03/05/2026
लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण आणि लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर दिनांक २७ एप्रिल रोजी संपन्न झाले.
या शिबिरामध्ये लाईफकेअर हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ व कॉर्निया सर्जन डॉ नदीम खतीब सर उपस्थित होते. या शिबिरामध्ये १५२ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबीर डॉ कृष्णकांत पाटील सर यांच्या संजीवन हॉस्पिटल मध्ये आयोजित केले होते.
या शिबिरामध्ये मोतीबिंदू चे निदान झालेल्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण येथे मोफत केली जाणार आहे.