04/11/2024
सर्व सध्या रुग्ण असणाऱ्या आणि हाय रिस्क गटातील सध्या आजार नसलेल्या नागरिकाने
१७% पॉप्युलेशन - किडनी विकार माहित नसलेले पण किडनी इजा असलेले
१०% पॉप्युलेशन - हृदय विकार ( हार्ट फेलियर, कोरोनरी अथरोस्क्लेरो सिस , ठोके अनियमितपणा )
१०% पॉप्युलेशन - मधुमेह , प्रिडियाबेटिस इनक्लूडेड नाही
२५% अडल्ट्स - अतिउच्चरक्तदाब
१०% एल्डर्ली - वयोमानपरत्वे अवयय रिज़र्व कमी झालेले नागरिक यांनी हा लेख वाचावा , त्यावरील प्रतिक्रिया नोंदवावी ,
आपल्या फैमिली डॉक्टरला प्रश्न विचारावे
भारतात आजार - इलाज याविषयी
जनतेचे , वैद्यकीय व्यवसायिकाचे अज्ञान -
मला जाणवलेले एक सत्य
माझ्या ३५ वर्षाच्या रूग्ण सेवेमध्ये मला प्रकर्षाने जाणवलेले सत्य - रुग्ण , नॉन आलोपथिक डॉक्टर्स ३ प्रकारचे असतात
१. आजाराचे मूळ समजून घेऊन त्यावर इलाज मागणारे , करणारे - रास लीला करणारे
२. आपल्या कुटूंब व्यवस्थेत - रुग्ण कुटुंब प्रमुख असल्यास आणी नसल्यास - कुटुंबावर अवलंबून असल्यास इलाज गांभीर्य फरक …. कुटुंबप्रमुखाच्या / नातेवाईकाच्या सोयीने इलाज करणारा , फक्त सिम्प्टोमॅटिक इलाज करणारा दवाखाना ( अनेमिया - सीकेड मुळे असला तरी फक्त ब्लड ट्रांसफ्यूजन देऊन, सीकेडी चा इलाज न करता सुट्टी देणे )
३. फक्त इमरजेंसी टू इमर्जन्सी दवाखाना ( आडवे पडेपर्यंत कोणत्याही आजाराला महत्त्व न देणारा - मग भले तो मधुमेह , अतिउच्चरक्तडाब , कैंसर , किडनी , हृदय , मेंदू आजार असला तरी ही , ही भारतातील रुग्णाची खासियत आहे .
सर्व आयसीयू तून सुट्टी झाल्यानंतर किती रुग्ण , ( आयसीयू इंचार्ज ) निरोगी निरामय जीवनासाठी रुग्णांना असलेल्या आजाराविषयी माहिती घेतात ? देतात ?
किती प्रिवेंटिव्ह जागृती करु शकतात , करतात . रुग्णांना त्याना असणारा आजार सांगता न येणे , क्रोनिक हेल्थ रिज़र्व विषयी माहिती देता न येणे - हे कॉमन आहे )
प्रत्येक ग्रुप चे त्यांच्या वागण्यासाठी समर्पक उत्तर तयार असते . सर्वाना आजार क्युअर करून पाहिजे असतो पण त्याची जबाबदारी ते घेत नाही , किंबहुना डॉक्टर बदलणे , डॉक्टरला ब्लेम करणे , मृत्यू झाल्यास दवाखाना तोडफोड करणे , पैसे आणि आजार दुरुस्ती याचे त्रयराषिक मांडणे हे ऑप्शन्स निवडले जातात .
समाजाला हे कळत नाही की वरील उपायाने रुग्णाचा - आजाराबाबत फायदा होत नाही . वेळेत उपाय न केल्यामुळे नुकसान होते . मोठ्या खाजगी रुग्णालयात डॉक्टर - पेशेंट नातेच तयार होत नाही , डॉक्टर ८ तास कामगार म्हणून काम करतो पुढील ८ तासासाठी वेगळा डॉक्टर - या सिस्टम मध्ये वन टू वन सौवाद होत नाही . असो
प्रिवेंटिव स्टेप्स न घेणे , आजार काँप्लिकेशन्स ( गुंतागुंत ) होईपर्यंत इलाज लांबवणे , हे भारतात कॉमन आहे कारण अज्ञान , गरिबी , क्रॉनिक आजार …
( मधुमेही, अतिउच्चरक्तदाब, सीकेडी , हृदय विकार , जीवनशैली याकडे लक्ष न देणें ही फॅशन झाली आहे ) .
सर्व अवयव रिज़र्व तपासणी नियमित करून आजाराचे आधी निदान नंतर गुंतागुंतीपूर्वी इलाज करण्याचा अट्टाहास असलेल्या रुग्णाचे भले होण्याची शक्यता जास्त असते .
माझे आब्ज़र्वेशन रुग्णाची हे कळण्याची कुवत नसते , त्याला बरे वाटणे , गोड गोड बोलणारे डॉक्टर , डॉक्टरला जे माहित आहे तोच इलाज योग्य ( ऑप्शन्स ची चर्चा , पर्याय निवडण्यांची कुवत १०% रुग्णापेक्षा कमी लोकात आढळते ) , आजार एक डॉक्टर वेगळा ( खेड्यात सर्व रोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे - सर्व रोगाचा इलाज एकाच डॉक्टरकडून करून घेण्याची प्रथा - फैमिली फिजिशियन संकल्पना भारतात सर्वदूर मंजूर आहे - त्यामध्ये महत्वाचा वेळ वाया जाऊन गुंतागुंत झाल्यानंतरच रुग्ण मध्यरात्री स्पेशलिस्ट कडे - आयसीयू मधे पोहोचतो )
यावर उपाय काय
पब्लिक - पेशंट एजुकेशन प्रोग्राम
सर्व अवयवांच्या तज्ञाने क्यूरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह एजुकेशन - उपचाराची जबाबदारी घेणे , पब्लिक ने हाई रिस्क गटातील लोकाने नियमित स्वतःचे स्क्रीनिंग करून घेऊन योग्य तो प्रिवेंटिव लाइफस्टाइल बदल करून - माहिती , जबाबदारी घेऊन आजार रास लीला औषधी योजना समजून घेऊन स्वतः अवयव रिज़र्व मॉनिटर करणे हा एकमेव स्वस्त उपाय असतो . अवयव रिज़र्व संपल्यानंतर चा इलाज अतिशय महाग , आयुष्य न वाढवता आल्यामुळे - कमी करणारा ठरतो .
थोडक्यात आजारी रुग्णाने आजारासाठी आजाराच्या तज्ज्ञाकडून आधी प्रिवेंटिव नंतर ऑर्गन सपोर्ट इलाज करावा . नातेवाईकावर अवलंबून राहू नये . त्याना रुग्णाला होणाऱ्या त्रासाची , आजाराच्या स्टेज ची कल्पना नसल्यामुळे - होणारा उशीर नुकसानदायक ठरतो .