Dr Ajay Jadhav

Dr Ajay Jadhav *Director, Vatsalya Hospital Mother & Child Care

*Pediatrician , Neonatologist & Pediatric Intensivist.

10/08/2023
29/12/2022
Spreading Happiness...कमी दिवसांचे (33 आठवडे) व कमी वजनाचे (1350 ग्रॅम) बाळ आणि बाळाच्या आई ला उच्च रक्तदाब (High BP) चा...
29/12/2022

Spreading Happiness...
कमी दिवसांचे (33 आठवडे) व कमी वजनाचे (1350 ग्रॅम) बाळ आणि बाळाच्या आई ला उच्च रक्तदाब (High BP) चा त्रास असल्याने वेळे अगोदर प्रसूती झाली. बाळ जन्मतः रडले नाही. बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. वात्सल्य हॉस्पिटलमध्ये च डिलिव्हरी झाल्याने बाळाला क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब NICU मध्ये घेऊन इलाज चालू केले गेले. व्हेंटिलेटर , फुफ्फुस वाढीचे इंजेक्शन (Surfactant) आणि इतर सर्व आवश्यक ते उपचार करून बाळाला सुखरूप आईकडे देण्यात आले.

एकाच हॉस्पिटलमध्ये प्रसूती व ताबडतोब बाळाच्या उपचाराची सोय असल्याने, वेळे अगोदर जन्मास आलेल्या चिमुकल्याचे व उच्च रक्तदाब असलेल्या आईचे, दोघांचे प्राण वाचविण्यात वात्सल्य हॉस्पिटल च्या टीम ला यश आले. आई व बाळ एकाच ठिकाणी असल्याने, आईच्या सानिध्यातच बाळाचा इलाज करता येतो.

डॉ अजय जाधव
बालरोग व नवजात शिशु तज्ञ

डॉ पूजा अजय जाधव (माने)
स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
वंध्यत्व निवारण तज्ञ

वात्सल्य हॉस्पिटल
स्त्री व बाल रुग्णालय
जालना रोड बीड
9359311266

9673478585

शहरापासून दूर अशा ठीकाणी राहणारी एक स्त्री - होणाऱ्या बाळाची आई. आई व बाळासाठी सोयी सुविधांचा अभाव आणि काहीसं अज्ञान किं...
11/05/2022

शहरापासून दूर अशा ठीकाणी राहणारी एक स्त्री - होणाऱ्या बाळाची आई.
आई व बाळासाठी सोयी सुविधांचा अभाव आणि काहीसं अज्ञान किंवा योग्य सल्ला न मिळाल्याचा परिणाम म्हणता येईल.

9 महिने 9 दिवस उलटून गेले आणि तरी डिलिव्हरी झाली नाही. नंतर 7 दिवसांनी बाळाचा जन्म झाला, 3 किलो वजन ; पण बाळाने आईच्या पोटात असताना शी केली (Meconium Stained Liquor ) आणि बाळाला जन्मतः श्वास घेण्यासाठी अतोनात त्रास होऊ लागला.
50 - 60 किलोमीटर चा प्रवास करून बाळाला वात्सल्य हॉस्पिटल NICU मध्ये दाखल करण्यात आले.
ऑक्सीजन , व्हेंटिलेटर , रक्तदाब नियमित ठेवणारी औषधी (ionotropes) आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या इतर गोष्टी इतका सर्व इलाज करून आणि तब्बल 5 दिवस व्हेंटिलेटर वर राहून अखेर बाळाचा जीव वाचला.

जीवन जगण्यासाठीची त्या बाळाची जिद्द, नातेवाईकांचा विश्वास आणि वात्सल्य हॉस्पिटल टीम चे प्रयत्न याचे च फळ म्हणून आम्ही बाळाला सुखरूप आईकडे पाठवू शकलो.

