Pune Piles treatment - Pune Piles Care

Pune Piles treatment - Pune Piles Care BEIM & LASER -- Non-Surgical One stop solution for Piles, Fissure, Fistula by Kshar Sutra.

BEIM & LASER --- Non-Surgical One stop solution for Piles, Fissure, Fistula by Kshar Sutra.

21/04/2024

Thank Please Visit
Pune Piles Care

सकाळी 11 ते 2
सायं 6 ते 8.30

पुणे पाईल्स केअर,
गणेशम् 1,
पिपळे सौदागर, पुणे
📍https://maps.app.goo.gl/NVUtSZdpZEQWD9XC9

👉मुळव्याध म्हणजे काय ? उपचार कोणता व केव्हा करावा?

🎯https://www.youtube.com/

☎️ 94220 72961
960 700 7000

Thanks for Message Please visit.                     👉मुळव्याध म्हणजे काय ?👉अवस्था (स्टेज) , लक्षणे व कारणे कोणती ?👉उपचा...
13/10/2023

Thanks for Message Please visit. 👉मुळव्याध म्हणजे काय ?
👉अवस्था (स्टेज) , लक्षणे व कारणे कोणती ?
👉उपचार म्हणजे काय ?वेदनारहित, बिनटाका, विना जखम, विना मलमपट्टी,उपचार कोणता व केव्हा करावा ?
🚨 विविध प्रकारचे उपचार व त्याचे फायदा / तोटे या सर्व प्रश्नांची उत्तरे
https://www.youtube.com/

Visit For More Details
🕒 वेळ /Timings
👉सकाळी 11am ते 2pm
👉सायंकाळी 6pm ते 8pm

☎️Phone +91 9607007000

📍Location - डॉ. सुनिल उगीले,पुणे पाईल्स केअर, आशुतोष हाँस्पिटल, गणेशम्1, भारती हाॅस्पिटलच्या खाली, गोविंद यशदा चौक, पिपळे सौदागर, पुणे २७

🌐गुगल मँप वर शोधा /Google Map Location -Dr Sunil Ugile - Pune Piles Care

https://g.co/kgs/bVe3qr

08/07/2023
मूळव्याध (Piles / Mulvyadh / Bavasir)  वेदनारहित, विना कापाकापि , विना जखम, विना मलमपट्टी,  बिन टाका, काही तासात उपचार. ...
19/04/2022

मूळव्याध (Piles / Mulvyadh / Bavasir)

वेदनारहित, विना कापाकापि , विना जखम, विना मलमपट्टी, बिन टाका, काही तासात उपचार.

