Dr.Lad Shilpa Dental Clinic & Shilpa Hospital

Dr.Lad Shilpa Dental Clinic & Shilpa Hospital All types of Dental treatment and surgery's with luxurious pattern and Pediatrician of multi specia

हसणं तुमचं, काळजी आमची!दातांशी संबंधित प्रत्येक समस्येवर परिपूर्ण उपाय — डॉ लाड यांचे शिल्पा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिन...
04/05/2025

हसणं तुमचं, काळजी आमची!
दातांशी संबंधित प्रत्येक समस्येवर परिपूर्ण उपाय — डॉ लाड यांचे शिल्पा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक व इम्प्लांट सेंटर, बार्शी
तज्ञ डॉक्टरांची टीम, अत्याधुनिक सुविधा आणि विश्वासार्ह उपचार, एकाच छताखाली!

हास्य खुलवा, आरोग्य जपा — आजच भेट द्या!
९५४५५९२०००

तोंडाचे आरोग्य = एक सुंदर हास्य!तुमच्या दातांचे आरोग्य राखण्यासाठी, आजच भेट द्या डॉ. लाड यांचे शिल्पा मल्टीस्पेशालिटी डे...
15/04/2025

तोंडाचे आरोग्य = एक सुंदर हास्य!
तुमच्या दातांचे आरोग्य राखण्यासाठी,
आजच भेट द्या डॉ. लाड यांचे शिल्पा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक व इम्प्लांट सेंटर ला!
प्रगत तंत्रज्ञानासह, अनुभवी डॉक्टरांची विश्वासार्ह सेवा तुमच्यासाठी तयार आहे!

#डॉ.लाड #डेंटलकेअर

 #  OSI NATIONAL IMPLANTALOGY CONFERENCE BANGALORE
22/06/2024

# OSI NATIONAL IMPLANTALOGY CONFERENCE BANGALORE

31/05/2024
लिहिणारी माणसं.....कवी लेखक वा साहित्यिक!       जो काही ना काही वाचत असतो...तो वाचक असतो पण जो काही ना काही लिहिण्याचा प...
08/02/2024

लिहिणारी माणसं.....कवी लेखक वा साहित्यिक!

जो काही ना काही वाचत असतो...तो वाचक असतो पण जो काही ना काही लिहिण्याचा प्रयत्न करत असतो तो लेखक असतोच असे नाही...यात मी ही आलोच बरका!🤩..मग असं थोडंसं काही लिहिण्याचा...कागदावर उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या माणसाला म्हणावं तरी काय?हा प्रश्न राहून राहून मला माझ्याच बाबतीत मला स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारावासा वाटतो...😂😂 मी तो तसा मला विचारतो देखील...पण प्रामाणिकपणे सांगतो की अजून देखील ते उत्तर 'लेखक' असे मुळी येतच नाही...ते तसे उत्तर येण्याइतपत मी इतकं काही लिहिलेलेही नाही तेही तितकेच खरे... काहीसं ललित लेखन...ते ही सुचत जाईल तसे...काहीश्या कविता...नि भटकंती नंतर आलेला प्रवासाचा अनुभव असलेले काही प्रवास वर्णन पर लेख...इतकीच काय ती माझी जमा पुंजी... एवढ्याने लेखक थोडीच होता येते...म्हणून मग मी अश्या लिहित्या प्रकारातल्या माझ्यासारख्या काही हरहुन्नरी माणसांचं नामकरण केलं आहे...
"लिहिणारी माणसं"!
खरे तर लिहिण्याची ही गमंतच असते...
कधी कधी तर सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार देखील पाहायला मिळतो...कारण लिहिण्यासाठी काही सुचण्याचाही एक क्षणं असतो..तो क्षणं वेळीच पकडता यायला हवा...
जेंव्हा जेंव्हा 'वाचनाची खिडकी' उघडी असते तेंव्हा तेंव्हा 'सुचण्याचे क्षणं' हे त्या खिडकीतून अधिकाधिक डोकावत असतात..

लेखन व वाचन हे एकमेकांना पुरक आहे. त्यात कोण आधी किंवा कोणते अधिक महत्वाचे हा विषय गौण आहे. कारण उत्तम लेखक हा चांगला वाचक असतो व उत्तम वाचक हा चांगला लेखक बनु शकतो.

म्हणून तर समर्थ रामदास स्वामी सांगतात...नव्हे लिहितात...

दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे"

कधी काही शब्दांतून लिहिण्याची लय सापडते...
तर काही रोजच्या जगण्यातल्या आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून..कधी एखादं गाणं त्यावर लिहायला प्रेरित करतं तर कधी एखादा छानं असा चित्रपट...मात्र जशी फक्त यमक जुळवून कविता करता येत नसते...किंवा चांगली कविता आकारत नसते तसेच ललित लेखन लिहावं म्हटलं तरी बऱ्याचदा शब्दांची हरताळ सुरू असते...काही केल्या ते शब्द मनातून कागदावर उतरता उतरत नाहीत... लिहिण्याला हवी असते जोड मनाच्या एकाग्रतेची...मनाच्या स्थिरतेची.
असं म्हणतात ना की 'शरीर जेवढं भटकत राहील...हालचाल करीत राहील तेवढं चांगलं नि मन जेवढं स्थिर राहील...कमी भटकत राहील तेवढं चांगलं'!

