
02/03/2023
मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नंतर फक्त बीडमध्ये शिवाजीराव हार्ट केअर येथे...
IVUS (INTRAVASCULAR ULTRASOUND)- हृदयाच्या नसांची सोनोग्राफी...
FFR (Fractional flow reserve)- नसातील ब्लॉक च्या अगोदर आणि नंतर चा रक्तदाब तपासणे.
हो मला माहितेय हे खुप जणांनी हे पहिल्यांदाच ऐकलंय..!!! विज्ञानाने खुप प्रगती केली आहे विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये... तसच cardiology मध्ये ही खुप प्रगती झाली आहे... त्याचाच हा भाग आहे...
आता या तपासणीचे नेमके उपयोग काय ते आपण पाहूया...
IVUS -
ही एक हृदयाच्या नसाची सोनोग्राफी आहे...
१.ज्यामध्ये आपण प्रत्यक्षात ब्लॉक कसा आहे (चरबीयुक्त, तंतुमय किंवा अगदी खडूसारखा कडक) झाला आहे हे कळते. त्यानुसार अँजिओ्लास्टी सोपी/अवघड हे कळते आणि त्यासाठी लागणारे साहित्य याचा अंदाज येतो.
२. शुगर बीपी आणि आनुवंशिक हृदयाचा आजार असलेले रुग्ण यामध्ये नसा ह्या बाकी रुग्णासारख्या एकाच जागेवर खराब न होता पूर्णपणे खराब म्हणजेच चरबीयुक्त झालेल्या असतात.. अशावेळेस या नसा अँजिओग्राफी मध्ये लहान आकाराच्या दिसतात व त्याच नुसार अँजिओप्लास्टी केली तर स्टेन्ट हा लहान आकाराचा बसवला जातो व मग तो बंद होण्याचा धोका कित्येक पटीने अधिक असतो.
अशा वेळेस जर IVUS वापरून अँजिओप्लासटी केली तर आपण नसची प्रत्यक्ष लांबी आणि रुंदी मोजूनच तंतोतंत त्या आकाराचा स्टेन्ट बसवतो आणि मग तो बंद होण्याचा धोका खुप कमी होतो.
३.IVUS पद्धती वापरुन जर अँजिओप्लेस्टी केली तर जागतिक आभ्यासानुसार स्टेंट बंद होण्याची रिस्क ही ५०% ने कमी होते.(ULTIMATE IVUS TRIAL) गुगल वर सर्च करू शकता.
अभ्यासाचा सारांश फोटो जोडत आहे.
४.आता आपण प्रत्यक्ष उदाहरणांसह पाहू की IVUS चा फायदा कसा होतो...
माझा बालपणीचा मित्र त्याच्या वडिलांना घेऊन माझ्याकडे आला होता..त्यांच्या छातीमध्ये २ दिवसापासून त्रास होत होता... माजलगाव मध्ये त्यांनी ECG काढला होता तो पूर्णपणे नॉर्मल होता...
मी २D एको करुन पाहिला असता मला काही लक्षणे दिसली आणि त्यांना होणारा त्रास हो तसाच होता..मग आम्ही अँजिओग्राफी केली असता एक नस १००% , दुसरी ९९% आणि तिसरी ही ८०% बंद होती... आम्ही तात्काळ जी नस १००% होती तिची अँजिओप्लास्टी केली आणि ते स्टेबल झाले.
अणि मग आम्ही बाकी २ नस करण्यासाठी त्यांना एक महिन्यानंतर बोलावलं होत...
जेंव्हा चेक अँजिओग्राफी केली तेंव्हा अस लक्षात आले की अगोदर अँजिओप्लास्टी केलेला स्टेन्ट बंद होण्यास सुरुवात झाली होती... म्हणुन मग आम्ही त्या नसाचे IVUS केले असता असे लक्षात आले की, आम्ही जेंव्हा आम्ही अगोदर अँजिओप्लास्टी केली होती तेंव्हा अँजिओग्राफी मध्ये ती नस ही 3.5 mm ची होती त्यामुळे स्टेन्ट ही 3.5 mm चां टाकला होता... परंतु जेंव्हा आम्ही IVUS टेस्ट केली तेंव्हा प्रत्यक्षात असे दिसून आले की त्यांची नस ही 4 mm ची आहे.. आणि म्हणुन आम्हाला तिथे 4 mm cha दुसरा स्टेन्ट टाकावा लागला...
