Pranada Ayurved

Pranada Ayurved By our wellness center we treating all metabolic disorders. We are working in this health and well

“आनन्दः अस्ति स्वीकृतिः” — आरोग्याचा पायास्वीकृती (Acceptance) म्हणजे वास्तवाशी संघर्ष न करता त्याला समजून घेणे आणि त्या...
12/11/2025

“आनन्दः अस्ति स्वीकृतिः” — आरोग्याचा पाया

स्वीकृती (Acceptance) म्हणजे वास्तवाशी संघर्ष न करता त्याला समजून घेणे आणि त्यात स्थिर राहणे.
जेव्हा आपण परिस्थिती, शरीर, आजार, नातेसंबंध — यांना स्वीकारत नाही, तेव्हा मन तणावग्रस्त (Stress mode) राहते.
हा ताण शरीरातील सर्व यंत्रणा बिघडवतो.

▫️ताण आणि हार्मोन्स (Cortisol & Adrenaline)
जेव्हा मन सतत नकार, चिंता, अपराधीपणा किंवा असंतोषात राहते, तेव्हा
👉🏻Hypothalamus-Pituitary-Adrenal (HPA) Axis सक्रिय होते
👉 Cortisol आणि Adrenaline सतत स्रवतात

याचे दीर्घकालीन परिणाम खालीलप्रमाणे —
▫️मधुमेह (Diabetes Mellitus)
- सततच्या मानसिक ताणामुळे शरीर “Fight or Flight” मोडमध्ये राहते.
- Cortisol हे Insulin resistance वाढवते (Cell Metabolism Journal, 2018).
- त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होत नाही.
- मनातील असंतोष, राग, न स्वीकारणे हे प्रत्यक्ष ग्लुकोज मेटाबोलिझम बिघडवतात.
- चरक संहितेत म्हटले आहे -
‘चिरकालं चिंतया दीर्घसूत्र्येण चापि’
(दीर्घकाळ चिंतेमुळे प्रमेह वाढतो)

▫️त्वचेचे विकार (Skin Disorders)
- Stress आणि नकारात्मक भावना वाढल्यावर शरीरात Inflammatory cytokines (IL-6, TNF-α) वाढतात.
- त्यामुळे Psoriasis, Eczema, Acne सारखे विकार बळावतात.
- Stanford University (2017) च्या संशोधनानुसार, ध्यान, acceptance-based therapy किंवा gratitude practice करणाऱ्या व्यक्तींमध्ये inflammatory markers ३०% पर्यंत कमी आढळले.

▫️पचन विकार (Digestive Disorders)
- मन सतत ताणाखाली असेल तर Vagus nerve निष्क्रिय होते, आणि “rest and digest” मोड बंद होतो.
- पचनसंस्था नीट कार्य करत नाही — अपचन, अजीर्ण, IBS ( ग्रहणी) वाढते.
- Johns Hopkins Medicine सांगते की gut-brain axis हा थेट emotional stress ने प्रभावित होतो.
- Meditation आणि Acceptance practices ने IBS मध्ये ५०% सुधारणा आढळली (Gastroenterology, 2020).

-डॉ. जितेश पाठक
प्राणदा आयुर्वेद
082750 07220

01/11/2025

"शितपित्तामुळे (Urticaria) जीवन जगणंच कठीण झालं होतं!”

पुण्याहून आलेला एक पेशंट, गेली 2-3 वर्षं रोज २-३ लिटर पाणी प्यायल्यावर मुद्दाम उलटी करावी लागायची. उलटी न केल्यास अंगाला प्रचंड पित्त- शितपित्त, खाज आणि ताप यायचा.

सतत अँटी-अ‍ॅलर्जिक आणि अ‍ॅसिडिटीची औषधं घेत असूनही त्रास काही केल्या कमी होत नव्हता.

