26/08/2021
डॉ. संजय अ. बहीर
एम. डी. (होमिओपॅथ).
HYPER-TENSION (हाय ब्लड प्रेशर)-
हायपर टेन्शन म्हणजे वाढलेले ब्लडप्रेशर.
खरे तर, हे वाढलेले ब्लडप्रेशर हे शरीराची एखाद्या धोक्यामधे स्वतःला टिकवुण ठेवन्यासाठी निर्माण झालेली एक नैसर्गिक व बौद्धिक पातळीवरील धडपड असते.
जसे की, शारीरिक मार किंवा शरीरामध्ये विषारी अथवा रासायनिक द्रव्य निर्माण होणे (इजे द्वारे किंवा इतर आजार तात्पुरते दाबून ठेवल्यामुळे) किंवा भावनिक व मानसिक ताणतणाव. इत्यादी सर्व गोष्टीं आपले शरीर हे, धोक्याच्या रुपामधे बघुन, अशा परिस्थितीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी, स्वतःचा रक्तदाब वाढवते. जी की एक सामान्य नैसर्गिक बौद्धिक प्रतिक्रिया आहे.. अन ती प्रतिक्रिया त्या परिस्थितीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी गरजेची सुद्धा आहे..
आता आपण हे थोडेसे विस्तारित अभ्यासू.
आपल्या शरीराला जी यंत्रणा नियंत्रित करते त्यातील एक भाग म्हणजे AUTONOMIC NERVOUS SYSTEM. ज्याचे पुन्हा दोन भाग पडतात, एक म्हणजे - SYMPATHETIC आणि दुसरी म्हणजे - PARASYMPATHETIC.
SYMPATHETIC यंत्रणा ही आणीबाणीची परिस्थिती हाताळते, जिथे आपल्याला आकस्मित प्रतिक्रिया द्यावी लागते, जसे की धोका बघून एकतर तिथून तात्काळ पळ काढणे किंवा लढून प्रतिक्रिया देणे (Fight or flight response). (उदाहरण म्हणजे, रस्त्याने चालत असताना अचानक तुमच्या अंगावर धावून आलेला एखादा कुत्रा. आता इथे एक तर तुम्हाला तिथून तात्काळ पळावे लागेल किंवा त्या कुत्र्यावर शक्तिप्रयोग करून प्रतिकार करावा लागेल). आता अशा स्थितीत तुमच्या शरीराला जास्त activity साठी रक्त पुरवठा वाढणे गरजेचे आहे, तरच तुम्ही ही emergency क्रिया पार पाडू शकाल.
या उलट असते, ती PARASYMPATHETIC यंत्रणा, जी शरीराच्या आरामाच्या वेळेस कार्य करीत असते, जसे की ऊर्जा निर्मिती करणे ऊर्जा साठवून ठेवणे व शरीराला झालेली झीज पुन्हा भरून काढणे. उदाहरण म्हणजे तुमचे जेवण झाल्यानंतर ते अन्नपचन करण्यासाठी तुमच्या पाचन तंत्राकडे पुरविण्यात आलेला रक्तपुरवठा.
म्हणून दिवसभर तुम्ही कार्यरत असतात त्यावेळेस तुमची SYMPATHETIC nervous system जास्त क्रियाशील असते.
व रात्री तुम्ही आराम करतात तेव्हा तुमची PARASYMPATHETIC nervous system ही जास्त क्रियाशील असते.
त्यामुळे या दोन्ही यंत्रणा खूप महत्त्वाच्या असतात. व या दोन्ही यंत्रणा शरीराचं कार्य संतुलन ठेवण्यास मदत करतात.
आता जर एखादा व्यक्ती डॉक्टर कडे गेला आणि त्याचा रक्तदाब वाढलेला दिसला तर डॉक्टर म्हणतात, “तुला उच्च रक्तदाबाचा आजार आहे”, परंतु, इथे एक गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा, ती म्हणजे, तो आजार नसून ते फक्त एक लक्षण आहे. व ह्या लक्षणाचा उगम स्थान हे वर सांगितल्या प्रमाणे शारिरीक जखम, शारीरिक मार, शरीरात निर्माण झालेले विषारी द्रव्य किंवा भावनिक आणि मानसिक तणाव हे यापैकी कोणतेही असू शकते.. आणि वरील सर्वच गोष्टींना तुमचे शरीर एकाच प्रकारची प्रतिक्रिया देते. ही एक emergency आहे असं गृहीत धरून तुमचे शरीर स्वतःला शारिरिक रित्या व मानसिक रित्या सावध करेल. व sympathetic nervous system कार्यरत होऊन तुमची activity वाढवण्यासाठी व तात्काळ काम घडवून आणण्यासाठी, मेंदूकडे व इतर हातापायांच्या अवयवाकडे रक्तपुरवठा वाढवला जाईल, जो निसर्गानुसार त्या तनावामध्ये शरीराला लढण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केलेली एक प्रतिक्रिया असते.
