13/04/2026
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे ७ वर्षांनंतर इराणकडून कच्च्या तेलाची खेप भारतीय किनाऱ्यावर पोहोचली आहे. शिप ट्रॅकिंग डेटानुसार, इराणी तेल घेऊन आलेले दोन मोठे सुपरटँकर(जहाज) भारतात दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फेलिसिटी नावाचा टँकर रविवारी (१२ एप्रिल २०२६) उशिरा रात्री गुजरातच्या सिक्का बंदराजवळ पोहोचला. या टँकरमध्ये सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल असून, ते मार्चच्या मध्यात खार्ग बेटावरून लोड करण्यात आले होते. तर, जया नावाचा दुसरा टँकर ओडिशातील पारादीप बंदरात पोहोचला. या टँकरमध्येही जवळपास २० लाख बॅरल तेल आहे, जे फेब्रुवारीच्या अखेरीस लोड करण्यात आले होते.