07/06/2020
कोरोनाच्या साथीच्या काळात डॉक्टर्स सोबत असंवेदनशील वागणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई व्हावी--IMA व NIMA चे निवेदन
कुर्डुवाडीजवळच्या लहुळ गावात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्यावरील प्रथमोपचार करणारे डॉक्टर आणि त्या मृत व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थानिक विलगिकरण करण्यात आले ,डॉ चोपडे हे नेहमीप्रमाणे लहुळ येथे रुग्णसेवा करत असताना त्यांनी त्या महिलेस तिचे सर्व रिपोर्ट पाहून तपासून तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे जाण्याचा सल्ला दिला परंतु पेशंट टेम्भुर्णी ,अकलूज येथे जाऊन शेवटी सोलापूर सिव्हिल येथे गेला तेथे कोरोनामुळे मृत झाला ,सदरचा रुग्ण तपासताना डॉक्टर नी ओ पी डी मध्ये सोशल डिस्टनसिंग पाळून ,मास्क ,ग्लोज ,सॅनिटायझर व इतर सर्व गोष्टीचा शासनाच्या गाईडलाइन प्रमाणे वापर करून रुग्ण सेवा दिली ,त्यामुळे सध्या त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही किंवा कोरोनाचे प्राथमिक लक्षण सुद्धा नाहीत त्यामुळे लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये त्यांची कोरोनाची चाचणी सोमवारी घेतली जाणार आहे त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत त्यामुळे होम विलगिकरण केले आहे
महाराष्ट्र शासनाचे दि 30/4/2020 च्या परिपत्रकानुसार कोरोना साथीच्या काळात पेशंट वर उपचार करत असताना डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी कोरोना positive पेशंटच्या संपर्कात आला आणि त्या डॉक्टर्स नी संपूर्ण मास्क ,ग्लोज ,घालून स्वतः ची काळजी घेत रुग्णसेवा दिली असेल आणि त्यांना काही त्रास नसेल किंवा ते positive निघाले परंतु तरी कोरोनाचे कोणतेही लक्षणे नसतील तर त्यांना होम विलगिकरण कक्षात पाठवावे असे आदेश आहेत
वरील परिपत्रकानुसार तालुका आरोग्यधिकारी डॉ पलंगे यांनी त्यांनी डॉ चोपडे होम विलगिकरण कक्षाचा सल्ला दिला परंतु डॉक्टर त्यांच्या कुर्डुवाडी मधील राहत्या घरी गेल्यानंतर तात्काळ काही सुजाण आणि असंवेदनशील गल्लीतील नागरिकांनी पोलीस स्टेशनला फोन करून त्यांना गल्लीत घरी येऊ देऊ नका त्यांना संस्थानिक विलगिकरण कक्षात टाका अशी तक्रार केली त्यांनंतर आरोग्यधिकारी यांनी सल्ला दिला की तुमच्या गल्लीतील नागरिक तक्रार करत आहेत तुम्ही दुसऱ्या जागी होम विलगिकरण कक्षात राहा त्याप्रमाणे
काल रात्री डॉक्टर्स दुसऱ्या पर्यायी होम विलगिकरण कक्षाच्या शोधात फिरत होते ,डॉक्टर नी रुग्णसेवा केली दवाखाना उघडा ठेवला ही चूक केली का ? ज्याची शिक्षा समाज पोलीस तक्रार करून देत आहेत ,अर्ध्या रात्री त्या गल्लीतील किंवा कुर्डुवाडी मधील डॉक्टर रुग्णसेवेला लागतात पण त्याच डॉक्टर वर अशी वेळ आली तर समाज त्या डॉक्टर कडे तडीपार गुन्हेगार सारखा पाहून माणुसकी नसल्यासारखे किंवा असंवेदनशील वागत असेल तर अश्या नागरिकांना डॉक्टर्स नी कोरोनाच्या काळात का स्वतः चा जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा द्यावी ,?
