Dr Asha Sonkar's Fitness & Diet Clinic

Dr Asha Sonkar's Fitness & Diet Clinic Live a healthier life with Dr Asha Sonkar's diet and fitness tips. She is a qualified dietitian, Nutritionist and weight loss consultant.

15/06/2023
15/02/2023

Are you following these hacks for losing weight??

Dr Asha Sonkar's fitness and diet clinic wishes you Happy makar Sankranti
15/01/2023

Dr Asha Sonkar's fitness and diet clinic wishes you Happy makar Sankranti

फिटनेस मंत्रा फॉर 2023ह्या वर्षी प्रमाणेच पुढील वर्षा साठी पण आपण काही नविन फिटनेस साठी संकल्प केले असतीलच ?हो ना? पण अप...
28/12/2022

फिटनेस मंत्रा फॉर 2023

ह्या वर्षी प्रमाणेच पुढील वर्षा साठी पण आपण काही नविन फिटनेस साठी संकल्प केले असतीलच ?

हो ना? पण अपेक्षे पेक्षा खुप काही आपण ठरवतो, वर्ष भराची जिम मेंबरशिप , झुंबा क्लास,नविन ट्रेडमिल, नविन फिटनेस सायकल, स्लिम टी, वेट लॉस प्रोग्रॅम्स, डाएट प्लॅन वैगेरे, आणि
१ तारखे पासून करायचं असा ठरला जातो पण जितक्या उत्साहाने १ तारीख पासून सुरुवात होते तितक्याच लवकर अगदीं जानेवारी च्या शेवट होण्या अगोदरच हा उत्साह मावळतो.

हे असे का होते?तर लक्ष्यात घ्या कुठलेही काम जर यशस्वी रित्या पार पाडायचे असेल तर छोटे छोटे टार्गेट सेट करा, आणि त्यात सातत्य कायम ठेवा.

जिम /झुंबा/योग क्लास शक्य नसेल तर होम वर्कआउट पासून सुरुवात करा, पायी चालणे हा सर्वोतम बिगिनेर फ्रेंडली व्यायाम आहे. यासाठी हळू हळू पाऊले आणि टाईम वाढवावे.
बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातच चाला. यांसाठी दररोज 30 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे.

अगदीच डाएट करणे अशक्य असेल तर सर्वात पाहिले , बाहेरचे अधिक तेलकट,तुपकट,deep fried, साखरेचे पदार्थ खाणे टाळा किंवा त्यांचे सेवन कमी करा, दररोज खात असाल तर विकली ( weekly)खाऊ शकता, विकली खात असाल तर 15 दिवसात एकदा आणि 15 दिवसात एकदा खात असाल तर महिन्यातून एकदा असा प्लॅन करा.

डाएट मध्ये दररोज दोन्ही वेळच्या जेवणात कोशिंबीर/सलाड, दही/ताक/डाळ उसळी यांचा समावेश करा. दररोज एक तरी सीझनल फ्रेश फळं खा.

दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे शक्य नसेल तर आठवड्याला 1 glass पाणी अधिक पिण्याचे सवय शरीराला लावा.हळू हळू सवय होईल.( Over-all water intake वाढवावा)

झोपण्याच्या वेळा खूप उशिरा होत असतील तर किमान झोपण्याच्या अर्ध्या किंवा 1 तास तरी लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. अपुरी झोप ही वजन वाढणे किंवा कमी न होण्या करीता कारणीभूत असते. तसेच हार्मोन इंब्यालान्स साठी सुद्धा कारणीभूत आहे.

"फोकस ओन व्हॉट वी कॅन अचिव , डू नॉट फोकस ऑन व्हॉट वी कॅन नॉट ".

तर मग करताय ना नविन वर्षाचा फिटनेस संकल्प?

डॉ. आशा टिके सोनकर
( आहार आणि व्यायाम तज्ञ)

फॉर more details please call/ whatsapp on 9922427578

Plan starts from 2999

कसा असावा स्तनदा माते करीता आहार?(Diet for breastfeeding mother's)जगातील सर्वात श्रेष्ठ सुख म्हणजे आई होण,आणि ह्या काळात...
19/12/2022

कसा असावा स्तनदा माते करीता आहार?

