
05/10/2023
20th State Level Competition Sane Abacus Academy
२० वी राज्यस्तरीय मेंटल अरदमॅटिक्स आणि वैदिक मॅथ्स स्पर्धा चिंचवड येथे उत्साहात संपन्न.
साने अबॅकस अकॅडमी चिंचवड यांच्यातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय अबॅकस आणि वैदिक मॅथ्स स्पर्धा दि. ०१ ऑक्टोबर रोजी चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल येथे उत्साहात पार पडली. रविवारी सकाळी डॉ. सौ. काजल छठीजा, सौ. कविता आल्हाट, सौ. संगिता तरडे, सौ. सविता ट्रॅवि यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये १८ विविध प्रकारात गुणवान विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप पटकाविली असे साने अबॅकस अकॅडमीचे संस्थापक संचालक श्री अजय भारद्वाज यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमांकापेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणाऱ्या अबॅकस या अभ्यासक्रमाची निवड करून त्याची नियमित सराव करणे हे महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धेमध्ये मिळालेला क्रमांक हा महत्त्वाचा नसून सदर अभ्यासक्रमात सहभागी होऊन परीक्षा किंवा स्पर्धेत तणाव न घेता वावरणे, त्याचा सराव करणे महत्त्वाचे असल्याने स्पर्धेतील प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांचे पाहुण्यांनी कौतुक केले. पारितोषिक वितरण समारंभ डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेचे कायदे सल्लागार एडवोकेट संदीप राणे, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर (जीएसटी) श्री आर आर केडगे आणि एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक श्री इम्तियाज शेख यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्रभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचे सकाळपासून स्पर्धा संपेपर्यंत अतिशय छान पद्धतीने नियोजन ठेवण्यात आले होते, याचेही कौतुक आलेल्या सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केले. अतिवृष्टीची शक्यता असतानाही कार्यक्रम सुरळीत पार पडल्याबद्दल साने अबॅकस संस्थेच्या संचालिका सौ शशी भारद्वाज यांनी समाधान व्यक्त केले आणि सहभागी सर्वांचे आभार मानले. अशा प्रकारच्या स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा हातभार लावत असल्याने साने अबॅकस अकॅडमी तर्फे अशा स्पर्धांचे प्रतिवर्षी नियमित आयोजन केले जावे अशी अपेक्षा उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
https://fb.watch/nvokOA9RNj/