आई व बाळाची सर्व काळजी एकाच ठिकाणी
वात्सल्य हॉस्पिटल,
स्त्री व बाल रुग्णालय,
जालना रोड
बीड
9673478585

Vatsalya Hospital
Mother And Child Care
*Spreading Happiness With Intact Survival*

आईला हृदयाचा आजार ! आणि नुकतेच जन्माला आलेल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास ! म्हणून बाळाला वात्सल्य हॉस्पिटल NICU  येथे आ...
13/04/2022

आईला हृदयाचा आजार !
आणि नुकतेच जन्माला आलेल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास !
म्हणून बाळाला वात्सल्य हॉस्पिटल NICU येथे आणले गेले.
बाळालाही आईसारखा काही त्रास तर नाही ना ? या भीतीने आजी आजोबांची काळजी वाढली. अजून तरी हृदयाचा आजार नाही पण ; बाळाचे फुफुस Lungs अविकसित होते म्हणून त्याला ताबडतोब व्हेंटिलेटरवर घ्यावे लागले आणि विशेष म्हणजे त्याला इतक्या जास्त प्रमाणात व्हेंटिलेटर ची गरज भासली की एखाद्या मोठ्या व्यक्तीला लागावी! क्षणाचाही विलंब न करता बाळाच्या फुफुसांमध्ये फुफुस काही अंशी विकसित करण्यासाठी surfactant नावाचे औषध देण्यात आले तरी देखील म्हणावी तशी प्रगती दिसून येत नव्हती. बाळाला हृदयाचा आजार (उच्च रक्तदाब PPHN) असण्याची शक्यता गृहीत धरून काही औषधी चालू करण्यात आली व तसा आजर देखील पुढील तपासणी 2D ECHOमध्ये दिसून आला.
तब्बल अकरा 11 दिवस व्हेंटिलेटर व त्या नंतर दहा 10 दिवस ऑक्सीजन वरून नंतर सुखरूप आईच्या कुशीत जाताना त्याच्या व आईच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नातेवाईक आणि आई यांचा विश्वास हीच आमची सफलता.
Spreading Happiness...
जन्मापूर्वी पासून ते जन्मानंतर ची आई व बाळाची सर्व काळजी एकाच ठिकाणी...वात्सल्य हॉस्पिटल, बीड.

डॉ अजय बा जाधव
(बाल आरोग्य तज्ञ , नवजात शिशू तज्ञ व
मुलांचे आय सी यु तज्ञ )
डॉ पूजा अजय जाधव ( माने )
( वंध्यत्व निवारण ,स्त्री रोग व प्रसूती तज्ञ )

9673478585
9359311266

Special Thanks Dr Shriram Baglane

13/08/2021

स्तनपानाच्या प्रक्रियेमध्ये शरीरात नेमके काय बदल होतात?नॉर्मल स्तनपान नेमके कसे असते?

लग्नाच्या तब्बल सात वर्षानंतर त्यांना मूल झालं आणि साडेआठ महिन्यातच आईला उच्च रक्तदाब असल्यामुळे सिझर करावे लागले. बाळ त...
30/07/2021

लग्नाच्या तब्बल सात वर्षानंतर त्यांना मूल झालं आणि साडेआठ महिन्यातच आईला उच्च रक्तदाब असल्यामुळे सिझर करावे लागले. बाळ तसे वजनाने सदृढ पण जन्मतः च श्वास घेण्यासाठी त्या चिमुरड्याला असह्य त्रास होऊ लागला. फक्त ऑक्सिजन वर 60 किलोमीटर चा प्रवास करून ते बाळ "वात्सल्य" च्या कुशीत आले. 10 दिवसांचा आय . सी. यु. चा प्रवास, व्हेंटिलेटर, रात्रीच्या 2 वाजता फुफ्फुसात द्यावे लागलेले इंजेक्शन, सलाईन साठी बेंबीतून टाकावी लागणारी नळी हे सर्व सोसून दहाव्या दिवशी त्याला आईच्या कवेत जाताना होणारा आनंद आणि त्या आईला जन्मानंतर बाळाला दहा दिवसांनी सुखरूप हातात घेताना होणारा आनंद शब्दांत वर्णन करण्यासारखा नाही!
हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या प्रयत्नासोबतच नातेवाईकांची साथ आणि विश्वास तेवढाच महत्वाचा असतो.

जन्माचे वजन 1700 ग्रॅम, वेळे अगोदर जन्म आणि त्यात श्वास घेण्यासाठी होणारा त्रास! 3 दिवस व्हेंटिलेटरवर काढून नंतर काही दि...
30/07/2021

जन्माचे वजन 1700 ग्रॅम, वेळे अगोदर जन्म आणि त्यात श्वास घेण्यासाठी होणारा त्रास!
3 दिवस व्हेंटिलेटरवर काढून नंतर काही दिवसांचा आय .सी. यु. मधील खडतर प्रवास सुखरूप पणे पार पाडून आईकडे घरी जाताना फुललेला तो बाळाचा चेहरा!

Address

Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Ajay Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Ajay Jadhav:

Share

Category


Other Doctors in Bhir

Show All