15/08/2025
अन्न व औषध प्रशासन (एफ.डी.ए.) चंद्रपूर व होलसेल केमिस्ट सदस्य, चंद्रपूर जिल्हा
यांची परिसंवाद सभा श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृह चंद्रपूर येथे केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे दिनांक 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली.
या सभेला होलसेल केमिस्ट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या परिसंवादामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे होलसेल केमिस्टना मार्गदर्शन व त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर मा. सुहास सावंत सर स्वतः उपस्थित राहिले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सीडीसीडीए अध्यक्ष बंटीभाऊ घाटे, तर परिसंवादाच्या पहिल्या सत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. सुहास सावंत सर (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर) व सौ नालंदा उरकुडे मॅडम, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर उपस्थित होते. दुसऱ्या सत्रामध्ये संघटनात्मक बाबी व व्यावसायिक अडचणी यावर मार्गदर्शन करण्यासाठी पंकज भाऊ नानवाणी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा केमिस्ट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन, श्री संजय जी पिंपळखुटे अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशन, निमंत्रित सदस्य, यवतमाळ जिल्हा सचिव संजय बुरले, कोषाध्यक्ष प्रसाद चौधरी हे उपस्थित होते. तसेच संघटनेचे सचिव जितेंद्र राजा, उपाध्यक्ष अशोक येरगुडे, उमेश वासलवार, सचिन चिंतावार,प्रशांत जाजू, कोषाध्यक्ष अनुप वैगींवार, संघटन सचिव प्रशांत गोठी, स्वीकृत सदस्य रणजीत दांडेकर, आशिष गौरकर, कवेश सहारे, प्रतीक चौकसे महिला अध्यक्ष सौ वैशाली पवार व सचिव प्रियंका ईखार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक होलसेल सचिव चेतन जगशेट्टीवार यांनी केले, तर संचालन रणजीत दांडेकर यांनी केले.
मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त सुहास सावंत सर यांनी ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अंतर्गत होलसेल फार्मसीमध्ये पाळावयाच्या खबरदारींची तसेच होलसेल फार्मसी इन्स्पेक्शन संदर्भातील शंका व प्रश्नांचे निरसनही त्यांनी प्रभावीपणे केले.
इतर राज्यातून खरेदी करताना घ्यावयाची काळजी, नकली औषधे व सब स्टॅंडर्ड औषध विक्री कशी टाळता येईल त्या बद्दल सविस्तर माहिती दिली
संजयजी पिंपळखुटे यांनी संघटनात्मक बाबींवर चर्चा केली व राज्य आणि देश पातळीवर संघटना काय काय करत आहे त्यावर मार्गदर्शन केले. आपण सर्व संघटित राहू तरच सर्व अडचणींवर आपण मात करू व सुरळीत व्यवसाय करू हे प्रामुख्याने त्यांनी सदस्यांच्या मनात बिंबविले.
व्यावसायिक मार्गदर्शन करताना पंकज जी नानवाणी यांनी संघटनेने नेमून दिलेले होलसेलर चे नियम व संहिता तसेच ,होलसेल व्यवसायातील अडचणी व व्यवसायाची खर्च ताळेबंदी यावर नियंत्रण कसे ठेवायचे ,कर्मचारी स्टॉक मॅनेजमेंट एक्सपायरी ब्रेकेज एक्सपेंस नियंत्रण यावर आपल्या रोखठोक शैलीत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात बंटीभाऊ घाटे यांनी
संघटना व्यक्ति केंद्रित न राहता सर्वसामान्य केमिस्ट सभासदांसाठी काम करेल अशी ग्वाही दिली.
होलसेल फार्मसी चालवताना येणाऱ्या अडचणी, औषध विक्रीसंबंधी नियम, तसेच इन्स्पेक्शनवेळी येणाऱ्या समस्यांबद्दल मांडणी केली व यावर योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती केली.
कार्यक्रमांमध्येच नावनियुक्त निमंत्रित सदस्य संजयजी चिंतावार व विजय काबरा यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी होलसेल अध्यक्ष नीरज भास्करवार, सचिव चेतन जगशट्टीवार ,चंद्रपूर शहर अध्यक्ष अक्षय येरगुडे ,सुमित बावणे, सचिव याकूब पठाण ,प्रफुल भरडकर आणि सचिन खोब्रागडे आशिष खणके जितू क्षीरसागर, सर्व होलसेल केमिस्ट सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
– CDCDA