12/11/2024
या वर्षी 15 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र असता सहकुटुंब म्हणजे स्त्रियांना याच दिवशी कार्तिकस्वामी दर्शन घेता येते. परंतु कृत्तिका नक्षत्र सायंकाळी 09:55 वाजता लागते त्यामुळे ज्या स्त्रियांना शक्य आहे त्यांनी सकाळी सूर्योदयापूर्वी पर्यंत दर्शन घ्यावे. ज्यांना आर्थिक चन चन भासते अशांनी कार्तिक स्वामी दर्शनाला जाताना दोन पाणी असलेला नारळ,दोन मोर पिस सोबत न्यावे. एक नारळ व एक मोर पिस कार्तिक स्वामिंना अर्पण करावा व एक नारळ व एक मोर पिस कार्तिक स्वामींच्या पायास स्पर्श करून घरी आणावा तसेच एका कोऱ्या नोटेवर पुढील मंत्र लिहून ती नोट पाकिटात अथवा देव्हाऱ्यात ठेवावी तसेच मोर पिस व नारळ पूजेत ठेवावा. मंत्र - ओम् षण्मुखाय विद्महे महसेनाय धिमही l तन्नो षष्ठ प्रचोदयात वर्षभर पूजा करून पुढील वर्षी पुन्हा एक पाणीवाला नारळ व दोन मोर पिस घेवून घरी पुजलेला नारळ व एक मोर पिस कार्तिक स्वामीना अर्पण करावा व नवीन विकत घेतलेला नारळ व एक मोर पिस स्वामींच्या पायाला स्पर्श करून घरी आणावा. या उपायाने आर्थिक चण चण भासत नाही.