त्यामुळे ज्या व्यक्तींचा ब्लड प्रेशर हा जास्त असतो त्या व्यक्तींमध्ये ही गोष्ट sympathetic nervous system च्या प्रभावामुळे निर्माण झाली असते. कारण ही system, वर सांगितलेल्या कारणामुळे शरीरास त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी रक्त दाब वाढवते. या पाठीमागचा उद्देश हा असा असतो की, अशा धोक्याच्या परिस्थितीत शरीराला लढण्यासाठी लागणारे बळ, हे रक्त पुरवठा वाढवून पुरवले जाते, जेणे करून रक्ता द्वारे अवयवास पोषण द्रव्ये, harmons व इतर घटक पोहचवले जावीत.. व हे घटक शरीराच्या अवयवांना पोहचवण्यासाठी हृदयास, रक्त जास्त लवकर व ताकदीनिशी पुरवावे लागते जी एक physiological क्रिया आहे. व यालाच आपण High blood pressure असे म्हणतो. त्यामुळे शरीराची ही एक नैसर्गिक बौद्धिक क्रिया समजली जाते, जी sympathetic autonomic nervous system घडवून आणते..
मग आता, येथे लगातार कोणता धोका असतो, जो शरीरास घातक ठरवून तुमची ही यंत्रणा ब्लड प्रेशर वाढवतेय.. आणि तो धोका म्हणजे तुमचा दैनंदिन जीवनशैली मधील लागातार तान तणाव, अतिचिंता (उदा. व्यवसाय, भविष्या बद्दल) एखादी नाहक भीती.. जे तुमचे शरीर हे धोक्याच्या स्वरुपात बघून वरील प्रतिक्रिया देत असते. मग अशा वेळी जर तुम्ही hypertension च्या गोळ्या (औषध) घेऊन जरी तो ब्लडप्रेशर दाबला तरी तुमचे वाढीव ब्लड प्रेशरचे मुख्य कारण तसेच्या तसे असल्याकारणाने, कालांतराने दाबलेला रक्तदाब पुन्हा शरीरातील sensors detect करतात, व सद्ध्याच्या या धोकादायक स्थितीत हा (गोळ्यां मुळे) कमी केलेला रक्त दाब, गोळ्या चालू असूनही पुन्हा वाढविण्याचा प्रयत्न करते. कारण तुमच्या शरीरात गोळ्यां मुळे कमी झालेला सध्याचा BP हा अनैसर्गिक आहे, असा संदेश तुमच्या शरीराच्या कंट्रोल सेंटर ला जातो. व शरीर गोळ्यांचा विरोधात जाऊन पुन्हा कमी झालेला BP वाढण्यासाठी अंतर्गत रासायनिक बदल करते..
आता डॉक्टर अशावेळी पुन्हा तुमची गोळी वाढवतील.. व पुन्हा तुमचे शरीर त्या गोळ्यांचा विरोधात जाऊन रक्तदाब वाढविण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे BP च्या गोळ्या कमी व्हायचा ऐवजी वाढतच जातात.
उलट पक्षी, जस जसे BP च्या गोळ्या वाढत जातील तसतसे शरीरात पुन्हा तो गोळ्या मुळे दबलेला रक्तदाब पुन्हा वाढविण्यासाठी शरीर हे अंतर्गत रासायनिक घटक अधिकाधिक निर्माण करत जाते व गोळ्याच्या विरोधात जाऊन पुन्हा रक्तदाब वाढवत जाते, ज्याला आम्ही मेडिकल भाषेत Negative feedback mechanism असे म्हणतोत ... व यामुळे शरीरातील अंतर्गत रासायनिक समतोल अनैसर्गिक पणे ढासळला जातो. कारण इथे तुम्ही फक्त ब्लड प्रेशर ला टार्गेट करीत बसतात, त्याचा उगम स्थानास नाही.
आता इथे homeopathy medicine कसे काम करेल ते आपण बघू..
होमिओपॅथी तूमच्या hypertension वर डायरेक्ट काम करण्या ऐवजी तुमचे वाढीव रक्तदाबाचे कारण शोधून त्यावर काम करते, त्यामुळेच कोणताही homeopathy डॉक्टर हा तुमच्या शारीरिक लक्षणां बरोबर, मानसिक दशा सापडण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतो, कारण आपल्याला इथे आजाराचे लक्षण नाही तर, आजाराचे मूळ कारण नीट करायचे आहे.. जी तुमची मानसिक दशा, व आजारा दरम्यान सुरू असलेली मनस्थिती इत्यादी गोष्टी सुद्धा विचारात घेऊन करावी लागते, व मग त्यानुसारच औषधोपचार देऊन treatment केली जाते.
परंतु रुग्ण, मानसिक स्थितीस कमी महत्व देऊन पूर्णतः माहिती ना देता फक्त शारिरीक माहितीला जास्त महत्व देतो. व त्यामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांना तंतोतंत औषध शोधण्यास कठीणाई होते..
त्यामुळे आपल्या डॉक्टरांना तुमच्या आजारपणातील मानसिक व स्वाभाविक स्थिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करा, जेणे करून डॉक्टर तुमचे तंतोतंत औषध शोधतील व तुम्हाला या परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी मदत करतील.
धन्यवाद.....
डॉ. संजय अ. बहीर
एम. डी. (होमिओपॅथ)