
04/09/2023
पाहताक्षणीच तुम्हाला वाटले असेल की हे चंद्रयान 3 ने पाठवलेले चित्र आहेत म्हणुन....
परंतु हे चित्र आहे अहेरी सिरोंचा मार्गावरचे....
अशीच परिस्थिती अहेरीत आणि परिसरात आहे...
परिसराच्या विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जिवाशी झालेला हा मोठा खेळ आहे...
पर्यायी रस्त्याच्या मंजुरी विनाच माइनिंग सुरू करायची घाई... बरे... रस्त्याची कुवत नसतांना 1300 गाड्या रोज पळवायच्या.. कोण घेऊन जाणार होते ती माती...
सिरोंचा गावाचे तर काही दोषाच नाही मग त्यांना रास्ता खराब देण्याचे कारण काय.. गेल्या 7 वर्षापासुन हा रस्ता श्रापित आहे.. तयार रस्त्याचे डांबरीकरण तेवढेच ना करायचे होते....
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री म्हणुन आजपर्यंत सर्व हेवी वेट मंत्रीच लाभले परंतु त्याचें पूर्ण लक्ष मात्र सुरजगड खाणीच्या उत्पादनावर आहे.
आता ह्याला विरोधक म्हणुन कुणीच उरला नाही कारण उत्खननाचा भरण सगळ्यांच्या खड्ड्यात पडला आहे...
जो तो आता पालखीचा भोई झाला आहे..
एक बीजेपी समर्थक आणि मतदार म्हणुन मला ह्याची खंत जाहीर करायची ईच्छा मी इथून व्यक्त करत आहे.
ज्याला कुणाला माझे मत पटत असेल तसल्या प्रत्येक व्यक्तीने ही पोस्ट स्वतःच्या नावाने पोस्ट केल्यासही माझी हरकत नाही!
डॉ प्रसन्न मद्दीवार