(Diet for breastfeeding mother's)

जगातील सर्वात श्रेष्ठ सुख म्हणजे आई होण,आणि ह्या काळात स्त्रीला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ यात होणाऱ्या बदलावाना सामोरे जावे लागते. छोट्या बाळाची काळजी घेणे,त्याला वारंवार दुध पाजणे ( ब्रेस्ट फीड),घरातील इतर कामे आणि जबाबदाऱ्या तिला करणे भाग असते.

याकाळात तिला स्वतः साठी वेळ काढणे अगदीच अशक्य होते, यातच अपुरी झोप,आणि डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन त्या मुळे होणारा बॅकपेन( backpain), निपेन ( kneepain)अधिकच आव्हानात्मक वाटायला लागतो.

याकाळात स्त्रीला अधिक पोषक आहाराची आवश्यकता असते.जेणे करून जो काही डिलिव्हरी च्या काळात शरीरात पोषक तत्वांचा ह्रास झालेला आहे तो भरुन निघण्यासाठी आणि बाळाला स्तनपान करण्यासाठीं अधिक पोषक उष्मांकाची गरज असते.

यासाठी खालील प्रकारे स्तनदा मातेनी आहारात योग्य बदल करावा.

१. स्तनदा माते करिता , दररोज लागणाऱ्या उष्मांक पेक्षा अधिकचे ६०० उष्मांक ( ब्रेस्ट फीड) साठी अधिक लागतात.

२. आहारात होलग्रेनस् यात हातसडीचा तांदूळ,oatmeal, गहू, जवार, बाजरा, नाचणी) यांचा समावेश असावा.

३. याकाळात शरीरातील झीज भरून काढण्यासाठी आणि दुध बनण्यासाठी ( ब्रेस्ट मिल्क) प्रथिनांची खूप गरज असते. यासाठीच सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये,नट्स,seeds, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, चिकन, मासे यांचा आहारात समावेश करावा.

४. तसेच हेल्दी फॅट्स करिता नट्स( dryfruit Ladoo),seeds, साजुक तूप याचे सेवन करावे.

५.तसेच शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये याकरता पाणी किंवा काही concoction घेऊ शकता उदा. जीरा वॉटर, आज्वैन वॉटर, सौफ वॉटर, मेथी सीड वॉटर घेऊ शकता.यामुळे गॅसेस, अपचन याला ही आळा बसतो. चहा आणि कॉफी यांचे अधिक चे सेवन शक्यतो टाळावे. कारण यामुळे अधिक dehydration होऊ शकते.

६. ग्यालॅक्टोगोग (galactagogue) म्हणजे असे फूड सोर्स जेणे ब्रेस्ट मिल्क वाढण्यास मदत होते.जसे की मेथी सीड, सॉफ, अहलिव, poppy seeds , coconut यांचे सेवन ही नवीन माते करिता आवश्यक आहे.

७.याकाळात बऱ्याच माताना constipation ( पोट साफ होणे),piles इ. तक्रार उदाभवतात,यासाठी मुख्य कारण म्हणजे, पाणी कमी पिणे, फायबर युक्त आहाराचा अभाव असणे.यासाठी भरपूर पाणी पिणे गराचेजे आहे तसेच ताज्या हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश दररोज डाएट मध्ये असावा.

८. याकाळात हंगर पंग्ज कमी करण्या साठी थोड्या वेळाने ,थोडे थोडे खाणे गरजेचे आहे,४,५ वेळेस चे जेवण दिवस भरात असावे.

९.या सर्व बरोबरच ७,८ तासांची झोप आवश्यक आहे. रात्री झोप होत नसेल तर दिवसा २० ते ३० मिनिटांची पॉवर न्याप घेण्याची प्रयत्न करावे.तसेच स्ट्रेस ही अधिक असल्यामुळे कॉरटिसोल ( cortisol) hormone चे लेवेलस वाढून grehlin हे हार्मोन वाढून overeating होऊ शकते .

