Official Page of Dr. Madhu Manwatkar, a renowned gynecologist from Bhusawal, Maharashtra.
Address
Bhusawal
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Dr. Madhu Manwatkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Category
मानवतकर दाम्पत्याकडून पूरग्रस्तांसाठी १ लाख रुपयाचा मदतनिधी मुख्यमंत्र्यकडे सुपूर्द
भुसावळ : येथील डॉ . मधु मानवतकर व डॉ . राजेश मानवतकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तासाठी एक लाख रुपये किमतीचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी मा . मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केला . अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भुसावळ येथील डॉ . राजेश मानवतकर व डॉ . सौ . मधु मानवतकर यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय भाग घेतला आहे . गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अफाट जनसंपर्क असलेले डॉक्टर मानवतकर दांपत्य डॉ . मानवतकर बहुउद्देशिय संस्थेव्दारा जनप्रबोधन व जनकल्याण हेतुने सतत समाजकार्य करीत आले आहेत . या उपक्रमाचाच एक भाग म्हणून नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरातील संकटग्रस्तांना मदत व्हावी म्हणून एक लाखाची मदत केली आहे . महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिनांक २४ ऑगस्ट रोजी भुसावळ शहरात आले होते . मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानवतकर दांपत्यांने एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे दिला . या प्रसंगी झालेल्या सदिच्छा भेटीत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दांपत्याशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले .