09/10/2024
खरं तर नव्या वर्षात पदार्पण करताना जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने होत राहते. आज माझ्या वाढदिवशी माझी भावना देखील याहून वेगळी नव्हती. आपल्या प्रेमाने मी भारावून गेलो. पुढच्या प्रवासासाठी नवी ऊर्जा मिळाली. ती चालण्यासाठी नक्कीच बळ देईल.
धावपळीच्या काळातही वेळात वेळ काढून प्रत्यक्ष भेटून, कॉल करून, मेसेज पाठवून, सोशल मीडियावरुन आपण अभिष्टचिंतन केले. आपल्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार करतो. अनेकांना वैयक्तिक प्रतिसाद देता आला नाही. मात्र, आपण मला समजून घ्याल. विहान परिवारातील मार्गदर्शक, सदस्य,वरिष्ठ, मित्र, स्नेहीजण, नातेवाईक, कुटुंबातील सर्वांनी मिळून हा दिवस अविस्मरणीय बनवला. आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे आपल्या हृदयातील स्थान कमी करून नाही घेणार कारण मी सतत आपल्या ऋणात राहणे पसंत करेल फक्त ईतकीच अपेक्षा आहे की *प्रेम आहेच ते वृद्धिंगत व्हावे.*
- आपलाच
डॉ.राजन दहिवाळ
प्रकल्प व्यवस्थापक, समग्र प्रकल्प (विहान) बीड.