02/04/2022
Courtesy Dr. Devavrat Harshe
स्वमग्नता जितक्या लवकर ओळखली जाईल, आणि जितक्या लवकर उपचार सुरू होतील, तितके त्याचे रिझल्ट्स चांगले मिळतात.
एखाद्या मुलाला/मुलीला स्वमग्नता आहे अशी शंका निर्माण करणारे काही महत्वाचे धोक्याचे इशारे.
1. वयाच्या 12 व्या महिन्यापर्यंत बोट दाखवणे, इतर हातवारे करून संवाद साधणे आणि तोंडाने आवाज काढणे जमत नसेल,
2. वयाच्या 16 महिन्यापर्यंत एक अक्षरी शब्द बोलायला जमत नसेल तर,
3. वयाच्या 24 महिन्यापर्यंत 2 शब्द असणारं स्वनिर्मित वाक्य किंवा वाक्य तुकडा बोलायला जमत नसेल तर,
आणि
4. कोणत्याही वयात, पूर्वी जमणारी भाषाविषयक आणि सामाजिक कोणतीही क्षमता हळूहळू किंवा अचानक ह्यास होऊ लागली तर.
अनेकदा स्वमग्नता आहे असं सांगितल्यावर आई वडील बऱ्याचदा "पण डॉकटर तो गाणं म्हणून दाखवतो", किंवा "आम्ही बोललो की आमच्या मागून बोलतो" अशी शंका विचारतात. एखाद्याच्या मागून बोलणे, किंवा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती करणे याला Echolalic speech म्हणतात, व ते स्वनिर्मित भाषा कौशल्य यात मोडत नाही.
मूल टिव्ही वरील जाहिरात किंवा गाणे किंवा आई वडिलांनी बोललेले शब्द पुन्हा बोलून दाखवत असेल, तर त्याला स्वनिर्मित भाषा (Spontaneous) म्हणता येत नाही.
हे सगळं जाणण्यासाठी,
1. मुलाची जन्मानंतर लवकरात लवकर श्रवण शक्तीची तपासणी करा. श्रवण शक्ती मध्ये दोष असेल, तरी मुलाची भाषा नीट विकसित होऊ शकत नाही.
2. तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ यांच्याकडून मुलाच्या वाढीचे टप्पे कोणते, आणि कोणते भाषा आणि सामाजिक टप्पे कधी विकसित झाले पाहिजेत याची सूची घेऊन त्यावर बारीक लक्ष ठेवा.
3. "काही मुलं थोडी उशिरा बोलतात, बोलेल", किंवा "आमच्या घरात सगळीच मुलं थोडी उशिरा बोलतात" असा casual approach ठेवू नका.
4. सिनेमात दाखवल्याप्रमाणे स्वमग्नता असलेल्या सर्व मुलामध्ये काहीतरी विशेष कौशल्य (savant abilities) असेलच असे नाही. स्वमग्नता असलेल्या बहुतांश मुलांचा बुद्ध्यांक हा कमी असतो.
सर्वात महत्त्वाचं. योग्य वेळी शंका, निदान आणि उपचार, घरातील आणि आजूबाजूचे वातावरण याने स्वमग्न मुले चांगले जीवन जगू शकतात.