PVP College of Pharmacy, Patoda.

PVP College of Pharmacy, Patoda. Official Page of PVP College of Pharmacy, Patoda, Beed.

16/05/2025
पी.व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसी, पाटोदा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरीपाटोदा (बीड) – पी.व्ही.पी. कॉलेज ऑफ ...
14/05/2025

पी.व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसी, पाटोदा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
पाटोदा (बीड) – पी.व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री. खरात सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
प्राचार्य श्री. तांदळे एस. डी यांनी आपल्या मार्गदर्शनात संभाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवन विद्यार्थ्यांना समजावले आणि त्यांचे विचार आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापक प्रा.पठाण ए. के., प्रा.घुमरे व्ही.एस., प्रा. बहिर एस. एम. प्रा.क्षीरसागर के.आर तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग श्रीमती सरवदे ए.एस., टुले.पी.पी., शिंदे व्ही.एस.,वाघ बी.ए., शेकडे किरण. तसेच विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

02/05/2025
पी. व्ही. पी फार्मसी महाविद्यालयात निरोप समारोह संपन्न !पी. व्ही. पी. औषधनिर्माणशास्त्र  महाविद्यालयात सीनियर विद्यार्थ्...
30/04/2025

पी. व्ही. पी फार्मसी महाविद्यालयात निरोप समारोह संपन्न !

पी. व्ही. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सीनियर विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय फेअरवेल पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी आपल्या सीनियर विद्यार्थ्यांना निरोप दिला आणि त्यांच्याबरोबरचे संस्मरणीय क्षण आठवले.
या समारंभामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला आणि प्रतिभा दाखवली, तसेच कनिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या सीनियर साथीदारांना विविध भेटवस्तू दिल्या आणि त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास प्राचार्य संदीप तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती, प्राचार्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी उपस्थित प्राध्यापक श्री. पठाण ए. के., श्री सय्यद टी.क्यू., श्री. घुमरे व्ही.एस., श्री बहिर एस.एम., श्री बासाद टी. एच., श्री क्षीरसागर के.आर. तसेच इतर शिक्षक्केतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

📍📎पी. व्ही. पी फार्मसी महाविद्यालयात निरोप समारोह संपन्न !पी. व्ही. पी. औषधनिर्माणशास्त्र  महाविद्यालयात सीनियर विद्यार्...
30/04/2025

📍📎पी. व्ही. पी फार्मसी महाविद्यालयात निरोप समारोह संपन्न !

पी. व्ही. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सीनियर विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय फेअरवेल पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी आपल्या सीनियर विद्यार्थ्यांना निरोप दिला आणि त्यांच्याबरोबरचे संस्मरणीय क्षण आठवले.
या समारंभामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला आणि प्रतिभा दाखवली, तसेच कनिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या सीनियर साथीदारांना विविध भेटवस्तू दिल्या आणि त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास प्राचार्य संदीप तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती, प्राचार्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी उपस्थित प्राध्यापक श्री. पठाण ए. के., श्री सय्यद टी.क्यू., श्री. घुमरे व्ही.एस., श्री बहिर एस.एम., श्री बासाद टी. एच., श्री क्षीरसागर के.आर. तसेच इतर शिक्षक्केतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

P.V. P College of Pharmacy, Patoda celebrated Mahatma Jyotiba Phule Jayanti with great enthusiasm. Various cultural prog...
11/04/2025

P.V. P College of Pharmacy, Patoda celebrated Mahatma Jyotiba Phule Jayanti with great enthusiasm. Various cultural programs, lectures and seminars were organized in this program, due to which the students got to know about the work of Mahatma Phule.
On this occasion, the Principal of the college, Mr. Tandale S.D., paid homage by offering a wreath to the statue of Mahatma Jyotiba Phule. On this occasion, the principal, while addressing the students, said that Mahatma Jyotiba Phule made us aware of the values ​​of social justice, education and equality. He told the students about this story and informed them about the work of Mahatma Phule.
Present on this occasion were Prof. Pathan A. K, Prof. Ghumre V.S., Prof. Bahir S. M. Prof. Basad Taha Prof. Kshirsagar Sir all the post-teaching staff Jadhav S. A., Solunke N.R., Sarvade A.S, Tule.P.P, Shinde V.S., Wagh B.A. Rehan Pathan. The program was carried out with the cooperation of all these.

पी.व्ही. पी कॉलेज ऑफ फार्मसी, पाटोदा या महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ...
11/04/2025

पी.व्ही. पी कॉलेज ऑफ फार्मसी, पाटोदा या महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना महात्मा फुलेंच्या कार्याची माहिती मिळाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री तांदळे एस.डी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करताना, सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेच्या मूल्यांची जाणीव आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून दिली, हि गोष्ट विद्यार्थ्यांना सांगत महात्मा फुलेंच्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित प्रा.पठाण ए. के, प्रा.घुमरे व्ही.एस., प्रा. बहिर एस. एम. प्रा.बासाद तहा प्रा.क्षीरसागर सर सर्व शिक्षकोत्तर कर्मचारी वर्ग जाधव एस. ए., सोळुंके एन.आर., सरवदे ए.एस, टुले.पी.पी, शिंदे व्ही.एस., वाघ बी.ए. रेहान पठाण यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.

पी.व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसी, पाटोदा या ठिकाणी आज बीड जिल्ह्यातील मा. खासदार स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांना पुण्यतिथी...
04/10/2024

पी.व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसी, पाटोदा या ठिकाणी आज बीड जिल्ह्यातील मा. खासदार स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले, यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य श्री.तांदळे एस.डी यांनी सांगितले की, स्व.केशरकाकू क्षीरसागर यांना आयुष्यात अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांनी जिद्द आणि त्यांचा करारी बाणा कधीच सोडला नाही. बीड जिल्ह्याचा विकास कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, बीडला आकाशवाणी केंद्र व्हावे ही मागणी त्यांनी केली आणि ती मंजूर झाली. जिल्ह्यासाठी दूरदर्शन केंद्राची मागणी ही त्यांनी केली होती, अंबाजोगाई येथे दूरदर्शन केंद्रही सुरू झाले. आज बीड जिल्हा वासियांना शैक्षणिक व विकासाच्या बाबतीत जे चांगले दिवस पहावयास मिळत आहेत ते फक्त स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्यामुळे, असेही प्रा.तांदळे एस. डी म्हणाले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Address

Dhamangao Road, Patoda
Bhir
414204

Opening Hours

Monday 10:30am - 4:30am
Tuesday 10:30am - 4:30am
Wednesday 10:30am - 4:30am
Thursday 10:30am - 4:30am
Friday 10:30am - 4:30am
Saturday 10:30am - 4:30am

Telephone

+919623195095

Alerts

Be the first to know and let us send you an email when PVP College of Pharmacy, Patoda. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to PVP College of Pharmacy, Patoda.:

Share