
03/08/2025
रुग्णांचे समाधान व त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हा डॉक्टरांना मिळालेला खरा सन्मान.
मागील आठ दिवसांत असे दोन अनुभव मला आले.
1) बुलढाणा येथील शेजोळे काका मागील दोन महिन्यापूर्वी माझ्या हॉस्पिटल ला ॲडमिट झाले.
भगंदर या आजारामुळे cellulitis व abscess तयार होऊन त्यांची परिस्थिती गंभीर झालेली होती.भगंदर आजार गुद मार्ग पासून पार उजव्या मांडीत पसरलेला होता.
आम्ही लगेच शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.IFTAK &LASER द्वारे उपचार केले.
4 दिवस काका हॉस्पिटल ला ॲडमिट होते. दर दहा दिवसाला हॉस्पिटलला ड्रेसिंग व भेट. आज काका त्या आजारातून पूर्णपणे बरे झाले. हॉस्पिटलला येऊन शाल श्रीफळ देऊन त्यांनी माझा सत्कार केला.
2) 2018 मध्ये एक नेव्ही ऑफिसर माझ्याकडे ऑपरेट झाले होते. त्यांना देखील गंभीर स्वरूपाचा भगंदर हा आजार होता. ते देखील त्या आजारातून पूर्णपणे त्याच वेळेस बरे झाले. सात वर्षांपासून ते आजार मुक्त आहेत.
त्यांनी देखील मागील आठवड्यात विशाखापटनम वरून माझ्यासाठी एक कॅप, कॉफी मग व एक छान लेटर पाठवले.
वरील दोन्ही गोष्टीतून मनाला आत्म समाधान मिळाले.
आपण खरंच रुग्णांप्रती योग्य काम करत आहोत याची पावती मिळाली.
भविष्यात देखील आमच्या हॉस्पिटल कडून अशीच रुग्णसेवा घडावी.
रुग्णाला पूर्ण समाधान मिळावे त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावे. ही श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना.