Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist

  • Home
  • India
  • Boisar
  • Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist

Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist If you are seeking for psychological service, counseling for career, marriage, child, old-age. when

मानसिक आजार.सिरोटोनिन कमी झाल्याने (मेंदूच्या विशिष्ट भागात) ऑब्सेसिव्ह कम्प्लसिव्ह डिसॉर्डरची लक्षणे दिसू लागतात.डॉक्टर...
27/02/2025

मानसिक आजार.

सिरोटोनिन कमी झाल्याने (मेंदूच्या विशिष्ट भागात) ऑब्सेसिव्ह कम्प्लसिव्ह डिसॉर्डरची लक्षणे दिसू लागतात.
डॉक्टर, आमच्या घरात तर काहीच ताणतणाव नाही, टेन्शन घेण्यासारखं काही घडलं नाही, आर्थिक बाबतीत सर्व छान आहे. मुलं छान आहेत. मग का माझ्या पत्नीला डिप्रेशन यावं?’

‘कुठलाही मनोविकार होण्यामागे फक्त बाहेरच्या वातावरणातील सध्याच्या गोष्टीचाच परिणाम होतो असं नाही तर आधी घडलेल्या घटनांचा त्या व्यक्तीने केलेला विचार, त्या व्यक्तीचा स्वभाव तसेच मेंदू, शरीरात होणारे जीवरासायनिक असंतुलन अशी विविध घटकांचा एकत्रित परिणाम होत असतो. याला बायोसायकोसोशल मॉडेल किंवा मनोजैविक सामाजिक प्रारूप असं म्हणतात.

खूप पूर्वी हिप्पोक्रेटसने नैराश्य हे शरीरात ब्लॅक बाइल या जीवरसाचे प्रमाण वाढल्याने होते, असे म्हटले होते. शरीरात चार प्रकारचे जीवरस असतात, त्यांच्या पातळीत चढउतार झाल्याने विविध मनोविकार होतात, असे त्याचे म्हणणे होते; जे आजचे संशोधन बघता खरे होते असेच म्हणता येईल.

आपल्या मेंदूच्या पेशी ऐकमेकांना चिकटलेल्या नसतात, त्यांच्यामधील जागांमध्ये विविध जीवरासायनिक संप्रेरके (न्यूरोट्रान्समीटर) असतात. त्या संप्रेरकांद्वारे संदेशवहनाचे काम होत असते. त्यातूनच विचार, भावना, वागणे, विविध संवेदना, त्यांचे नियंत्रण, बौद्धिक, स्मरणविषयक कार्यही पार पाडायला त्यांची मदत होते. पण याच जीवरासायनिक संप्रेरकांची पातळी कमीजास्त झाल्याने विविध मनोविकार होताना दिसतात. त्याचबरोबर आपल्या मेंदूतच स्वायत्त आणि परास्वायत्त (सिम्पथेटिक, पॅरासिम्पथेटिक) चेतासंस्था असतात. त्यातील स्वायत्त चेतासंस्थेच्या अतिरिक्त उद्दीपनामुळे भयगंडासारखे विकार होतात. डोपामिन जास्त आणि सिरोटोनिन कमी झाल्याने स्क्रिझोफेनियाची विविध लक्षणे दिसू लागतात तर सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामिन यांमधील असंतुलनामुळे नैराश्याची विविध लक्षणे दिसतात. सिरोटोनिन कमी झाल्याने (मेंदूच्या विशिष्ट भागात) ऑब्सेसिव्ह कम्प्लसिव्ह डिसॉर्डरची लक्षणे दिसू लागतात. यात संबंधित व्यक्ती विशिष्ट गोष्टींनी पछाडल्यासारखी वागू लागतात.

