Shree mauli clinic and advanced health care center

Shree mauli clinic and advanced health care center Speciality in Homeopathic treatment with pranic healing

Renal stones dislodged after 3 mnths of treatment 5.1 mm and 3.1mm One more happy patientWe treat he cures
17/07/2021

Renal stones dislodged after 3 mnths of treatment 5.1 mm and 3.1mm
One more happy patient
We treat he cures

औषध एक्सपायर होणं म्हणजे नेमकं काय?  औषध expire होतं म्हणजे नक्की काय होतं हेच लोकाना माहित नसतं. औषध expire झालं म्हणजे...
31/07/2019

औषध एक्सपायर होणं म्हणजे नेमकं काय?

औषध expire होतं म्हणजे नक्की काय होतं हेच लोकाना माहित नसतं. औषध expire झालं म्हणजे त्यात विष तयार झालं यासारखे असे अनेक समज आहेत लोकांचे. तर औषध expire होतं म्हणजे त्याच्या लेबल वर त्याची जी स्ट्रेंग्थ लिहिलेली असते, (उदा. क्रोसिन वर लिहिलेले असते each tablet contains paracetamol 500 mg, तर 500 mg ही झाली या औषधाची strength) ती ज्या दिवशी १०% ने कमी होते ती झाली त्या औषधाची expiry date!
मुळात expiry date साठी वापरला जाणारे जे शास्त्रीय नाव आहे ते आहे t-90%. यातला t म्हणजे Time वेळ.
औषध जेव्हा 90% उरते (म्हणजेच १०% ने कमी होते) तो वेळ म्हणजेच expiry date. आता यावरूनच लक्षात येईल की बहुतेक वेळेला expiry date उजाडते तेव्हा त्यावर दिलेल्या dose पेक्षा औषधाची मात्रा कमी झालेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम थोडा फार कमी होतो, तो शून्य होतो असे अजिबात नव्हे.
वर दिलेल्या उदाहरणात १०% म्हणजे 500 पैकी 50 mg paracetamol कमी झाले तरी ४५० mg शिल्लक असतेच, आणि त्याचा परिणाम दिसून येतोच, पण तरीही expiry date नंतर औषधे शक्यतो घेऊ नयेत. त्याचे कारण असे- वरच्या उदाहरणात मी लिहिलंय की औषधाची strength १०% कमी होते. पण म्हणजे नक्की काय होतं? तर औषध हे शेवटी एक chemical आहे आणि काळानुसार ते हळू हळू chemical reactions मुळे degrade होते. हवेतील oxygen मुळे oxidation होऊन किंवा हायड्रोजनमुळे reduction होऊन किंवा सूर्यप्रकाशामुळे किंवा इतर असंख्य chemical reactions मुळे हे औषध degrade होते आणि जसजसा वेळ जाईल तसतसे ते degrade होऊन त्याचे इतर पदार्थात रुपांतर होते.
एका औषधाचे वेगवेगळ्या मार्गाने degradation होऊ शकते आणि त्यामुळे एकाच वेळी त्याची वेगवेगळी reaction products बनू शकतात. ही reaction products निरुपद्रवी असतील तर त्याचा परिणाम इतकाच होतो कि औषधाची strength कमी होते. पण कधी कधी मात्र ही reaction products अपायकारक असूही शकतात. अर्थात प्रत्येक औषधाचा अश्या प्रकारचा forced degradation study औषध कंपनीत केलेला असतोच आणि expiry date पर्यंत त्यात काहीही अपायकारक reaction product बनत नाही ना हे तिथे पहिलेच जाते, पण expiry date नंतरचा असा अभ्यास मात्र कंपनीने केलेला नसतो.
समजा औषधावर लिहिलेली expiry date २ वर्षे आहे. तर मग जो अभ्यास केला जातो तो या दोन वर्षांचाच असतो. पण समजा हे औषध दोन तीन वेगवेगळ्या degradation pathways ने degrade होते आहे, ज्यातला एक pathway अत्यंत संथ आहे, त्याचे reaction product ४ वर्षानंतर बनतेय आणि ते अपायकारक आहे, आणि असे औषध जर कुणी expiry date नंतर घेतले तर अपाय होऊ शकतो.
देशात जिथे रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे तिथे ही गोष्ट लोकांना समजावून सांगणे कठीण आहे. शिवाय कुठले औषध expiry नंतर घेतले तर चालेल आणि कुठले नाही हे सांगणे ही कठीण आहे, कारण हजारो औषधे बाजारात आहेत. आणि म्हणूनच expiry date नंतर औषधे न घेणेच उत्तम.

38 yrs male patient came with complaint of bilateral renal calculi right sided 5.5mm 4.4 mm 3.0 mm and left sided 4.2 mm...
16/01/2019

38 yrs male patient came with complaint of bilateral renal calculi right sided 5.5mm 4.4 mm 3.0 mm and left sided 4.2 mm
In October 2018 patient is given ayurvedic medicine at Mauli clinic for 3 months the patient get 2 right sided stones dislodged and left sided stone reduced in size
Usg reports are attached
For treatment of renal stones plz contact

24/05/2018

💥 _*'निपाह' व्हायरस; हाय अलर्ट घोषित*

सध्या केरळ राज्यामध्ये 'निपाह' व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डबल्यूएचओ) च्या मते, निपाह व्हायरस हा वटवाघळांमधून फळांमध्ये आणि फळांतून प्राणी तसेच माणसांत पसरतो. 1998 मध्ये सर्वात आधी मलेशियाच्या कांपुंग सुंगई निपाहमध्ये अशा प्रकारच्या केसेस पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याला निपाह व्हायरस असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचे परिणाम पाहायला मिळाले होते. 2004 मध्ये बांगलादेशात या व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळाला होता.

👉 _*लक्षणं काय आहेत?*_

▫ हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.

▫ हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण आढळतात.

▫ लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.

▫ अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृद्याच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे निदर्शनास आले.

▫ ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे 7-10 दिवस आढळतात.

▫ सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे.

👉 _*काय काळजी घ्याल?*_

▪ सध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही.

▪ पडलेली फळं, प्रामुख्याने खजुराचे फळं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो.

▪ संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा.

▪ वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे.

▪ मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा. तुम्हाला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे.

Address

At Anjur Village
Bhiwandi
421302

Telephone

+919967379197

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree mauli clinic and advanced health care center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category