16/04/2026
भीमजयंती आणी लागलेले गालबोट,,,अतिशय दुःखद घटना .
भीम जयंती ला लागलेले गालबोट, ईतका उत्साह,....
7 लाखांचा डिजे , आणी लाखों-लाख चा खर्च, ईतकी वर्गणी गोळा होते ,ह्यावर विश्वासच नाही ,"जयभीम वाले खुप श्रीमंत झालेत ,आरक्षण घेवून घेवून "
साहाजिकच आहे ,लोक बोलणार..
ह्या पैशाचे ऑडिट होणे गरजेचे आहे ..
ईतका पैसा कोण फंडिंगकरतो ??? काही हिशोब ???? संताप येतो .. मिरवणूका घातक झाल्या आहेत, आधी सिनेमात देवीच्या मिरवणुकीत खून होणे बघीतले ,पण भीम जयंती ला होणे ,अतिशय दुःखद आहे .
नेमकी आपण जयंती कोणाची साजरी करत आहोत , त्या महान व्यक्तिमत्त्वाची ज्यांनी कित्येक दिवस पाव खावून दिवस काढले ,त्यांच्या दृष्टिपुढे दिनदुबळे दलित व त्यांचा उद्धार .....हेच ऐकमेव ध्येय .....काय करू ..किती करू ..कसे करू ,संपूर्ण कुटुंब ह्यातं पणासं लागलं ना...
समाजात चांगल्या प्रबोधनकारांची कमतरता आहे ,ज्यांच्याजवळ पदं आहेत त्यांना प्रबोधन कळतं नाही ,दिशाहीन आहेत ,मानसिक रित्या दुबळे आहे ,स्वतःला काहीच कळेनासे झाले कि व्यक्ति ऐक कळसुत्री बाहुली होवून जाते मग ति नाचनाच नाचते ...अशीच काहीशी भीम जयंती झालेली ...
बाबासाहेब ह्याची गाणी . . कशी तयार करायची ..डिजे वर धडमधडमधडम.. बाकी काय बोल आहेत काहीच कळत नाही ....नाचणे आवश्यकच.....जयंती कशासाठी फक्त नाचण्याची .....आमच्या बापाची जयंती..
अरे चांगली गाणी बनवा ,भारतीय संगीत जिवंत ठेवा ,स्पर्धा आयोजितक करा , हाॅलबुक करा ,मैदान बुक करा ,व्यवस्थीत नियोजन करा .
ऐका मिरवणुकीत सोनुनिगम चे गाणे लागले "बुद्ध हि बुद्ध है ".....मिरवणुकीत लोकांनी लगेच बंद करायला लावले ,...का ? ते ईतरांचे आहे ....अशीच मानसिकता ...चांगले कानाला ऐकायला मधूर असेतरी बनवा ना ....
ऐनर्जी ईतकी कि वाखाण्याजोगीच , जर नशाकरून येत असेल तर त्या तोंडाने जयभीम म्हणूच नका ना ..तुम्हाला तो अधिकार नाही ...
बरे बाप जिवंत नाही ,नाहीतर शप्पथ, त्यांनी कानाखाली हाणली असती ..
अरे नाचायचे आहे ना तुम्हाला ..रस्यावर काय नाचता गड्यांनो स्टेज वर नाचा .... कला आहे ना मग ...स्पर्धेत उतरा ....मिरवणूक कशाला ??
संघातील ऐका आदरणीय व्यक्तिने मला शुभेच्छां दिल्या ...बोलले आम्ही 12 तास वाचनाचा कार्यक्रम घेतला पुण्यात, आमच्याच शाळेतील विद्यार्थी ,आमच्याच वाचनालयात आम्हीच पुस्तके दिलीत ,आणी आम्हीच बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महत्वाचे उतारे वाचायला दिलेत ,त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली , अल्पोपाहार , शरबत ई ....आता मी त्यांना ठासून सांगितले कि शेवटी काय ""we the people of India " मला थोडे भरून आले ,कि ईतर सारेच बाबासाहेब आंबेडकर वाचायला लागलेतं , बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व आहेत कि ते अभ्यासावे लागतात म्हणून त्यांना सिंबाॅल ऑफ नाॅलेज म्हणतात .
बहुतेक जनसामान्य ह्यांना" बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप ,जयभीम "
ईतकेच का ???
मि जेव्हा पण प्रबोधनासाठी जाते ,जे मी सांगते ते लोकांना थोडे नवीन वाटते ,
कारण मी वाचते .
कारण बोलले नाहीत बाबासाहेब " वाचाल तर वाचाल ,वाचणार नाहीतर वाचणार नाही " जर भीम.
"We the people of India ""रहा ,अभिमानाने सारे .
डाॅक्टर शरयू पाझारे . ऐम ऐस जनरल सर्जन. चंद्रपूर.