24/11/2023
डायबेटिस रुग्णांना गुळ हा पर्याय आहे का?
आपल्या देशात मधुमेहाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मधुमेह व्यवस्थापनामध्ये आहाराचा वाटा सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही आहार काय घेता यावर तुमच्या साखरेची पातळी अवलंबून असते. त्यामुळे आहाराचे व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
मधुमेही रुग्ण खाण्यावर कंट्रोल राहत नसल्याचे स्वतःहून काहीतरी पळवाटा किंवा पर्याय शोधत असतात. अनेकदा त्यांना चुकीचे मार्गदर्शन मिळते. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे साखरे ऐवजी गूळचा वापर. काही मधुमेह पेशंट हे साखरेऐवजी गुळ खायला सुरुवात करतात. त्यांना असं वाटतं की गुळ खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढणार नाही. वस्तुस्थिती मात्र तशी नाही.
साखर म्हणजेच सुक्रोज ही फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यांच्या मिश्रणापासून बनलेली असते. साखर खाल्ली जाते, तेव्हा आतड्यांमध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज वेगवेगळे होतात. त्यांच पचन होतं आणि ते रक्तामध्ये शोषून घेतले जातात. ही क्रिया पटकन होते, त्यामुळे ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते. हेच गुळाच्या बाबतीतही आहे. रासायनिकदृष्ट्या बघायला गेलं तर गुळामध्ये सुक्रोज आणि ग्लुकोजचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असतं. त्यामुळे आपण गुळ खाल्ला तरी शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणारच आहे.
गूळ खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते. त्याच्या उच्च ग्लायसेमिक निर्देशांकामुळे, मधुमेह असलेल्या लोकांसाठी गूळ एक व्यवहार्य पर्याय असू शकत नाही.
गूळ आणि साखर दोन्ही खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर फारसा परिणाम होत नाही.
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने त्यांना रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत होईल. मात्र, हे चूक आहे. गुळात सुक्रोज असते, जे जटिल असूनही, आपल्या शरीराद्वारे शोषले जाते तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. याचा अर्थ साखरेएवढाच ते घातक आहे.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते असे सांगितले जाते. पण वस्तुस्थिती तशी आहे का? जर लोहाची कमतरता असेल तर औषधाच्या स्वरुपात लोह देणं गरजेचे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रीशियन या संस्थेच्या मते लोह वाढण्यासाठी जे आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, नटस्, कडधान्य यांचा समावेश करायला हवा. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. राजगिऱ्यामध्ये तर भरपूर लोह असते. हे घटक आहारामध्ये वापरू शकता. तसेच मांसाहारापासून लोह मिळते. जर लोह मिळविण्यासाठी गुळ घेत असाल. तर गुळाऐवजी हे काही सोपे उपाय करू शकता.
थोडक्यात गुळ हा साखरेला पर्याय असू शकत नाही. त्यामुळे मधुमेहांनी मी गुळाचा चहा पितो, गुळाचा लाडू खातो, साखरेऐवजी गुळाचा शिरा करतो अशा पळवाटा शोधणे चुकीचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपल्या आहाराचे योग्य ते नियोजन करावे. योग्य आहारामुळेच आणि त्याला व्यायामाची जोड दिली तर मधुमेह नियंत्रणात राहू शकतो हे आपण अनेक रुग्णांवर केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे गुळ हा मधुमेहींसाठी पर्याय असू शकत नाही हे मात्र नक्की!
Dr Pranita Ashok
MBBS MD PhD (Topic : Nutrition & Metabolism)
Diet consultant
For
Dr Nagre Diabetes Reversal Center, Deulgaon Raja Appointment for diabetes reversal
930766751