20/05/2026
हार्टमध्ये ब्लॉकेज दिसलं म्हणजे ते फक्त औषधांनी पूर्णपणे नाहीसं होतं का? 🤔
डॉक्टरांनी दिलेली औषधे ब्लॉकेज गायब करत नाहीत, पण नवीन ब्लॉकेज होण्यापासून संरक्षण करतात आणि आधीचे ब्लॉकेज स्थिर ठेवून हार्ट अटॅकचा धोका कमी करतात. ❤️
काही रुग्णांमध्ये सौम्य किंवा मध्यम ब्लॉकेज असल्यास योग्य औषधे + जीवनशैलीतील बदल यामुळे दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येऊ शकतं. त्यामुळे स्वतःहून औषधे बंद करू नका आणि “ब्लॉकेज पूर्णपणे काढून टाकतो” अशा खोट्या दाव्यांपासून सावध रहा. ⚠️