बीम --- नवीन अत्याधुनिक मुळव्याध उपचार

मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. योग्य वेळी त्यावर उपचार करणे हाच त्यावरचा उत्तम मार्ग आहे.गुदद्वाराची दुखणी सहजासहजी न दिसणारी, सांगायला अवघड वाटणारी, पण उठता-बसता कष्टप्रद अशीच असतात. स्वत:ला दिसत नाहीत- बघता येत नाही; परंतु हे दु:ख रात्रंदिवस पिच्छा सोडत नाही. विशेषत: शौचाला जायच्या कल्पनेनेसुद्धा डोळय़ांसमोर काजवे चमकू लागतात. त्यातून रक्तस्राव होत असेल, तर परिस्थिती आणखीनच गंभीर बनते. अनेकदा जाहिरातींना भुलून वैद्य, भोंदू, बंगाली बाबा आदीं कडून अघोरी उपचार घेतले जातात आणि मग जंतुसंसर्ग, वेदना इ. गुंतागुंत वाढून जगणे असह्य़ होऊ शकते.
सर्वप्रथम मूळव्याध म्हणजे नेमके काय हे नीट समजून घेऊ. मूळव्याधामध्ये गुदद्वारा (A**s) बाहेरील (External) आणि आतील (internal) आवळशक्ती स्नायूंच्या द्वारा (Sphincter) मल विसर्जनावर नियंत्रण ठेवीत असतो. त्यायोगे आपण अनुकूल परिस्थिती नसल्यास शौचाची प्रक्रिया रोखून धरू शकतो. सकाळी जेव्हा शौचाची भावना होते तेव्हा डावीकडचे मोठे आतडे आकुंचन पावून मल पुढे ढकलण्यास संदेश देते. ही प्रक्रिया नीटपणे पार न पडल्यास जोर करावा लागतो. मल घट्ट असल्यास जखम होणे किंवा फार काळ अंगावर काढल्यास चुंबळ बाहेर येणे असा त्रास होतो. ‘गुदद्वार बंद करताना लंबगोल आकाराचे दिसते; परंतु पूर्णपणे उघडल्यावर गोलाकार होते.
एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यात अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबी यासाठी कारणीभूत ठरू शकतात. पूर्वी चाळिशीनंतर मुख्यत्वे करून होणारा हा आजार हल्ली तरुण वर्गात विशेष आय.टी.,बी.पी.ओ.मध्ये काम करणाऱ्या मुलामुलींमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.
या सर्व प्रक्रियेची सुरुवात मलावरोध (constipation) पासून होते. बहुतांश वेळा ‘रात्री पार्टीला गेलो, सकाळी ऑफिसला जायला उशीर झाला आणि शौचाला खडा झाला आणि खूप दुखले’ इथून सुरुवात होते. अशा वेळी संडासच्या जागी फाटून फिशरची सुरुवात होते. सुरुवातीला ही जखम फारसे काही न करता भरतेदेखील! परंतु वेळीच सावध न होऊन खाण्या-पिण्याच्या सवयी न बदलल्यास हे दुखणे बळावत जाते. मग हाताला कोंब (सेंटीनल पाइल) लागायला सुरुवात होते. कधी तरी हा कोंब सुजतो, अचानकपणे फुगतो आणि मग बसणेही कष्टप्रद होऊन जाते.
संडासला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकते. मूळव्याधीचे अंतर्गत मूळव्याध (internal piles) आणि बाहेरील मूळव्याध (External piles) असे दोन प्रकार आहेत. मूळव्याधीचे तीन मुख्य कोंब घडय़ाळातील 3, 7. 11 स्थानांप्रमाणे आढळून येतात. यांना प्रायमरी पाइल्स असे म्हणतात. इतर जागी असणाऱ्या कोंबांना सेकंडरी पाइल्स असे संबोधले जाते. या मूळव्याधीमध्ये रक्तस्राव होण्याचे प्रमाण जास्त असते. फार काळ दुर्लक्ष केल्यास अंतर्गत कोंब बाहेर येऊन गुदद्वाराची संपूर्ण चंबळच बाहेर येते.
काही वेळेस जंतुसंसर्ग होऊन गुदद्वाराच्या बाजूला गळू तयार होते. त्याचा शस्त्रक्रियेद्वारा योग्य पद्धतीने निचरा न केल्यास ते रेक्टरमध्ये फुटते आणि ‘भगंदर’ तयार होते. छोटी पुटकुळी येऊन ती फुटून त्यातून पू निघणे असा त्रास अंगावर काढल्यास जंतुसंसर्ग वरच्या दिशेने पसरून गुंतागुंतीचा ‘हाय अनल फिस्तुला’ होऊ शकतो.
मूळव्याध ही आनुवंशिक असतो का? असा प्रश्न अनेक जण विचारतात. आनुवंशिकतेबद्दल खात्रीपूर्वक सांगता येत नाही, परंतु एकाच कुटुंबातील काही लोकांना हा त्रास होत असल्यास जेवणा-खाण्याच्या सवयी, जेवण्याच्या वेळेतील अनियमितता, व्यायामाचा अभाव, रात्री उशिरापर्यंत जागणे आदी सवयी विचारात घ्याव्या लागतात. भारतीयांमध्ये सकाळी उठून शौचास जाणे, खाली बसून मलविसर्जन करणे आदी चांगल्या सवयींमुळे मूळव्याधीचे प्रमाण पाश्चात्त्य देशांतील लोकांपेक्षा कमी आहे. हल्ली कमोडचा वापर आणि अनियमित जीवनशैली यामुळे आपल्याकडेही, विशेषत: तरुण वर्गात मूळव्याधीचे प्रमाण वाढते आहे.
उपचार पद्धतीत बिम हा नवीन आत्याधुनिक शेवटचा उपाय. त्याआधी ज्या कारणांनी किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे संडासला खडा होतो त्यात बदल करणे गरजेचे आहे. मधुमेह, कृमी, अमिबियासिस किंवा पोटातील जंतुसंसर्ग यापैकी काही त्रास असल्यास यावर उपचार करणे गरजेचे आहे. तसेच कायमस्वरूपी खडा न होईल याबाबत खबर घेणे गरजेचे आहे.
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे किंवा दही, ताक याचा वापर करणे, रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे, जेवणानंतर शतपावली करणे, तिखट, मसालेदार, तळलेले चमचमीत पदार्थ टाळणे, रात्रीची झोप व्यवस्थित घेणे, जागरण टाळणे, सकाळी उठल्यावर नियमितपणे शौचास जाणे आदी उपायांची मदत होते.

मूळव्याध विविध प्रकार - गाठ असणे, कोंब असणे, चिरा पडणे, अंग बाहेर येणे, आग होणे, रक्त पडणे. इत्यादी सर्व प्रकारांसाठी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून एक नवीन आत्याधुनिक उपचार उपलब्ध केला आह
माझा पत्त --
Www.pilesclinicpune.com
डॉ. सुनिल उगीले,
पुणे पाईल्स केअर,
आशुतोष हाँस्पिटल,
गणेशम्1, भारती हाॅस्पिटलच्या खाली,
गोविंद यशदा चौक, पिपळे सौदागर, पुणे २७
गुगल मँप वर शोधा https://goo.gl/maps/1K95Ho8x3NH2
वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 8.
Phone 8448447761

फिशर म्हणजे काय ?संडासला कडक होऊन संडासच्या जागी जखम होते किंवा तेथील त्वचा फाटली जाते त्यास फिशर असे म्हणतात.website:-h...
01/04/2022

फिशर म्हणजे काय ?
संडासला कडक होऊन संडासच्या जागी जखम होते किंवा तेथील त्वचा फाटली जाते त्यास फिशर असे म्हणतात.

website:-https://pilesclinicpune.com/
Contact Number:- 960 700 7000

Address

ASHUTOSH HOSPITAL, GANESHAM COMMERCIAL PHASE 1,BELOW BHARTI HOSPITAL, GOVIND YASHODA CHOWK, PIMPLE SAUDAGAR, PUNE 411027
Chinchwad
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Piles treatment - Pune Piles Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pune Piles treatment - Pune Piles Care:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category