शरीरातील संप्रेरकांचा व मनाचा, मेंदूचा जवळचा संबंध असतो. थॉयराइडचे प्रमाण रक्तात वाढल्याने चिंतेचे विकार तर कमी झाल्याने नैराश्याचे विकार होतात. अनुवांशिकतादेखील या विकारांवर प्रभाव टाकते. घरात कोणाला मनोविकार असेल तर इतर व्यक्तींना होण्याची (भाऊ , बहीण, रक्ताची नाती) शक्यता बळावते. मनोविकार नाही झाले तरी व्यक्तिमत्त्व दोषांच्या रूपात तरी नक्कीच आढळून येते. स्किझोफ्रेनियासारख्या आजारांचे आणि स्मृतिभ्रंशांच्या (अल्झायमर) गुणसूत्रांचे शोध लागत आहेत, ज्यामुळे औषधोपचार अधिक प्रभावी होऊ शकतील.

मानसशास्त्रीय कारणांमध्ये एखाद्या घटनेचा आपण कसा विचार करतो, आपला दृष्टिकोन, आपले व्यक्तिमत्त्व दोष, बौद्धिक क्षमता हे घटकही महत्त्वाचे असतात. नापास होणाऱ्या सर्वानाच नैराश्य येत नाही, पण नापास होणे म्हणजे महाभयानक, मी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही असा विचार करणारी व्यक्ती निराश होईल. निराशावादी, परावलंबी, जबाबदारी टाळणाऱ्या मानसिकतेच्या व्यक्तींना नैराश्य लवकर येते. अतिचिकित्सक, अतिव्यवस्थित व्यक्तींना चिंता, नैराश्य, ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर होण्याची शक्यता जास्त असते.

एकलकोंडया, संशयी व्यक्तींना स्क्रिझोफेनिया, सायकोसिसचे विकार जास्त लवकर होतात वा टिकून राहतात, तर बॉर्डरलाइन व्यक्तिमत्त्व दोषांच्या व्यक्ती पटकन आक्रस्ताळेपणा, अतिक्रोध, नैराश्य, व्यसनांना बळी पडतात, तर अहंकारी व्यक्ती समस्याच नाकारतात त्यामुळे उपाय/उपचारदेखील!

अतिबुद्धीला योग्य न्याय न मिळाल्यास नैराश्य पटकन येते तर गतिमंद, मतिमंद मुलांमध्ये सायकोसिस, स्क्रिझोफेनिया, मंत्रचळ (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) हे विकार जास्त आढळतात. थोडक्यात, आपला दृष्टिकोन, व्यक्तिमत्त्व दोष, बौद्धिक पातळी, भावनांक हे मनोविकार व्हायला, दीर्घकालीन राहायला वा बळावायला महत्त्वाचे घटक ठरतात!

व्यक्तिगत आयुष्यात येणारे ताणतणाव उदा. जोडीदाराचा वियोग/घटस्फोट, अपयश, आर्थिक नुकसान, बेकारी, सामाजिक पातळीवर होणारी हेटाळणी, निंदा, दुजाभाव, सामाजिक आपत्ती (दंगली), नैसर्गिक आपत्ती या गोष्टी चिंता, नैराश्य, होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. कुटुंबातील व्यक्तींचे आंतरसंबंध, त्यातील तणाव, अढी यामुळेदेखील नैराश्य, चिंता बळावू शकते.

त्याचबरोबर कुटुंबात मनोविकार झालेल्या व्यक्तीचा होणारा सकारात्मक/नकारात्मक स्वीकार, मनोविकाराचा पूर्ण स्वीकार हा घटक उपचारांचे यशापयश ठरवायला महत्त्वाचा असतो. कुटुंबाकडून होणारे अतिलाड, जपणूक किंवा हेटाळणी, दुर्लक्ष, उपचारात, विकार बरा होण्यात बाधा ठरतात.

थोडक्यात जैविक, मानसिक, सामाजिक/कौटुंबिक सर्व घटक हातात हात घालून मनोविकार व्हायला किंवा तो बळावायला मदत करतात. त्यामुळे उपचारदेखील औषधोपचार, मानसोपचार /समुपदेशन, गट मानसोपचार, पुनर्वसन असे एकत्रितपणे घ्यावे लागतात!

सुजाता साने.

24/08/2024
सर्व बाह्य उपाय वापरूनही माझ्या स्वभावात, नकारात्मक भावनेत, खिन्न विचारांत बदल झालेला नाही हे स्वीकारून लवकरात लवकर मानस...
18/03/2024

सर्व बाह्य उपाय वापरूनही माझ्या स्वभावात, नकारात्मक भावनेत, खिन्न विचारांत बदल झालेला नाही हे स्वीकारून लवकरात लवकर मानसिक आधार शोधणे गरजेचं आहे.

