

छत्रपती संभाजीनगर देशाच इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल..!!

13/12/2025

मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे, त्यामुळे महाराष्ट्राला AI हब बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल!

माइक्रोसॉफ्ट का सबसे बड़ा निवेश महाराष्ट्र में हो रहा है, इसलिए महाराष्ट्र को AI हब बनाने की दिशा में माइक्रोसॉफ्ट महत्वपूर्ण भूमिका निभाएगा।

( Microsoft AI Tour| मुंबई | 12-12-2025)

Address

Shendra Bidkin Delhi Mumbai Industrial Corridor(Bidkin DMIC), AURIC City
Aurangabad
431105

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bidkin DMIC, AURIC City, Chhatrapati Sambhaji Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram