
20/06/2023
4.2 आरोग्यटीप:
🔹 भाग 2 : फळे 🍋🍐🍎🍉🍌🍓🥭🍑🍒🥝🍏🫐😋😋☺️
श्री धन्वन्तरी व सर्व वाचकांना सादर नमन 😊🙏🏻
मागच्या लेखात कोणतीे फळे खावीत व कोणत्या काळात खावी याविषयी माहिती घेतली. आजच्या लेखात फलाहाराविषयीच आणखी थोडेसे :
🍐फळे जेवताना खायची असल्यास ती जेवणाच्या सुरुवातीस खाणे योग्य.
असे का बरे??🤔
जेवण योग्य प्रकारे पचावे यासाठी जेवताना अन्नपदार्थ कोणत्या क्रमाने सेवन करावे हे विचारात घ्यावे लागते.
त्यात सुरुवातीस मधुर, अम्ल चवीचे पदार्थ खावेत असा निर्देश ग्रंथात आहे. बहुतांश फळे ही गोड, आंबट अशीच असतात.
तसेच फळे आपण कच्ची खातो (त्यावर भाजणे, शिजविणे असा कोणताही अग्निसंस्कार झालेला नसतो त्यामुळे पचनाचे संपूर्ण काम माझ्या जाठराग्नि ( पचनशक्तिला) च करायचे असते.) त्यामुळे फळांचे योग्य पचन व्हावे यासाठी ती सुरुवातीस सेवन करावी.
पूर्वीच्या एका लेखात अन्न पदार्थांचा क्रम व पचन याचा संबंध याविषयी विस्ताराने चर्चा झाली आहे पुन: ते मुद्दे लिहित नाही.
जेवणाच्या वेळाव्यतिरिक्त थोडी भूक असेल अशा वेळी बिस्किट, चिवडा, शेव इ. फारशी पोषणमूल्य नसलेला आहार घेण्यापेक्षा ताजे फळ खाणे नक्कीच जास्त हिताचे आहे.
पुढच्या भागात फळांविषयीच अजून काही हिताच्या गोष्टी जाणून घेऊया.
लेखाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया जरूर कलवाव्या.
*लेख आवडल्यास नक्की शेअर करा*.
पूर्वीचे लेख खाली दिलेल्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
http://www.ayurveda-aarogyadhan.com
📩 वैद्य सायली पेण्डसे
(*शुद्ध आयुर्वेद चिकित्सक*)
M.D. आयुर्वेद, M.A. संस्कृत.
Arogyghan Ayurved , near Dange chowk, Pimpri Chinchwad, pune.
🥏9511685116
Sevices available at Aarogyadhan Ayurved Clinic. Like treatment for infrtility, joint,spine