08/06/2025
३१ मे हा दिन ' जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. ए.ए. कादरी मानसिक आरोग्य केंद्रातर्फे तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती निर्माण व्हावी व सोबतच समाजामधील विविध घटकांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे वक्तृत्व स्पर्धा व रिल बनवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तंबाखूच्या हानिकारक परिणामांबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे व तरुण पिढीला तंबाखूमुक्त जीवनशैलीकडे वळवणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे २०२५ रोजीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त 'तंबाखू च्या व्यसनापासून भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करणे व व्यक्तींना तंबाखूचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करणे' हि काळाची गरज आहे या घोषवाक्याखाली हा दिन साजरा करत आहे. या स्पर्धांसाठी शहरातील विविध महाविद्यालये व शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजीज अहमद कादरी हे होते. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून झेड पी चे सी ई ओ श्री अंकित सर (भा,प्र.से.) आणि छ. संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीण च्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग (आय.पी.एस.) हे लाभले होते. स्पर्धांच्या विजेत्यांसाठी बक्षिसे ठेवण्यात आले होते. त्यात दोन्ही स्पर्धांसाठी अनुक्रमे प्रथम पारितोषिक ५०००रू. द्वितीय पारितोषिक ३०००रू व तृतीय पारितोषिक २०००रू ठेवण्यात आले होते.
स्पर्धांच्या मूल्यांकनासाठी पंच म्हणून डॉ. नेहा सोधी (डेंटिस्ट), डॉ. हसीब फारुकी (एम.बी.बी.एस., डि.पी.एम.), प्रा. श्री. रफीउद्दीन नासेर, कु. अर्पिता शरद (मीडिया ऍनालिटिक्स ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.अजीज अहमद कादरी, डॉ. मेराज कादरी, श्रीमती अंजुम कादरी यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ सय्यद जफर, विजय सोनोने, मोहम्मद नजीर व मानसिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापन टीम बियॉंड चे अनस देशमुख, अकिब खान, शाहेद कासमी व टीम ने केले.