प्राणदा आयुर्वेदातील केवळ दोन महिन्यांच्या आयुर्वेद उपचारांनी:
– उलटी पूर्ण बंद
– शितपित्ताचा त्रास नाहीसा झाला

शितपित्त म्हणजे केवळ त्वचेचा नाही, तर आतड्यांतील असंतुलन- Gut Dysbiosis आणि यकृताचे कार्य बाधित झाल्यामुळे होणारा Auto immune विकार आहे.

आयुर्वेद हा चयापचय correct करतो, आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो. यामुळे असे Auto immune विकार आयुर्वेदाच्या उपचारांनी लवकर आणि पूर्णपणे बरे होतात

या रुग्णाचा अनुभव ऐका आणि यासारख्या त्रासांनी ग्रासलेल्या ओळखीच्या पेशंटला पाठवा..

Pranada Ayurved
082750 07220
Online Consultation available

शरीराच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी..!पंचकर्म – बस्ती शिबिर(फक्त पहिल्या 25 पेशंट साठी)▫️शिबिर कालावधी: 4 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट...
31/07/2025

शरीराच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी..!
पंचकर्म – बस्ती शिबिर
(फक्त पहिल्या 25 पेशंट साठी)

▫️शिबिर कालावधी: 4 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2025
▫️स्थळ: प्राणदा आयुर्वेद, पंचवटी टॉवर शेजारी, मोठ्या पुलाजवळ, आग्रा रोड, देवपूर, धुळे

👉🏻 हे शिबिर कोणासाठी उपयुक्त ?
✓ ज्यांना निरोगी राहायचे आहे त्या सर्वांसाठी
✓ मलावरोध, शौचास अडचण
✓ ऍसिडिटी, अपचन, फुगणे
✓ संधिवात, सांधेदुखी, मणक्याचे विकार
✓ मासिक पाळीच्या तक्रारी
✓ अस्थमा (दमा)
✓ वारंवार होणारा मुतखडा
✓ सर्व प्रकारचे वाताचे विकार

👉🏻 शिबिरातील उपचार:
- संपूर्ण शरीर अभ्यंग (मालिश) – पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत
- स्वेदन (वाफ देणे)
- बस्ती (औषधी तेल आणि काढ्याचा एनिमा)
- नस्य (नाकाद्वारे औषधी तेल)

▫️ रोज किती वेळ लागेल: साधारण 1 ते 1.25 तास

▫️पेशंटसाठी मिळणाऱ्या सुविधा:
✅ प्रशिक्षित (ट्रेंड) स्टाफ
✅ प्रत्येक वेळी नवीन sterilised कॅथेटर
✅ प्रत्येक वेळी स्वच्छ, नवीन बेडशीट
✅ केरळीयन औषधी काढे आणि तेलांचा वापर
✅ मोफत वैद्यकीय तपासणी
✅ मोफत लाइफस्टाइल व आहार सल्ला (Lifestyle + Diet Plan)

▫️ चिकित्सा कालावधी
साधारणतः 3 ते 7 दिवस (प्रकृती अनुसार)

👉🏻 खर्च किती..?
3 दिवस – ₹2700
5 दिवस – ₹4500
7 दिवस – ₹6000

👉🏻 नाव नोंदणीसाठी संपर्क करा:
7620240975 / 9689440775

💡 “प्राणाभिसंवितः कायं धर्मार्थकाममोक्षाणाम् उपस्थापनमिच्छन् चिकित्सकः पुत्रवत् रोगिणं पश्येत्”— चरक संहिता, सूत्रस्थान ...
01/07/2025

💡 “प्राणाभिसंवितः कायं धर्मार्थकाममोक्षाणाम् उपस्थापनमिच्छन् चिकित्सकः पुत्रवत् रोगिणं पश्येत्”
— चरक संहिता, सूत्रस्थान १/५५

जो चिकित्सक जीवनाच्या चारही पुरुषार्थांचा आधार असलेले शरीर सुदृढ करायची इच्छा बाळगतो,
त्याने रुग्णाकडे पुत्रवत प्रेमाने आणि करुणेने पाहावे..!