अनेक जण स्वतःच्या समस्यांचं स्वतःच निदान करतात. बोलताबोलता सरळ मला डिप्रेशन आलं आहे असं म्हणून मोकळं होतात. पण नैराश्य किंवा कोणत्याही मानसिक आजाराच्या संज्ञा सहज वापराव्यात इतक्या साध्या नाहीत. आपला ताण, आपल्या मानसिक आजाराच्या समस्या अनेक पातळ्यांवर असतात. त्यांचं निदान आणि उपचार करण्याचं काम आपण डॉक्टरांवरच सोपवलं पाहिजे,म्हणूनच आजच कॉल करा आणि मिळवा उत्तम मार्गदर्शन मानसिक आधारावर सुजाता साने यांच्यासमवेत

For Appointment & consultations contact us on 9860537308/9881609641

Visit us at Metro Phoenix Hospital, Boisar west

# Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist
# Dr. Sujata Sane

Struggling with anxiety, depression, or relationship issues? Our therapy sessions offer a safe space for healing and gro...
17/03/2024

Struggling with anxiety, depression, or relationship issues?

Our therapy sessions offer a safe space for healing and growth. Let's walk this journey together.
DM to schedule your session.

For Appointment & consultations contact us on 9860537308/9881609641
Visit us at Metro Phoenix Hospital, Boisar west.

# Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist # Dr. Sujata Sane

काउंसलिंगच्या महत्वाची समज घ्या आणि तुम्हाला त्यामध्ये काय लाभ होईल, ते समजून घ्या;अधिक माहितीसाठी संपर्क करा सुजाता साण...
16/03/2024

काउंसलिंगच्या महत्वाची समज घ्या आणि तुम्हाला त्यामध्ये काय लाभ होईल, ते समजून घ्या;

अधिक माहितीसाठी संपर्क करा सुजाता साणे

For Appointment & consultations contact us on 9860537308/9881609641
Visit us at Metro Phoenix Hospital, Boisar west


डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशनची लक्षणे व त्यावरील उपाय अलिकडील स्पर्धेच्या युगात डिप्रेशनच्या समस्येने मोठे रौद्र रूप धा...
16/03/2024

डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशनची लक्षणे व त्यावरील उपाय

अलिकडील स्पर्धेच्या युगात डिप्रेशनच्या समस्येने मोठे रौद्र रूप धारण केले आहे
सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात डिप्रेशन ही फक्त प्रौढांचीच समस्या बनून न राहता तिने तरुण, मुले यांनासुद्धा आपली शिकार बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात डिप्रेशन ही मोठी समस्या बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

• सतत उदास किंवा निराश वाटणे.
• नवीन व्यक्तींची व नवीन ठिकाणांची अनाठायी भिती वाटणे.
• स्वतः दोषी असल्यासारखे वाटणे.
• कायम स्वतः ला काही इजा करावीशी वाटणे किंवा आत्महत्या करावी वाटणे.
• कारण नसताना पचनाच्या समस्या जाणवणे.
• कधी कधी अचानक हसू किंवा रडू येणे.

कोणत्याही डिप्रेशनसंबंधित लक्षणे अनुभवल्यास कृपया आमच्या टीमशी संपर्क करा.
For Appointment & consultations contact us on 9860537308/9881609641
Visit us at Metro Phoenix Hospital, Boisar west


# Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist # Dr. Sujata Sane

तुमच्या जीवनातील काही कठीण परीस्थितींमुळे तुम्हाला दडपल्यासारखे वाटतं का?कोणत्याही चिंता, निराशा किंवा तणावाचा सामना करण...
13/03/2024

तुमच्या जीवनातील काही कठीण परीस्थितींमुळे तुम्हाला दडपल्यासारखे वाटतं का?

कोणत्याही चिंता, निराशा किंवा तणावाचा सामना करण्यासाठी तुम्ही संघर्ष करत आहात का?

तुम्ही एकटे नाही आहात!

