26/05/2020
Safe ambulance driver , safe ride
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात त्या विषयीच्या बातम्या विचलित करणाऱ्या आहेत.काही ठिकाणी वेळेत ambulance न पोहोचल्याने रुग्ण दगावतो आहे , तर बऱ्याच वेळा 4 ते 6 तास ambulance उपलब्ध होत नाही, त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास उशीर होत आहे. वाढत्या cases मूळे सर्व यंत्रणा आणि व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे.त्यात PPE kits हे केवळ रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि स्टाफ साठी घेतले जात आहेत. Exposure with corona patient च्या definition मध्ये पेशंट सोबत 30 मिनिटांच्या वर exposure हे संसर्गाचे कारण आहे.ambulance ड्राइवर च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, कारण रुग्णांना ambulance मधून नेताना बराच वेळ रुग्णसंपर्क येतो. कोणता रुग्ण corona positive आहे आणि कोणता नाही , हे जाणणे शक्य नाही. आपण रुग्णास नेले तर आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो ही ambulance drivers ना वाटणारी भीती साहजिक आणि रास्त आहे. आणि ह्या भावनेतून जर ambulance drivers ह्यांची उपलब्धता कमी झाली तर , रुग्ण वाहक यंत्रणा कोलमडून पडेल. प्रश्न येतो ड्राइवर च्या सुरक्षेचा, त्यांना सोयीचा असा PPE देणे काळाची गरज आहे,पण PPE ची उपलब्धता आणि किंमत ह्यामुळे कोणताही ड्राइवर PPE kit घेऊन वापरू शकत नाही.ह्यावर तोडगा म्हणून "सांगाती"मार्फत ड्रायव्हर्स ना PPE kits देण्याचे योजिले आहे. एका 90 GSM च्या PPE kit ची किंमत बाजारात 1600 रुपये पर्यंत आहे.आपण देणार आहोत ते PPE kits 90 GSM चे असून washable , reusable आहेत,आणि माझे स्नेही श्री प्रसन्न सोमण ह्यांच्या पुढाकाराने ते आपल्याला 850/- रुपयांत उपलब्ध होतील. अशी 300 kits वाटण्याचा मनोदय आहे.
तरी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की ह्या उपक्रमास प्रतिसाद द्या आणि ह्या कठीण प्रसंगी रुग्णवाहनाचे जबाबदारीचे आणि जोखमीचे काम करणाऱ्या ambulance driver बंधूंच्या संरक्षणासाठी PPE kit साठी मदतीचा हातभार लावा.
आपलाच
डॉ सुजित निलेगावकर
"Ambulance Driver Protection Kits Project" https://rzp.io/l/4j7lB6w