आजचा दिवस आरोग्यसेवेत अखंडपणे कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि वैद्य बंधू-भगिनींच्या समर्पणाचा सन्मान करण्याचा!

आपण फक्त रोग नाही, तर एक संपूर्ण माणूस समजून उपचार करणारे आहोत...!

"डॉक्टर्स डे" च्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
🙏🏻💐😊🕉️

– डॉ. जितेश पाठक
Pranada Ayurved

पचनाच्या त्रासासाठी कायमचा उपाय हवा आहे का..?"पचन विकारांवरील मोफत तपासणी शिबिर"दिनांक - 1 व 2 जुलै 2025 (मंगळ व बुधवार)...
25/06/2025

पचनाच्या त्रासासाठी कायमचा उपाय हवा आहे का..?
"पचन विकारांवरील मोफत तपासणी शिबिर"

दिनांक - 1 व 2 जुलै 2025 (मंगळ व बुधवार)
वेळ - सकाळी 10 ते 1 आणि संध्या. 6 ते रात्री 8

ठिकाण - प्राणदा आयुर्वेद चिकित्सालय
मोठ्या पुलाजवळ, पंचवटी टॉवर शेजारी,
आग्रा रोड, देवपूर, धुळे. Mb- 7620240975

शिबिर कोणासाठी -
✓ वारंवार अ‍ॅसिडिटी होते?
✓ पोट गच्च राहते, शौच समाधानकारक होत नाही?
✓ कधी पातळ, कधी कडक, कधी चिकट शौच?
✓ भूक लागत नाही? वारंवार गॅसेस?
✓ IBS? Colitis?

🔸 तपासणी पूर्णतः मोफत
🔸 आयुर्वेदानुसार मोफत सल्ला व आहार मार्गदर्शन

📌 नोंद: कृपया मागील सर्व तपासण्या व रिपोर्ट्स सोबत आणावेत.

👉🏻 पहिल्या 40 रुग्णांसाठीच.
नाव नोंदणी साठी फोन करा -7620240975

डायबेटीसचे औषध घेत असाल तर हे नक्की वाचा!(आपल्या आरोग्याच्या हितासाठी 2 मिनिटं वेळ द्या.)डायबेटीस म्हणजे काय?रक्तात साखर...
16/05/2025

डायबेटीसचे औषध घेत असाल तर हे नक्की वाचा!
(आपल्या आरोग्याच्या हितासाठी 2 मिनिटं वेळ द्या.)

डायबेटीस म्हणजे काय?
रक्तात साखरेचे प्रमाण जास्त होणे – यालाच आपण डायबेटीस म्हणतो.
याचा थेट संबंध इन्सुलिन या हार्मोनशी असतो.

इन्सुलिन आणि डायबेटीस यांचा काय संबंध?
1. टाइप 1 डायबेटीस –
- शरीरात इन्सुलिन तयारच होत नाही किंवा फार कमी प्रमाणात तयार होते.
- हा प्रकार तुलनेने कमी लोकांमध्ये आढळतो, किंवा अनेक वर्षांनी काही रुग्णांमध्ये दिसून येतो.

2. टाइप 2 डायबेटीस –
- शरीर इन्सुलिन तयार करतं, पण ते योग्य प्रकारे कार्य करत नाही.
- शरीरात इन्सुलिन आधीच खूप प्रमाणात असतं, पण त्याचा परिणाम होत नाही.
- या प्रकारात इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो.
- 95% डायबेटीस रुग्ण हे टाइप 2 प्रकारात मोडतात.