वाचण्याची ही गंमत असते...कदाचित ती गंमत फक्त माझ्या पूर्ती देखील मर्यादित असू शकते.तसे मला मराठी साहित्य प्रकार वाचायला खूप खूप आवडतात...
इंग्रजी पुस्तके वाचणे म्हणजे माझ्यासाठी एक वेगळीच कसरत असते...बऱ्याचदा इंग्रजी पुस्तके मी वाचायला सुरू करून काही पानांनातर ती तशीच ठेवली आहेत...पण मध्यंतरी मला माझ्याच बाबतीत एक शोध लागला की पहाटे लवकर उठल्यानंतर जर मी इंग्रजी पुस्तक वाचायला घेतले तर मी ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेवून वाचू शकतो...🤩
तसे तर मला वाचताना तंद्री लागल्याशिवाय वाचूच वाटत नाही...मग ते मराठी पुस्तक असो वा इंग्रजी.
काही काही लेखकांची पुस्तके मला रात्री झोपताना वाचायला अधिक चांगली वाटतात...तर असे काही लेखक आहेत ज्यांची पुस्तके मी येता जाता केंव्हाही कधीही आणि कुठेही वाचू शकतो...त्यांनी तेवढी माझ्या आयुष्यावर आपली वेगळी अशी छाप पाडलेली आहे..
यावरही मी एक जालीम उपाय काढला आहे...माझ्या जवळ मी नेहमी दोन तीन वाचकांची पुस्तके ठेवतो..त्यातले एखादे पुस्तक माझ्या आवडत्या लेखकाचे असते...दुसरे जास्त न वाचण्यात आलेल्या लेखकाचे असते..त्यामुळे मी दिवसातली कोणतीही वेळ मारून नेवू शकतो...( वाचण्यात म्हणायचे आहे मला😂😂)

तर अशी अजब आहे माझ्या वाचनाची तऱ्हा...आणि मी असा 'तऱ्हेवाईक वाचक' असल्या कारणाने माझ्या लिहिण्याच्या तऱ्हेबद्दल तर मी न बोललेलचं बर नाही का?😂😂
आणि या अश्या माझ्या लिहिण्याच्या तऱ्हेवरूनच मी स्वतःला लेखक म्हणून घेणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेण्यासारखे तर होणार नाही ना? म्हणून मग सावधगिरीचा उपाय म्हणून यावर काढलेला अप्रतिम...( माझ्या लेखी 😂😂) शब्द म्हणजे "लिहिणारी माणसं"!...खरे तर शब्दांच्या कोट्या करणं मला खूप आवडतं...त्या बाबतीत मी मला स्वतःला 'कोट्याधीश' समजतो...( पैश्यांच्या बाबतीत समजो ना समजो...😂😂 )
तर वरील सर्व लेखन वाचून तुम्हाला जर मी लेखक म्हणून योग्य वाटत असेल तर त्यात माझ्या लेखनाच्या योगदानापेक्षा तुमचे "सुज्ञ वाचक" म्हणून योगदान जास्त असेल यात मला तिळमात्रही शंका नाही... तुम्हा सर्व सुज्ञ वाचकांच्या भरोश्यावर मी इथून पुढेही माझे लेखन सुरूच ठेवणार आहे....मग त्यात काही कविता असतील काही ललित लेखनही असेल... दैव अधिक बलवत्तर असेल तर लेखक म्हणून माझी काही पुस्तके ही निघतील इतकाच स्वप्नविलास रंगवत मी माझ्या आजच्या लिखाणाचा या लेखापूरता समारोप करतो...
आता तुम्हीच ठरवा की मला कोणत्या 'कॅटेगरी' मध्ये ठेवायचं....कवी...लेखक...साहित्यिक की...

परत आपलं लिहिणारी माणसं!😂😂😂

डॉ अमित.
गुरुवार.
८ फेब्रुवारी २०२४.

A small contribution towards society... in creating dental health awareness...Free Dental checkup@Silver jubli highschoo...
05/02/2024

A small contribution towards society... in creating dental health awareness...Free Dental checkup@Silver jubli highschool,Barshi
Special thanks to Headmaster Mr Kolhe sir, Mr Dikule sir and other staff members 😇

     #  ...
04/11/2023

# ...

@शिल्पा डेंटल क्लिनिक आणि इम्प्लान्ट सेंटर, बार्शी9545592000
23/12/2022

@शिल्पा डेंटल क्लिनिक आणि इम्प्लान्ट सेंटर, बार्शी
9545592000

"लायन्स क्लब बार्शी रॉयल" व"शिल्पा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर" यांच्या वतीने कन्याप्रशाला बार्शी येथे *"आपले मौखि...
22/09/2022

"लायन्स क्लब बार्शी रॉयल" व
"शिल्पा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर" यांच्या वतीने
कन्याप्रशाला बार्शी येथे
*"आपले मौखिक आरोग्य*" या विषयावर
डॉ तेजस हिरालाल लाड आणि
डॉ किरण तेजस लाड
यांचे बहुमूल्य मार्गदर्शन...
सोबतच दातांची मोफत तपासणी करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्या विषयीही मार्गदर्शन करणार आहेत....

"चेहरा तोची म्हणावा सुंदर
जेथे झळकती दंत पंक्ती शुभ्रसर"...

ठिकाण...कन्या प्रशाला बार्शी.
दिनांक ..२४ सप्टेंबर २०२२.
शनिवार. वेळ सकाळी -९:००

अध्यक्ष- लायन हेमल दोशी
सचिव- लायन वर्षा चांगभले
खजिनदार- लायन ज्योती रुगले
प्रकल्प प्रमुख - लायन डॉ. तेजस लाड

Address

Branch 1:Kapad Bazar, Opp. To Zadbuke Kirana Store, Lad Shewing Machines, Pan Khut, Branch 2: Solapur Road, Bhavani Peth, Left To The VK MART
Barshi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Lad Shilpa Dental Clinic & Shilpa Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Lad Shilpa Dental Clinic & Shilpa Hospital:

Share

Category