१०.सर्वात महत्वाचे म्हणजे व्यायाम,सर्व प्रथम डॉक्टरांचा व्यायामासाठी clearance घेणे गरजेचे आहे, तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर काही दिवसांनी किंवा ४ ते ६ आठवड्यांनी व्यायामाला सुरुवात करता येऊ शकते.c- section झालेल्या मातांनी ६ आठवड्यानंतर व्यायामाला सुरुवात केली तरी चालते ,पण त्याआधी टाके व्यवस्थित हिल झालेले आहेत ना याची खात्री करून घ्यावी.कुठल्याही प्रकारचा discomfort असेल तर व्यायाम तिथेच थांबवावा.तसेच लाईट वॉक,लो intensity weight training ,yoga,pelvic floor strengthening exercises यांचा समावेश करावा.तसेच diastatis रेक्टी सुद्धा आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

पुढील भागात आपण स्तनदा मातेकरिता आहार तलिका बघणार आहोत.

डॉ. आशा टिके सोनकर
आहार व व्यायाम तज्ञ.

  weightloss   review नमस्कार मैत्रिणिंनो,          आपल्या सर्वांनाच आपला बांधा सुडौल असावा असे वाटते.परंतू विभक्त कुटुं...
16/12/2022

weightloss
review

नमस्कार मैत्रिणिंनो,
आपल्या सर्वांनाच आपला बांधा सुडौल असावा असे वाटते.परंतू विभक्त कुटुंबपध्दती,आहार विहारा बाबत अनियमितता,बदलती जीवनशैली यामूळे वाढणारे वजन हि आजकाल एक समस्या बनली आहे.
माझ्या बाबतीतही असेच झाले.कोविड काळ आणि त्यानंतर लगेचच दूसर्‍या बाळाचा जन्म.यामूळे माझे वजन खूप वाढले.केवळ नूसते वजनच नाही तर पोटाचा आकार खूपच वाढला.मग मी ही गूगलवर अनेक डाएटिशिअन्सचा शोध घेतला.अनेकांशी फोन वर संवाद साधला.परंतू मला समाधानकारक माहीती मिळत नव्हती.
असेच एकदा सर्च करत असताना मला ' आशा सोनकर' ह्यांचा नंबर मिळाला.मी त्यांच्याशी फोन वर संपर्क साधला.त्यांच्या बोलण्याने मला माझ्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे मिळाली.एवढेच काय तर त्यांच्याशी बोलून मला माझे वजन निम्म्याने कमी झाल्यासारखे वाटले.सर्वप्रथम त्यांनी माझी संपूर्ण माहीती घेतली.माझ्या धावपळीच्या दिनचर्येची आणि मुले लहान असण्याची त्यांना पूर्ण कल्पना आली.तेव्हा त्यांनी मला रोजचा डाएट सजेस्ट केला
मी दरदोज त्यांना माझ्या जेवणाचा फोटो पाठवत होते.त्या सुध्दा मला वारंवार फोन करुन माझी माहीती घेत होत्या.त्यामूळे मला असे वाटत होते की,मी त्यांना रोज भेटतच आहे.
त्यांचा डाएट सुरु केल्यापासून माझे वजन तीन महिन्यात सात कीलो ने कमी झाले ,तसेच वाढलेल्या पोटाचा घेर हि कमी झाला. हे सगळे करताना मला माझ्यासाठीवू वेगळे असे काही करावे लागले नाही.माझ्या दोन मुलांना सांभाळून मला हे शक्य झाले.कुठेही माझी एनर्जी लेव्हल कमी झाल्याचे मला जाणवले नाही.

Posting this on behalf of my client
She does not want to reveal her identity.

Call / WhatsApp me on 9922427578 for more details

11/12/2022

Protein rich vegetarian sources

10/12/2022

Our program includes

Address

Thakare Hospital Building, Near Jaihind Senior College, Wadi Bhokar Road, Deopur
Dhule
424001

Opening Hours

Monday 10am - 1pm
5pm - 8pm
Tuesday 10am - 1pm
5pm - 8pm
Wednesday 10am - 1pm
5pm - 8pm
Thursday 10am - 1pm
5pm - 8pm
Friday 10am - 1pm
5pm - 8pm
Saturday 10am - 1pm
5pm - 8pm

Telephone

9922427578

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Asha Sonkar's Fitness & Diet Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Asha Sonkar's Fitness & Diet Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category