05/08/2022
४ऑगस्ट (National Bone and Joint day) निमीत्त ;
*डॉ प्रफुल्ल जैस्वाल अस्थिरोग तज्ज्ञ, शारदा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, बुलडाणा* यांचे कडून सर्वसामान्य जनते ला मार्गदर्शन:-
*का होतात अपघात ?*
१. पुरेशी झोप झालेली नसतांना वाहन चालवणे,
२. वाहनात बिघाड असल्यास,
३. मद्यपान करून वाहन चालवणे,
४. मानसिक ताणतणावात वाहन चालवणे,
५. रस्ता व्यवस्थित नसल्यास खड्डे हुकवण्याच्या नादात इतरांना धक्का लागणे,
६. शिकावू चालकाने महामार्गावर अथवा रहदारीच्या ठिकाणी वाहन चालवणे,
७. वाहन चालविण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणारी सांकेतिक चिन्हे समजून न घेणे (ex. समोर धोक्याचे वळण आहे वाहन सावकाश चालवा, समोर चौफुली आहे, पुढे पूल आहे इ.),
८. शहरात सिग्नलचे नियम न पाळने,
९. गतीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे.
*वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी ?*
१. चालकाने वाहन चालवण्याचे नियम समजूनच वाहन चालवावे,
२. मद्यपान करून वाहन चालवू नका,
३. नेहमी प्रवासाआधी पुरेशी झोप घ्यावी,
४. आरशात मागील वाहनाचा अंदाज घेऊनच वाहन चालवा,
५. वेग मर्यादा पाळावी,
६. घाईने वाहन चालवू नका,
७. शारीरिक किंवा मानसिक स्थिती स्थिर नसल्यास शक्यतो वाहन चालवणे टाळा.
*चुकून अपघात घडल्यास काय करावे*
१. वाहनातून तात्काळ बाहेर पडावे,
२. जखम झाली असल्यास, किंवा रक्त येत असल्यास, कपड्याने ती जखम बांधून घ्या,
३. अपघात घडताच आजूबाजूच्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करावा,
४. गंभीर इजा असेल तर घाबरून न जाता स्वतःला धीर द्या,
५. अपघात घडल्यास तात्काळ जवळच्या कुणाला तरी फोन करावा अथवा आपत्कालीन नंबर १०० (पोलीस), १०१ (अग्निशमन), १०२ (रुग्णवाहिका), ११२ (राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक), १०८ (आपत्ती नियंत्रण पथक) पैकी कोणत्याही क्रमांकावर संपर्क करावा,
*काय आहेत अपघात टाळण्याचे उपाय ?*
१. सीट- बेल्ट लावणे,
२. नियमितपणे वाहनाच्या टायरची हवा चेक करणे,
३. वाहनाचे लाईट आणि ब्रेक यांची तपासणी नियमितपणे करा,
४. एअर बॅग दुरुस्त नसतील तर वेळीच दुरुस्ती करा,
५. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांनी गाडीतून प्रवास करु नये.