04/03/2023
1मार्च 2023 ला विहान प्रकल्प बीड,हेल्थ केअर कम्युनिटी ऑफ पॉझिटिव्ह पीपल्स संस्था,बीड जिल्हा व्यापारी महासंघ (CAIT), एन.एम.पी.+,जिल्हाधिकारी कार्यालय बीड,जिल्हा परिषद प्रशासन बीड,पोलीस प्रशासन बीड,माँ वैष्णव पॅलेस बीड,बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटट व टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशन, राजस्थानी सेवा समाज,माहेश्वरी तहसील सभा बीड,बीड जिल्हा अन्न व औषध प्रशासन, हॉटेल गौरव, मराठवाडा मिठाई व फरसाण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही.संसर्गित 21 जोडप्यांचे सामुदायिक विवाह "जुळून येति..रेशीम गाठी" - पर्व 6 वे या शाही विवाह सोहळा माँ वैष्णव पॅलेस बीड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यास ह.भ.प.श्री.महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे शुभाशीर्वाद लाभले.
या सोहळ्यास बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा.दीपा मुधोळ-मुंडे मॅडम,मा.अजितजी पवार सर,मुख्य कार्यकारी अधिकारी जी.प.बीड,मा.नंदकुमार ठाकूर सर,पोलीस अधीक्षक बीड,मा.वासुदेव सोळंके,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जी.प.बीड,मा.बी.सी.भारतीया (राष्ट्रीय अध्यक्ष CAIT न्यू दिल्ली),मा. सचिनजी निवंगुणे (अध्यक्ष CAIT महाराष्ट्र राज्य),मुख्य कार्यकारी अधिकारी न.प.बीड च्या मा. श्रीम.निताजी अंधारे,बीड चे सुपुत्र आणि मुंबई चे उद्योजक मा.शिवाप्रसाद बियाणी तसेच बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू,आमचे सहकारी आणि विहान चे आधारस्तंभ यांनी उपस्थित राहून वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले.या सोहळ्यातील
हा शाही सोहळा मा.संतोष जी सोहनी,मा.विनोद सेठ पिंगळे,जितेश पडधारिया,राजाभाऊ गुलभिले सर आणि त्यांच्या पूर्ण व्यापारी बंधूनी या सोहळ्याचे संपूर्ण दायित्व स्वीकारून हा सोहळा शाही सोहळा केला.
आपण सर्वांनी आमच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यास यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला त्यामुळे आम्ही आपले सदैव ऋणी राहू,आपली साथ अशीच सदैव आमच्या पाठीशी राहील हीच सदिच्छा.
"सर्व पत्रकार बांधवांनी या सोहळ्याला अपार प्रसिद्धी दिली आणि हा सोहळा देशभर प्रसिध्द केला त्याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे"
-डॉ. राजन दहिवाळ, प्रकल्प संचालक विहान प्रकल्प बीड.
-मा.श्री.आनंदजी डोंगरे,विहान परिवार सदस्य