पोलीस आणि आरोग्य अधिकारी यांचे कर्तव्य आहे की डॉक्टर बद्दल तक्रार करणाऱ्या नागरिकांना शासनाचा आदेश समजावून सांगणे आणि संबंधित डॉक्टर्स ना सन्मानाची वागणूक देणे परंतु आरोग्य अधिकारी यांनी त्यांना लोक तुमच्या गल्लीतील व पॅनिक होऊन पोलिसांना फोन करत आहेत असे सांगितले त्यानंतर सर्व प्रकार तहसीलदार यांना सांगण्यात आला त्यांनी सुध्दा होम विलगिकरण कक्षात राहण्याचा सल्ला दिला
IMA व NIMA च्या कुर्डुवाडीतील सर्व डॉक्टर नी काल रात्री एकमताने ठरवलं की गल्लीतील लोकांचा विरोध किंवा पोलीस तक्रार नाही जुमानता डॉ चोपडे हे त्यांच्या स्वतः च्या घरीच विलगिकरण कक्षात राहतील , आणि काही अडचण आली तर सर्व डॉक्टर्स त्यांच्या पाठीमागे खंबीर उभारून त्यांच्या गल्लीतील असंवेदनशील लोकांना एकत्रित जाऊन चांगल्या वैद्यकीय भाषेत समजावून सांगतील ,त्याप्रमाणे ते आता त्यांच्या स्वतः च्या राहत्या घरी स्वतंत्र विलगिकरण कक्षात आहेत यापूर्वी सुद्धा तालुका आरोग्यधिकारी डॉ मेंढापुरकार सेवेत असताना किडनीच्या आजारामुळे मृत झाले तर त्यांची त्यांच्या घरच्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह असतानाही त्यांचे घरचे दुःखात असताना गल्लीतील नागरिकांनी त्यांच्या घरच्यांना विलगिकरण कक्षात टाका आम्हाला भीती वाटते अशी तक्रार नगरपालिका मुख्यधिकारी यांच्याकडे केली होती
असंवेदनशील आणि माणुसकी नसल्यासारखे किंवा गरज सरो वैद्य मरो या म्हणी प्रमाणे लोक जर डॉक्टर्स प्रति वागत असेल आणि उद्या कोणते डॉक्टर्स पेशंटचा उपचार करताना कोरोना positive निघाले तर त्यांना त्यांच्या घरातील लोकांना वाळीत टाकणार का ? बाहेरच्या शहरात ,सोसायटीत असे प्रकार वारंवार घडत आहेत ,आजही आमच्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कुर्डुवाडी किंवा आजूबाजूच्या गावातून येताना शेजारचे लोक तुम्ही दवाखान्यात जाऊ नका ,आमच्या गल्लीत कोरोनाची साथ पसरेल ? असे नेहमी धमकावत असतात आमचे कर्मचारी काही लक्ष देत नाहीत काही घाबरून दवाखान्यात येत नाहीत ,आहे त्या परिस्थितीत दवाखाने सर्व डॉक्टर्स चालू ठेवत आहेत तर अश्या असंवेदनशील लोकांसाठी खाजगी डॉक्टर्स नी स्वतःचा जीव धोक्यात का घालावा ? ह्या प्रकरणात पोलीस प्रशासन ,महसूल प्रशासन आणी राजकीय पदाधिकारी यांनी संबंधित लोकांना तोंडी समज द्यावी ,वेळ पडल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ,अन्यथा आज हा प्रकार ऐका डॉक्टर्स सोबत घडला आहे उद्या सगळ्याच डॉक्टर्स बाबतीत घडेल कारण सर्वांचे दवाखाने व घर हे रहिवासी वस्तीतीत आहेत
कुर्डुवाडीतील सर्व डॉक्टर्स नागरिकांना विचारत आहेत की उद्या तुमचा मुलगा/ मुलगी कोरोना positive निघाले आणि तुम्ही जसे तुम्ही डॉक्टर्स सोबत वागत आहात तसेच गल्लीतील लोक तुमच्या मुलांसोबत वागलं तर कसे वाटेल याचे आत्मचिंतन करा ,तुमच्या ह्या असंवेदनशील वागण्याने पेशंटचे नुकसान होईल त्याचा डॉक्टर्स ना काहीही फरक पडणार नाही
मा आमदार संजय मामा शिंदे यांच्या नगरपालिका मिटिंग मध्ये डॉक्टर्स किंवा अत्यावश्यक सेवेत काम करणारे पोलीस ,महसूल ,नगरपालिका अधिकारी, राजकीय पदाधिकारी , यांच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते तर ज्यांना संस्थानिक होम किंवा विलगिकरण करण्याची वेळ येईल त्यांच्यासाठी कुर्डुवाडी हद्दीतील लॉज अधिग्रहण करा असा विषय सर्व डॉक्टर्स नी मांडला त्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी मा गावडे साहेब यांनी आम्ही लॉज अधिग्रहण केले आहेत असे सांगितले परंतु पुढे काहीही कारवाई झाली नाही किंवा त्या लॉज ची नावे त्यांचे दरपत्रक डॉक्टर्स च्या संघटनेला दिली नाहीत ,ही कारवाई केली नाही
IMA व NIMA च्या सर्व डॉक्टर्स ची मागणी आहे की महसूल ,व नगरपालिका प्रशासनासनी तात्काळ पेंड विलगिकरण कक्षासाठी कुर्डुवाडीतील लॉज अधिग्रहण करावे तसेच पोलिसांनी डॉक्टर्स आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असंवेदनशील वागणाऱ्या नागरिकांवर साथरोग नियंत्रण व आपतीव्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करावी ,फोन वरून तक्रार करणाऱ्या नागरिकांना तोंडी समज द्यावी ,
डॉ आशिष शहा अध्यक्ष IMA
डॉ सचिन माढेकर सचिव IMA
डॉ संतोष कुलकर्णी अध्यक्ष IMA
महाराष्ट्र राज्य PCPNDT कमिटी
डॉ रोहित दास खजिनदार IMA
डॉ विश्वेश्वर माने अध्यक्ष NIMA
डॉ प्रशांत नलावडे सचिव NIMA