"सुजाता साने" यांच्या क्लिनिक मध्ये आम्ही तुम्हाला पुरवतो:

-वैयक्तिक काळजी
-सुरक्षित आणि आश्वासक वातावरण"

For Appointment & consultations contact us on 9860537308/9881609641
Visit us at Metro Phoenix Hospital, Boisar west



Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist # Dr. Sujata Sane

भोजन विकार (ईटिंग डिसऑर्डर)या समान्य शब्दों में इसे समझे तो ये खाने से जुड़ा एक ऐसा डिसऑर्डर जो एक खतरनाक व्यवहारात्मक स...
12/03/2024

भोजन विकार (ईटिंग डिसऑर्डर)
या समान्य शब्दों में इसे समझे तो ये खाने से जुड़ा एक ऐसा डिसऑर्डर जो एक खतरनाक व्यवहारात्मक समस्या है। इसमे इंसान को बहुत कम खाने या बहुत अधिक खाने की लत सी हो जाती है। इसके अतिरिक्त इंसान अपने शेप, साईज और वेट को लेकर बहुत ही कॉनेसेस या चिंतित हो जाता है।

भोजन विकार (ईटिंग डिसऑर्डर) एनोरेक्सिया के लक्षण

✅दुबला पतला होने के बाद भी वजन बढ़ाने से डरना
✅खाना खाने के बारे में झूठ बोलना
✅अचानक वजन कम होना
✅वेट, साईज शेप को लेकर जरुरत से ज्यादा चिंतित होना
✅स्लिम या पतला कहे जाने पर गुस्सा होना या उसका खंडन करना
✅वजन कम करने के लिए दवा लेना
✅खाने के बाद अधिक व्यायाम करना

For Appointment & consultations contact us on 9860537308/9881609641
Visit us at Metro Phoenix Hospital, Boisar west.


# Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist

Forge Your Path -Career Counselling for Clarity and ConfidenceHey there, career explorers! Do you need help with your ca...
11/03/2024

Forge Your Path -Career Counselling for Clarity and Confidence

Hey there, career explorers!
Do you need help with your career path?
It’s time to clear up that confusion and gain some much-needed career clarity!
1. Why is Career Clarity Key to Career Success?
2. Challenges Faced While Trying to Find Career Clarity
3. Strategies for Achieving Career Clarity

career clarity is a crucial component of career success. It gives people direction and motivation, and it helps them make smart choices about their career paths.
So why wait? Get started today with Sujata Sane
For Appointment & consultations contact us on 9860537308/9881609641
Visit us at Metro Phoenix Hospital, Boisar west

# Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist

अटेंशन डेफिसिट हाइपरएक्टिविटी डिसऑर्डर (ADHD) एक रोग-निदान है जो निम्नलिखित चुनौतियों का सामना कर रहे लोगों के लिए किया ...
11/03/2024

अटेंशन डेफिसिट हाइपरएक्टिविटी डिसऑर्डर (ADHD) एक रोग-निदान है जो निम्नलिखित चुनौतियों का सामना कर रहे लोगों के लिए किया जाता है ।

एडीएचडी क्या है?
ADHD का मतलब अटेंशन डेफिसिट हाइपरएक्टिविटी डिसऑर्डर है । यह एक चिकित्सीय स्थिति है. एडीएचडी वाले व्यक्ति के मस्तिष्क के विकास और मस्तिष्क की गतिविधि में अंतर होता है जो ध्यान, स्थिर बैठने की क्षमता और आत्म-नियंत्रण को प्रभावित करता है। एडीएचडी बच्चे को स्कूल, घर और दोस्ती में प्रभावित कर सकता है।

For Appointment & consultations contact us on 9860537308/9881609641
Visit us at Metro Phoenix Hospital, Boisar west.

आपल्या सशक्त महिला मैत्रिणींना आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याला सलाम!आज महिला दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!...
08/03/2024

आपल्या सशक्त महिला मैत्रिणींना आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याला सलाम!
आज महिला दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist # Dr. Sujata Sane

Address

Navapur Road
Boisar
401503

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

09860537308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sujata Sane Psychologist & Counselor Mumbai/palghar CBT + REBT Therapist:

Share