
06/09/2025
खग्रास चंद्रग्रहण माहिती -
7 सप्टेंबर , भाद्रपद शु. पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे . हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे.
ग्रहणाचा स्पर्श :- रात्री 9 .57
संमीलन :- रात्री 11.00
ग्रहण मध्य :- रात्री 11.42
ग्रहण उन्मीलन :- रात्री 12.23
ग्रहण मोक्ष :- रात्री 01.27
ग्रहणाचा पर्वकाल :- 3 तास 30 मिनिटे राहील .
ग्रहणाचे वेध -
ग्रहणाचे वेध रविवार 7 सप्टेंबर दुपारी 12.37 पासून लागणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री 01.27 ग्रहणाचा वेध पाळावेत . बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी रविवारी संध्याकाळी ५:१५ पासून मोक्षापर्यंत म्हणजेच मध्यरात्री 1.27 पर्यंत वेध पाळावेत.
वेध काळामध्ये भोजन करू नये, (जमत नसल्यास न शिजवलेले अन्न खाता येईल, दूध फळे खाऊ शकता.) स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते मोक्ष या काळात साधारण रात्री 09.57 ते रात्री 01.27 पर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत.
ग्रहणातील कार्ये -
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असतांना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धी असते.