👉🏻 आता लक्ष द्या – या टाइप 2 डायबेटीस रुग्णांना बहुतेक वेळा दिली जाणारी औषधे म्हणजे:
सुल्फोनिलयुरिया ग्रुपची औषधे
उदा: Glimepiride, Glipizide, Gliclazide, Glibenclamide

ही औषधे नेमकं काय करतात?
▫️ इन्सुलिन जबरदस्तीने वाढवतात
▫️ साखरेचं प्रमाण काहीही असो – शरीराला इन्सुलिन सोडायला भाग पाडतात
▫️ त्यामुळे साखर कमी होते – पण...

👉🏻 इथे सुरू होतं एक दुष्टचक्र:
1. इन्सुलिन वाढवलं जातं
2. साखर कमी होते
3. पुन्हा भूक लागते – कधी कधी नसतानाही खाणं होतं
4. खाल्लं की पुन्हा साखर वाढते
5. मग पुन्हा इन्सुलिन वाढवावं लागतं

परिणाम:
▪️ हा चक्रव्यूह सतत चालू राहतो
▪️ रुग्ण यात अडकतो
▪️ इन्सुलिनचं प्रमाण अधिक होतं, पण इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते
▪️ आणि रोग अधिक बळावतो

इतर दुष्परिणाम:
▫️ इन्सुलिन हे एनाबोलिक हार्मोन असल्यामुळे वजन वाढवते
▫️ म्हणजे साखर कमी होत असतानाही, वजन मात्र वाढतं
▫️ आणि त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स अजून वाढतो!

म्हणजे विचार करा –
ही औषधे तुम्हाला बरा करत आहेत का?
की केवळ कागदावर तुमची साखर ‘नॉर्मल’ दाखवत आहेत?

💡 टाइप 2 डायबेटीसमध्ये व्यायाम, योग्य आहार, जीवनशैली आणि आयुर्वेदिक चिकित्सा यामुळे डायबिटीस रिव्हर्स करणे शक्य आहे.

कन्सल्ट करा –
डॉ. जितेश पाठक
Lifestyle Disease Consultant
प्राणदा आयुर्वेद, धुळे
082750 07220

लिव्हर म्हटले की बहुतेक जण लगेच विचार करतात – “आम्ही दारू तर पितच नाही, मग आमचं लिव्हर कसं बिघडेल?” किंवा “हेपेटायटीस-B ...
19/04/2025

लिव्हर म्हटले की बहुतेक जण लगेच विचार करतात – “आम्ही दारू तर पितच नाही, मग आमचं लिव्हर कसं बिघडेल?” किंवा “हेपेटायटीस-B नाहीये ना, मग काही प्रॉब्लेम नाही.”

पण सत्य हे आहे की लिव्हर खराब होण्याची कारणं केवळ दारू आणि व्हायरल इन्फेक्शनपुरती मर्यादित नाहीत.

आजच्या काळात लिव्हरला सर्वात मोठा धोका आहे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमधून!

▫️सतत बसून राहणे (सिडेंटरी लाइफस्टाइल)
▫️अधिक प्रमाणात गोड, तेलकट आणि फास्ट फूडचं सेवन
▫️ तळलेले अन्नपदार्थ खाणे
▫️शिळं अन्न खाण्याची सवय

या सगळ्याचा परिणाम लिव्हरवर दारू इतकाच घातक होतो.

लिव्हर हे शरीरातील एक महत्त्वाचं आणि अबाधित कार्य करणारे अवयव आहे – डिटॉक्सिफिकेशन, मेटाबॉलिझम, पोषण शोषण अशा अनेक जबाबदाऱ्या लिव्हर पार पाडत असते.

म्हणूनच आजचा दिवस लिव्हरसाठी सजग होण्याचा दिवस ठरवूया.
आणि हे लक्षात ठेवा — आयुर्वेदिक उपचार आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब केल्यास लिव्हरचं आरोग्य दीर्घकाळ उत्तम राहू शकतं.

