11/07/2025
📌 गुरुपौर्णिमा विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
🗓️ १० जुलै २०२५
सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नारायणगाव आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले.
या उपक्रमात नारायणगाव परिसरातील नागरिकांनी हाडांची घनता, रक्तदाब, मधुमेह व ऑक्सिजन लेव्हल अशा महत्त्वाच्या तपासण्यांचा लाभ घेतला. तसेच ECG, X-Ray, MRI, CT Scan व 2D Echo यांसारख्या तपासण्यांवर विशेष सवलती देण्यात आल्या. या शिबिरासाठी डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले.
सायंकाळच्या सत्रात गुरुपूजन आणि भक्तिमय सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने आयोजित या सत्संगात श्री. उमेश (भैय्या) शिंदे व त्यांच्या टीमने भक्तिभावपूर्ण सादरीकरण करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमानंतर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा अनोखा संगम नागरिकांच्या मनात समाधान आणि आनंदाचे भाव निर्माण करून गेला.