16/05/2024
लोकशाही म्हणजे जास्तीत जास्त टक्के मतदान झाले पाहिजे.
मतदानाची टक्केवारी कमी झाली तर शक्यता असते की रिझल्ट हा एका साईड ने लागू शकतो.
म्हणून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून लोकशाही चा आदर करूयात.
किती ही उन असू द्यात एक दिवस उन्हात बाहेर पडा आणि मत नोंदवा.
किती ही पाऊस असू द्या एक दिवस देशासाठी बाहेर पडा आणि आपले मत नोंदवा.
कंटाळा आला लाईन मोठी असली मतदान केंद्र लांब असले एक दिवस देशासाठी सहन करा जे जवान आपले 24 तास सीमेवर रक्षण करतात ते आपल्या साठी एवढं सहन करू शकतात तर आपण एक दिवस मत नोंदवायला एवढे कष्ट नक्कीच घेऊ शकतो.
चला तर आज एक निर्धार करूयात मी शपथ घेतो की माझा घरातील सर्व सदस्यांना मी मतदानाला घेऊन जाईल आणि सोबतच कमीत कमी दहा परिवारांना मतदान करण्यासाठी उस्फुर्त करेल.
आपले एक व्होट या देशाचे, आपले आणि जगाचे भवितव्य ठरवू शकते.
मतदान हा आपला वैयक्तिक हक्क आहे त्यामुळे आपल्याला घ्यायला कोणी रिक्षा पाठवेल याची वाट बघू नका. रिक्षा आली नाही म्हणून जर आपण मतदानाला गेला नाहीत तर येणारा रिझल्ट हा बदलू शकतो.
*घराबाहेर बाहेर पडा मत नोंदवा.*