#प्राणदा_आयुर्वेद
082750 07220

मुलगा सारखा चिडचिड करतो? अभ्यासात लक्ष नाही? झोप लागत नाही? मोबाईलच्या आहारी गेलाय?उत्तर आहे – शिरोधारा! 😊प्राणदा आयुर्व...
17/04/2025

मुलगा सारखा चिडचिड करतो? अभ्यासात लक्ष नाही? झोप लागत नाही? मोबाईलच्या आहारी गेलाय?
उत्तर आहे – शिरोधारा! 😊

प्राणदा आयुर्वेद घेऊन आले आहे -
5 ते 25 वर्षे वयोगटासाठी विशेष
✨ शिरोधारा शिबिर ✨

▫️दिनांक - 22 ते 30 एप्रिल 2025
▫️वेळ: सकाळी 8 ते 12, संध्या. 5 ते 8
▫️ठिकाण: मोठ्या पुलाजवळ, पंचवटी टॉवर शेजारी, देवपूर, धुळे. संपर्क: 9689440775

शिरोधारा फी:
1 दिवस – ₹700
3 दिवस – ₹1500
यामध्ये मिळेल:
✓ 40 मिनिटांचे शिरोधारा सत्र
✓ मोफत डॉक्टर कन्सल्टेशन
✓ मोफत आयुर्वेदीय आहार मार्गदर्शन

💡 "मनःशांती आणि एकाग्रता, पाया उज्वल भविष्याचा.!"

संपर्क - 9689440775

07/04/2025

"सर्वात मोठा आणि श्रेष्ठ लाभ कोणता?" महाभारतात यक्षाने धर्मराज युधिष्ठिराला प्रश्न विचारला.

युधिष्ठिराने दिलेले उत्तर:
"लाभानां श्रेष्ठम् आरोग्यम्"
(सर्व लाभांमध्ये ‘आरोग्य’ सर्वश्रेष्ठ आहे)

आजच्या धावपळीच्या जीवनात पैसा-अडका, प्रतिष्ठा, यश हे सगळं असलं तरीही आरोग्य नसेल, तर काहीच नसेल...!

Health is physical, mental and social well-being and not merely an absence of the Disease.
-World Health Organization

चला, आजच्या दिवशी आरोग्याचा संकल्प करूया👍

जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा! 🏵️😊🌸🌷


बुद्धी, प्रतिकारशक्ती आणि सर्वांगीण विकासासाठी...✨ मोफत सुवर्णप्राशन शिबीर ✨(जन्मापासून ते 15 वर्षांपर्यंतच्या सर्व मुला...
05/04/2025

बुद्धी, प्रतिकारशक्ती आणि सर्वांगीण विकासासाठी...

✨ मोफत सुवर्णप्राशन शिबीर ✨
(जन्मापासून ते 15 वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींसाठी)

दिनांक: 6 एप्रिल 2025, रविवार (पुष्य नक्षत्र)
वेळ: सकाळी 9 ते स. 11 वाजे पर्यंत
ठिकाण: प्राणदा आयुर्वेद क्लिनिक
(मोठ्या पुलाजवळ, पंचवटी टॉवर शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे)
Google Location: https://g.co/kgs/gBMkoX
संपर्क: 9689440775

टीप:
आपल्या बाळाला पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन द्यायला सुरुवात करून, नियमितपणे दर पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन द्या आणि त्याच्या/तिच्या शारीरिक व मानसिक विकासात भर घाला!

