Asha Kidney Super Speciality Hospital

Asha Kidney Super Speciality Hospital Frist Kidney Specialist In Beed

19/10/2024
आपल्या सेवेत
16/10/2024

आपल्या सेवेत

आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, बीड जिल्ह्यातील पहिले  एकमेव किडनी विकार तज्ञ(Nephrologist) डॉ.अजित घोडके सर यांच्य...
21/01/2024

आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, बीड जिल्ह्यातील पहिले एकमेव किडनी विकार तज्ञ(Nephrologist) डॉ.अजित घोडके सर यांच्या विशेष निरीक्षणाखाली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना च्या माध्यमातून मोफत डायलिसिस व इतर किडनी संबंधित उपचार सुविधा काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आशा किडनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक तथा बीड जिल्ह्यातील एकमेव किडनी विकार तज्ञ डॉ.घोडके अजित सर यांनी केले आहे.

एका लहान मुलाला जन्मापासूनच किडनीचा त्रास होता. अनेक दिवसांपासून सोलापूर, पुणे येथे उपचार घेत होते. कुटुंब आर्थिक आणि मा...
29/07/2023

एका लहान मुलाला जन्मापासूनच किडनीचा त्रास होता. अनेक दिवसांपासून सोलापूर, पुणे येथे उपचार घेत होते. कुटुंब आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या निराश झाले होते. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्याची उंची कमी होती, वजन कमी होते. वयाच्या 15 व्या वर्षी त्याचे वजन फक्त 22 किलो होते. एके दिवशी तो खूप आजारी पडला. त्याला श्वास घ्यायला, धडधडायला त्रास होत होता. त्याच्या रीनल फंक्शन चाचण्या विस्कळीत झाल्या होत्या. त्याला हिमोडायलिसिसचा सल्ला देण्यात आला. पण कुटुंब पुणे किंवा सोल्पौरला जायला तयार नव्हते. रुग्णांच्या पालकांचा डॉ.घोडके यांच्यावर गाढ विश्वास होता.
आम्ही पेडियाट्रिक डिस्लिसिस कॅथेटर, डायलिझर, टयूबिंग्ज ऑर्डर केली. बीड जिल्ह्यात यापूर्वी मुलांचे डायलिसिस होत नव्हते. पण लहान मुलांसाठी बनवलेल्या मशीनमध्ये योग्य सेटिंग करून आम्ही बाळाचे डायलिसिस केले आणि तो पूर्णपणे सुधारला. त्याला त्याच्या गावी अत्यंत कमी खर्चात उपचार मिळाले आणि महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही गुंतागुंतीशिवाय योग्य उपचार.
3 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला आणि त्यांनी डिस्चार्जच्या वेळी माझा सत्कार केला.

वयोवृद्ध आजोबांना आशा किडनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मिळाले जीवनदान.75 वर्षीय आजोबा किडनी विकाराने त्रस्त होते. त्...
28/06/2023

वयोवृद्ध आजोबांना आशा किडनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मिळाले जीवनदान.
75 वर्षीय आजोबा किडनी विकाराने त्रस्त होते. त्यांच्या रक्तातील ( Creatinine) चे प्रमाण 10 होते. त्यातच आजोबांना शरीरातील नसांचा आजार(Guillain Barre Syndrome) झाला. या आजारामध्ये शरीरातील हातापायांच्या, छातीच्या, पोटाच्या नसा काम करत नाहीत. त्यामुळे हाता पायांमधील ताकत कमी होते. या आजोबांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय लुळे पडले होते. आजोबा अंथरुणाला खीळून पडले होते.
वैद्यकीय क्षेत्रात अशी गोष्ट ही 10 लाख एकाला होते.
Guillain Barre Syndrome हा आजार झालेला आहे हे निदान होताच तात्काळ त्यांच्यावर प्लाजमाफेरेसिस नावाचा उपचार आशा किडनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला.
प्लाजमाफेरेसिस मध्ये रक्तातील घाण पार्ट काढून टाकण्यात येतो व शुद्ध रक्त रुग्णाला देण्यात येतो.
या आजोबांना वेळेत योग्य उपचार भेटल्यामुळे आजोबांचा श्वासोच्छवासास होणारा त्रास कमी झाला व हाता पायामध्ये ताकद येऊ लागली आहे. या आजारांमधील Plasmaphoresis साठी आजपर्यंत छत्रपती संभाजीनगर अहमदनगर,पुणे येथे जावे लागायचे. पण आता हे उपचार आशा किडनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बीड येथे उपलब्ध आहे. तरी ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी. असे आव्हान डॉक्टर अजित घोडके यांनी केले आहे.

Address

Near Disha Diagnostic Center , Jalana Road , Beed
Bhir
431122

Telephone

+919689625194

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asha Kidney Super Speciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category