21/03/2022
Acanthosis Nigricans म्हणजे काय?
अकॅन्थोसिस निग्रिकन्स ही त्वचेची स्थिती आहे. यामुळे त्वचेवर जाड आणि गडद असे काळसर चट्टे, ठिपके किंवा रेषा होतात, सामान्यत: त्वचेच्या जिथे घड्या पडतात, जसे की मानेच्या दोन्ही बाजू आणि मागील बाजू, बगल, कोपर आणि ओटीपोटाच्या खालच्या बाजूस. परंतु असे त्वचा वैवर्ण्य शरीरावर कुठेही दिसू शकते.
Acanthosis Nigricans ची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मानेच्या दोन्ही बाजू आणि मागील बाजू, बगल, कोपर आणि ओटीपोटाच्या खालच्या बाजूस, सामान्यत: त्वचेच्या जिथे घड्या पडतात तिथे जाड आणि गडद असे काळसर चट्टे, ठिपके किंवा रेषा हळूहळू दिसू लागणे. हे चेहरा, छाती, कोपर, गुडघे यासह शरीराच्या इतर भागांवर सुद्धा आढळू शकते. यामुळे सौम्य खाज येऊ शकते, परंतु सामन्यत: खाजवणे दिसून येत नाही.
Acanthosis Nigricans कशामुळे होतो?
१. अकॅन्थोसिस निग्रिकन्स हा रक्तातील इन्सुलिनच्या उच्च पातळी (High Serum insulin level)मुळे होतो, या स्थितीला इन्सुलिन प्रतिरोध (Insulin Resistance) म्हणतात.
२. जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ लोकांमध्ये इन्सुलिनचा प्रतिरोध दिसून येतो आणि त्यामुळे त्यांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
३. हे पॉलीसिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोम (PCOS) सारख्या इतर अंतःस्रावी ग्रंथींच्या स्थितींशी देखील संबंधित आहे.
४. काहीवेळा, अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स हे आनुवंशिक असू शकतात (एखाद्या व्यक्तीला त्यांच्या पालकांकडून दिले जाते) किंवा अनुवांशिक सिंड्रोमचा भाग असू शकतो.
५. हे तोंडी गर्भनिरोधक किंवा स्टिरॉइड्स सारख्या औषधांमुळे होऊ शकते.
ऍकॅन्थोसिस निग्रिकन्सचे निदान कसे केले जाते?
१. प्रभावित त्वचा पाहून डॉक्टर अॅकॅन्थोसिस निग्रिकन्सचे निदान करू शकतात.
२. रक्तातील इन्सुलिनची मात्रा पाहून
३. (PCOS) सारख्या इतर अंतःस्रावी ग्रंथींच्या स्थितीं
४. वाढलेलं वजन किंवा लठ्ठपणा
अकॅन्थोसिस निग्रिकन्स स्वतःच हानीकारक किंवा सांसर्गिक नाही. परंतु एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा धोका असल्याचे हे लक्षण असू शकते. त्यामुळे डॉक्टर मधुमेह, PCOS किंवा त्याच्याशी संबंधित इतर परिस्थिती शोधण्यासाठी रक्त तपासणीचे करून घेऊ शकतात.
अकॅन्थोसिस निग्रिकन्सचा उपचार कसा केला जातो?
ऍकॅन्थोसिस निग्रिकन्सच्या मूळ कारणावर म्हणजेच रक्तातील इन्सुलिनच्या उच्च पातळीवर (High Serum insulin level) उपचार केल्याने त्वचेचे गडद ठिपके फिके होऊ शकतात किंवा अदृश्य होऊ शकतात. त्यासाठी आयुर्वेदामध्ये अत्यंत प्रभावी अशी औषधे आहेत. त्यासाठी आयुर्वेद तज्ञाची भेट घ्या.
अशी औषधे जी इन्सुलिन प्रतिरोध Insulin Resistance निर्माण करतात ती औषधे थांबवणे.
मधुमेह, PCOS आणि इतर व्याधींवर उपचार करणे.
वजन कमी केल्याने ऍकॅन्थोसिस निग्रिकन्स फिकट होण्यास मदत होईल. परंतु दुर्दैव आजही लोक लठ्ठपणाला / वाढलेल्या वजनाला आजार समजत नाहीत. स्थूलता हा एक अंतःस्रावी ग्रंथींच्या संबंधित आजार आहे.
डॉक्टर क्रीम किंवा लोशन लिहून देऊ शकतात जे त्वचा उजळण्यास मदत करू शकतात. परंतु बहुतेक वेळा असे बाह्य उपचार जे खूपच महागडे असतात, त्यांचा म्हणावा तितका परिणाम दिसून येत नाही.
बऱ्याच वेळेला ऍकॅन्थोसिस निग्रिकन्सना उपचारांची आवश्यकता नसते.
मला आणखी काय माहित असावे?
ऍकॅन्थोसिस निग्रिकन्स असलेल्या त्वचेचे भाग काळसर दिसू शकतात.
त्वचेला स्क्रब केल्याने मदत होत नाही आणि उलट त्वचेची जळजळ होऊ शकते म्हणून त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा.
ब्लीच, स्किन स्क्रब किंवा ओव्हर-द-काउंटर एक्सफोलिएटिंग क्रीम्स वापरू नका.
स्पा आणि ब्युटी पार्लर मध्ये जाऊन बाह्य उपचार करून घेऊन आर्थिक व मानसिक त्रास करून घेऊ नये.
निरोगी व सकस आहार खाणे आणि नियमित शारीरिक हालचाली केल्याने इन्सुलिनची पातळी कमी होण्यास आणि त्वचेचे स्वरूप सुधारण्यास मदत होते. हे यासाठी मदत करू शकते:
आहारासंबंधी माहितीसाठी आयुर्वेद तज्ञाची मदत घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क :
वैद्य विजयकुमार शनवाडे.
BAMS MD.
श्रीशैल आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म चिकित्सालय
पहिला मजला, गजानन अपार्टमेंट, देवधर हॉस्पिटल जवळ, मार्कंडी, चिपळूण .
संपर्क: whatsapp – ९०९६२२४५९८ .