तसेच दुसरी राहिलेली नस वरवर अँजिओग्राफी मध्ये 2.5-2.75 mm एवढीच दिसत होती जी आम्ही IVUS केल्यानंतर कळले की प्रत्यक्षात ती 4 mm ची आहे..आणि मग त्यानुसार आम्ही 4 mm चां स्टेंट टाकून त्यांची अँजिओप्लास्टी केली... दोन्ही नसांचे IVUS अगोदर आणि नंतर असे फोटो जोडत आहे... सामान्य माणसाला कळेल इतका फरक दोन्ही मध्ये दिसतो आहे.
Stent Restenosis -(स्टेन्ट बंद झाला असल्यास)- stent कालांतराने बंद झाला असल्यास आपण IVUS ही टेस्ट करतो तेंव्हा आपणास खालील गोष्टी पाहता येतात
A.stent व्यवस्थित बसला होता की नाही?
B.stent ची साइज् कमी होती का?
कारण या दोन कारणामुळे stent कालांतराने बंद होण्याचे चान्सेस असतात.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अँजिओप्लास्टी कितीही व्यवस्थित झाली असेल आणि जर रुग्णाने रक्त पातळ होण्याच्या गोळ्या जर एकही दिवस बंद केल्या तर मात्र कोणताही स्टेन्ट बंद होत असतो.हे सर्व अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे.
२.LM अँजिओप्लास्टी -
म्हणजे हृदयाची डाव्या बाजूची सर्वात मोठी नस जिथून आणखी दोन नसा उगम पावतात.
या नसाची अँजिओप्लास्टी करताना जर IVUS उपलब्ध असेल तर ते सर्वोत्तम असते. बऱ्याच रुग्णांचे यामुळे बायपास टाळले जाऊ शकते.
FFR - Fractional flow reserve (नसातील ब्लॉक चा अगोदर आणि नंतर चा रक्तदाब तपासणे)
आता या टेस्ट चे महत्व काय आहे ते आपण पाहू --
१. बऱ्याच वेळेस अँजिओग्राफी केली असता अँजिओग्राफी मध्ये एखाद्या नसमध्ये ६०-७०% ब्लॉक असतो...आणि ब्लॉक जर 70% च्या वरती असेल तर अँजिओप्लास्टी करण्याचा नियम असतो..मग आता त्या ब्लॉक ची अँजिओप्लास्टी करावी की नाही??
यामध्ये बऱ्याच वेळेस आम्हाला पण द्विधा मनस्थिती असते की अँजिओप्लास्टी करावी की नाही..
मग अशा रुग्णासाठी ही टेस्ट खूप फायदेशीर असते... कारण या टेस्टमध्ये आपण रुग्णाला एक औषध देऊन ब्लॉक अगोदर आणि नंतर चा रक्तदाब तपासून पाहतो आणि त्यामध्ये जर एक ठराविक फरक आला तरच आपण अँजिओप्लास्टी करतो नाहीतर आपण रुग्णांना फक्त तो ब्लॉक वाढू नये यासाठी गोळ्या औषधे देतो. अँजिओप्लास्टी करण्याची गरज पडत नाही..
२. कधी कधी एखाद्या रुग्णाला तीनही नसमधे ब्लॉक असतात... माग बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो... अशा रुग्णांची FFR तपासणी केली
असता एक किंवा दोन ब्लॉक ची अँजिओप्लास्टी करावी लागते आणि बायपास करण्याची गरज पडत नाही..
३.दोन डॉक्टरांच्या सल्यामध्ये जो अँजिओग्राफी पाहून अँजिओप्लास्टी करावी की नाही याबद्दल दुमत असू शकते ते ही टेस्ट केल्यानंतर हा फरक राहत नाही.
पण ही टेस्ट फक्त अँजिओग्राफी वरती 70-80% ब्लॉक दिसत असेल तरच उपयोगी आहे.. ब्लॉक जर 80% पेक्षा जास्त असेल तर सरळ अँजिओप्लास्टी किंवा बायपास करावे लागते.
आता हि टेस्ट कशी फायदेशीर आहे ते पाहू?
एक ७० वर्षाच्या आजी दम लागतो म्हणुन आल्या होत्या... अँजिओग्राफी केली असता एका नस मध्ये ७०% ब्लॉक दिसत होता.. अँजिओप्लास्टी करावी की नाही अशी परिस्थिती होती.. म्हणुन त्यांना FFR टेस्ट करू असे सुचवले..ते लगेच तयार झाले... टेस्ट केली असता कळले की ब्लॉक च्या अगोदर आणि नंतर च्या प्रेशर मध्ये जास्त फरक नव्हता.. म्हणुन मग त्यांना अँजिओप्लास्टी करण्याची गरज पडली नाही.. अशा रुग्णामध्ये औषध गोळ्यांनी त्यांचा त्रास कमी होतो.
आणि stent टाकण्याची गरज न पडल्यामुळे दोन रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खाण्याची गरज नसते.
सोबत फोटो जोडत आहे