30/04/2026
आस्था फाउंडेशन औरंगाबाद (CSN) या ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार सेवा देणाऱ्या संस्थेच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा !!
दिनांक २० एप्रिल २६ रोजी आस्था फाऊंडेशनला 'अमर ऊर्जा` हा पुरस्कार दादर, मुंबई येथील अमर हिंद मंडळा तर्फे प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ९० संस्थांच्या कार्याचा अभ्यास करून प्रथम ५ संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील आस्थाच्या बसंत प्रभा विसावा या ठिकाणी असणाऱ्या निवासी ज्येष्ठांच्या गरजा ओळखून देण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण व दर्जेदार सेवेबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.
आस्था फाऊंडेशन औरंगाबाद (CSN) या संस्थेला मिळालेला पुरस्कार हा आस्थाच्या कार्याशी जोडल्या गेलेल्या सर्व व्यक्ती आणि इतर अनेक संस्था यांच्या अथक परिश्रमाची पावती आहे.