20/05/2025
5 दिवसापूर्वी राऊत ऑर्थोपेडिक हॉस्पिटल चिखली येथे गुडघा बदलण्यची शस्त्रक्रिया (Total Knee Replacement)केली. आजी खुप समाधानी आहेत. आज आपन गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय ते समजून घेऊयात.
एखादे मशिन जुने झाल्यावर त्याचे जुने भाग करकरायला लागतात किंवा आवाज करायला लागतात ,तसेच आपल्या शरीराचेही असते. वयोमानाने किंवा काही इतर कारणानी अवयव तक्रार करायला लागतात. जसजसे वय वाढते तसतसे हाडांची झीज होते आणि गुडघेदुखीची समस्या उद्भवते. पायाचा महत्वाचा सांधा म्हणजे ‘गुडघा’. आजकाल बरेच लोक या गुडघेदुखीने त्रस्त असतात. त्याची कारणे वेगवेगळी असतात. पण जेव्हा दुखणे असह्य होते, सर्व उपाय संपतात तेव्हा ‘शस्त्रक्रिया’ हा शब्द कानावर पडतो. उगीच भीती वाटते. शंका मनात येतात. गुडघेदुखीची सुरुवात सौम्य वेदनेने सुरु होते. कालांतराने वेदना तीव्र होत जातात. चालायला, चढ उतर करायला किंवा मांडी घालून बसायला, उठायला त्रास होऊ लागतो. पेन किलर(Painkillers) व इतर औषधोपचाराचा परिणाम होईनासा होतो तेव्हा डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. शस्रक्रियेची गरज आहे की नाही हे गुडघ्याच्या एक्सरे (x-ray) वरून समजते. एक्सरेमध्ये हाडांची झालेली झीज , एकमेकांवर होणारे घर्षण याची माहिती कळते. हाडांची झीज जर जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळी गुडघा बदलण्याची गरज पडते.
या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले सांधे बदलले जातात. त्याजागी धातू, प्लास्टिक किंवा सिरामिकचे सांधे बसवले जातात.पूर्वीपेक्षा गुडघ्याच्या प्रत्यारोपणाच्या शास्त्रक्रियेत खूप सुधारणा झालेली आहे. गुडघे प्रत्यारोपण केल्याने रुग्णाच्या दैनंदिन हालचाली सुलभ होतात, वेदना व अस्वस्थता कमी करण्यास मदत होते आणि जीवनमानाचा दर्जा उंचावतो.
तसेच ओपिऑइड वेदनाशामक आणि भविष्यात गुंतागुंत निर्माण करणाऱ्या स्टेरॉइड्सची गरज कमी होते. अश्या शश्रक्रिया आता आपण चिखली सारख्या ठिकाणी सुद्धा कमीदरामधे करू शकतो. धन्यवाद🙏🏻
-डॉ. पवन राऊत (Mob no.8806920624)
MBBS DNB (Ortho) MNAMS (New Delhi) FJRS FIAS ( Mumbai)
Certificate course in rheumatology (Pune)
Raut Orthoepedic Hospital chikhli