10/04/2025
पांढऱ्या ऍप्रन मधल्या मुलाचं
स्वप्न पाहतो एक बाप,
गळ्यात स्टेथोस्कोप घातलेल्या
लाडक्या लेकराचे स्वप्न पाहते एक आई... ..... तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर.
आपली हौस - मजा बाजूला ठेवून एक पिढी करते होम आपल्या आयुष्याचा........ तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर.
क्षितिजावर पाय रोवून
आकाश कवेत घेण्याची जिद्द
आपल्या मुलात निर्माण करतात आई - बाप ........तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर.
आई बापाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी
सर्वस्व पणाला लावतो कुणीतरी ........तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर.
टीव्ही - खेळ आणि इतर आकर्षण टाळून
गाडून घेतो अभ्यासात कोणीतरी ........तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर.
इतर तरुणाई जेव्हा सुखानं झोपलेली असते
तेव्हा पुस्तकांच्या संगतीत जागत असतो कुणी तरी .........तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर
सळसळत्या तारुण्याचा बाहेर जल्लोष चालू असतो ,
तेव्हा हॉस्पिटलच्या चार भिंतीत
कोंडतो आपलं तरुण पण कोणी तरी ........तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर
दोन पिढ्यांची पुण्याई अन् कष्ट
एकत्र येतात........तेव्हा कुठे एक डॉक्टर निर्माण होतो.
सगळं जग शांतपणे आपल्या माणसात झोपलेलं असतं...
तेव्हा ICU त दुसऱ्यासाठी जागत असतं कुणीतरी,
आपल्याच माणसांना स्पर्श करायला
जेव्हा घाबरतात सगे - सोयरे
तेव्हा त्याच्या जीवासाठी लढत असतं कुणीतरी,
कधीतरी अचानक निसटू लागतं आयुष्य हातातून
तेव्हा विश्वासाने आधार बनून उभं असतं कुणीतरी........तो डॉक्टर असतो.
लुटारू म्हणण्याआधी आणि हात उगारण्या आधी शक्य झालं तर कुटुंबात एक डॉक्टर तयार करा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