🌍✨ World Happiness Day ✨🌍आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून तो आपल्या मनोवृत्तीवर असतो. खरा आनंद हा सकारात्मक विचारसरण...
20/03/2025

🌍✨ World Happiness Day ✨🌍

आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून तो आपल्या मनोवृत्तीवर असतो. खरा आनंद हा सकारात्मक विचारसरणीत आणि समाधानात आहे. मात्र, काही वृत्ती माणसाला नेहमी दुःखी ठेवतात –

📖 "ईर्ष्या घृणी त्वसंतुष्टः क्रोधनो नित्यशङ्कितः ।
परभाग्योपजीवी च षडेते दुःखभागिनः॥"

🔹 ईर्ष्या करणारा – दुसऱ्याच्या यशाने जळणारा
🔹 द्वेष करणारा – नकारात्मकतेत अडकलेला
🔹 असंतुष्ट – कितीही मिळाले तरी न समाधानी
🔹 क्रोधी – सहज रागावणारा
🔹 नित्य संशयी – सतत शंका घेणारा
🔹 दुसऱ्याच्या भाग्यावर जगणारा – स्वतः मेहनत न करणारा

💡 याउलट, प्रेम, समर्पण, समाधान, आणि सकारात्मक विचार हेच खरी समृद्धी आणि आनंद देतात.

🌿 निरोगी शरीर, शांत मन, आणि आनंदी जीवनशैली यामुळेच दीर्घायुष्य आणि समाधान मिळते. चला, आपण सर्वांनी सकारात्मक विचारांचा स्वीकार करून World Happiness Day साजरा करूया!

😊💐 आनंदी राहूया, निरोगी जगूया! 💐😊

# Pranada Ayurved

📢 मुलांचे चिडचिडेपणा आणि एकाग्रतेच्या समस्येचे खरे कारण? 🤔ओपीडी मध्ये अनेक पालक तक्रार करतात की त्यांच्या मुलांचे अभ्यास...
11/03/2025

📢 मुलांचे चिडचिडेपणा आणि एकाग्रतेच्या समस्येचे खरे कारण? 🤔

ओपीडी मध्ये अनेक पालक तक्रार करतात की त्यांच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, ते चिडचिड करतात आणि एकाग्र राहू शकत नाहीत.
पण कधी विचार केला आहे का की याला त्यांचा आहार कारणीभूत असू शकतो?

🔬 'Nature' या सुप्रसिद्ध जरनलमध्ये फेब्रुवारी 2025 ला प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, फक्त 5 दिवस जंक फूड खाल्ल्यास मेंदूच्या कार्यप्रणालीत मोठे बदल होऊ शकतात.

- अभ्यासासाठी 29 तरुण आरोग्यदायी पुरुष निवडले गेले.
- त्यातील 18 जणांना 5 दिवसांसाठी दररोज 1,500 अतिरिक्त कॅलरी असलेले उच्च-साखर आणि उच्च-चरबीयुक्त पदार्थ देण्यात आले.
- न्यूरोइमेजिंगच्या मदतीने त्यांच्या मेंदूतील बदलांचे निरीक्षण करण्यात आले.

📌 संशोधनातून काय दिसून आले?
✓ जरी शरीराचे वजन किंवा रचना बदलली नाही तरी मेंदूतील इन्सुलिन संवेदनशीलता कमी झाली.
✓ हा बदल लठ्ठ लोकांमध्ये आढळणाऱ्या मेंदूच्या कार्यप्रणालीसारखा होता.
✓ याचा थेट परिणाम मेंदूतील भूक नियंत्रण, एकाग्रता आणि मूड यांवर झाला.

💡याचा अर्थ फास्ट फूड फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करत आहे. टीनेजर्समध्ये सतत जंक फूड खाण्याची सवय असेल तर त्याचा त्यांच्या एकाग्रतेवर, चिडचिडेपणावर आणि भावनांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

🛑 पालकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मुलांचे बदलते वर्तन केवळ बाह्य कारणांमुळे नसून त्यांच्या दैनंदिन आहाराशीही जोडलेले असू शकते!

📎 Link of Study -
https://www.nature.com/articles/d41586-025-00549-7

डॉ जितेश पाठक
Pranada Ayurved
8275007220

Address

Agra Road, Near Big Bridge, Panchawati Corner, Deopur
Dhule
424002

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+918275577220

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranada Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pranada Ayurved:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram